मोठी बातमी! पश्चिम बंगाल राज्याचं नाव बदलणार, भाजपा सरकारचं मोठं पाऊल, नवं नाव काय?
विधानसभेत प्रस्ताव पारित झाला म्हणजे थेट राज्याचे नाव बदलले असे होत नाही. त्यासाठी केंद्र सरकारची मंजुरीही आवश्यक असते. विधानसभेत प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर संबंधित प्रस्ताव हा केंद्र सरकारकडे पाठवला जाईल.

West Bengal Name Change : पश्चिम बंगालमध्ये सध्या भाजपाचे सरकार आहे. तृणमूल काँग्रेसमधून भाजपात आलेले सुवेंदू अधिकारी सध्या बंगालचे मुख्यमंत्री आहेत. सत्तेत आल्यापासून त्यांनी अनेक जुने नियम बदलले आहेत. दरम्यान, आता सुवेंदू अधिकारी यांचे सरकार आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. तेथील सरकार आता पश्चिम बंगाल या राज्याचे नावच बदलणार आहे. त्यासाठी विधानसभेत रितसर प्रस्ताव सादर केला जाणार आहे. या राज्याचे इंग्रजीतील नावदेखील बदलण्याचा प्रस्ताव आहे.
नाव बदलण्यासाठी प्रस्ताव, नंतर काय?
समोर आलेल्या माहितीनुसार सुवेंदू अधिकारी यांचे सरकार पश्चिम बंगाल राज्याचे नाव बदलण्याच्या विचारत आहे. हे नाव बदलण्यासाठी येत्या 9 डिसेंबर रोजी विधानसभेत प्रस्ताव दाखल केला जाणार आहे. या प्रस्तावासाठीची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल या राज्याला इंग्रजीत वेस्ट बंगाल म्हटले जाते. हे नावदेखील बदलले जाणार आहे. बंगालच्या विधानसभेत प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर नाव बदलण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे.
पश्चिम बंगालचे नावे नाव काय असेल?
सुवेंदू अधिकारी यांचे सरकार पश्चिम बंगाल राज्याचे नाव बदलून ‘पश्चिम बंगा’ असे करणार आहे. सोबतच या राज्याला इंग्रजीमध्ये West Bengal असे न म्हणता पश्चिम बंगा असेच संबोधले जावे, असा प्रस्ताव पारित करून घेतला जाणार आहे. सुवेंदू अधिकारी यांच्या मंत्रिमंडळाची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत आगामी अधिवेशनात नामांतराचा हा प्रस्ताव पटलावर ठेवण्याचे ठरवण्यात आले. 4 ते 14 डिसेंबर या काळात बंगालच्या विधानसभेचे अधिवेशन असणार आहे. याच अधिवेशनात 9 डिसेंबर रोजी नामांतराचा हा प्रस्ताव दाखल केला जाणार आहे.
केंद्राकडे प्रस्ताव पाठवला जाणार
विधानसभेत प्रस्ताव पारित झाला म्हणजे थेट राज्याचे नाव बदलले असे होत नाही. त्यासाठी केंद्र सरकारची मंजुरीही आवश्यक असते. विधानसभेत प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर संबंधित प्रस्ताव हा केंद्र सरकारकडे पाठवला जाईल. केंद्राच्या मंजुरीनंतर रितसर पश्चिम बंगालचे नाव बदललेले असले. याआधी केरळ राज्याचे नामकरण केरळम असे करण्यात आलेले आहे.
