AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! महायुतीमध्ये मिठाचा खडा? भाजप शिवसेनेवर नाराज, जुन्या शिवसेनेसोबत कधीच…, नेत्याचं मोठं विधान

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उल्हासनगर दौऱ्यावरून महायुतीमध्ये वातावरण चांगलंच तापलं असून, आरोप -प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे.

मोठी बातमी! महायुतीमध्ये मिठाचा खडा? भाजप शिवसेनेवर नाराज, जुन्या शिवसेनेसोबत कधीच..., नेत्याचं मोठं विधान
eknath shinde, devendra fadnavis Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 23, 2026 | 3:53 PM
Share

उल्हासनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावरून शिंदे गटाच्या शिवसेनेने नाराजी व्यक्त केल्यानंतर आता भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी आणि शहरातील समस्या मांडण्यासाठी शिवसेनेने स्वतःहून पुढाकार घ्यायला हवा होता, असं भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी म्हटलं आहे. महायुतीचा धर्म शिवसेनेकडून पाळला जात नसल्याचा आरोप करत, वारंवार महायुतीमध्ये शिवसेनेकडून मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उल्हासनगर शहरात येत असताना त्यांच्या स्वागतासाठी आणि शहरातील प्रश्न मांडण्यासाठी महायुतीतील घटक पक्ष म्हणून शिवसेनेने स्वतःहून पुढे यायला हवं होतं, असं भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी म्हटलं आहे. शिंदे शिवसेनेचे महापौर अश्विनी निकम विराजमान झाल्यापासून शिवसेनेकडून महायुतीचा धर्म पाळला जात नसल्याची टीकाही त्यांनी केली.

प्रत्येक वेळी शिवसेना शिंदे गटाकडून महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप वधारिया यांनी केला. जुन्या शिवसेनेसोबत काम करताना अशा प्रकारचा त्रास कधी झाला नाही, मात्र शिवसेनेत नव्याने आलेले काही लोक वारंवार महायुतीमध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरून सुरू झालेला हा आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला आता भाजप आणि शिंदे शिवसेनेतील राजकीय संघर्षाला आणखी धार देताना दिसत आहे.

दरम्यान दुसरीकडे सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये देखील भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये संघर्ष पहायला मिळाला होता. भाजपकडे सर्वाधिक सदस्यांची संख्या असताना देखील शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मदतीने भाजपला अध्यक्षपदापासून दूर ठेवलं. यावरून भाजपनं नाराजी व्यक्त केली होती.

तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच पालघरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार श्रीनिवास वनगा यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. हा शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का होता. यावरून शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली होती.

Follow Us
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू
आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा
Rahul Narvekar on Sanjay Raut : आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा
शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार, रोहित पवारांची घोषणा; बावनकुळे म्हणाले...
Rohit Pawar : शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार, रोहित पवारांची घोषणा; बावनकुळे म्हणाले सरकार...
अमेरिका-चीननंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक; लोवी इन्स्टिट्यूटच्या....
Super Power India : अमेरिका-चीननंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक; लोवी इन्स्टिट्यूटच्या अहवालात भारताचा दबदबा कायम
योजना बंदही करता येत नाही, चालवणंही आव्हानात्मक; लाडकी बहीण योजनेवरून
Ladki Bahin Yojana : योजना बंदही करता येत नाही, चालवणंही आव्हानात्मक; लाडकी बहीण योजनेवरून नरहरी झिरवाळांनी मांडली सरकारची अडचण