Desi Batman : ना गोथम सिटी, ना बॅटमोबाईल… गावातल्या म्हशीवर स्वार झाला आपला बॅटमॅन! नेटकरी हसून हसून लोटपोट!
आजपर्यंत आपण बॅटमॅनची गोथम सिटी पाहिली. त्याची गाडी म्हणजेच बॅटमोबाईल पाहिलं. पण आता तो सोडून भारतातला बॅटमॅन सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. त्याचा कारनामा हा प्रत्येकाने पाहायलाच हवा.

बॅटमॅन म्हटलं की डोळ्यांसमोर येते त्याची भारी गाडी, काळा ड्रेस आणि मोठमोठ्या व्हिलनची धुलाई ! पण या सगळ्यात आता आपला भारतातला बॅट मॅन सुद्धा मागे राहिलेला नाही. याच्याकडे ना महागडी गाडी, ना मोठं शहर! जोकरच्या मागे लागायचं तेव्हा हा बॅटमॅन चक्क म्हशीवर बसून जातोय. आता म्हशीवर बसून बॅटमॅन जोकरला पकडायला चाललाय हे दृश्यचं एवढं भन्नाट आहे की पाहणाऱ्याला हसू आवरणं कठीण झालंय. त्यात मागे वाजतंय, साजन साजन तेरी दुल्हन तुझको पुकारे.. हे गाणं म्हणजे कहरचं
बॅटमॅनला म्हैस मिळाली, जोकरला ऑटो
व्हिडिओची सुरूवात एका गावाकडेच्या दृश्याने होते. रेल्वे रूळांजवळ बॅटमॅनचा मुखवटा घातलेला एक माणूस दात घासत उभा असतोय तेवढ्यात त्याची नजर एका लहान मुलाच्या बेपत्ता झाल्याच्या पोस्टरवर पडते. दुसरीकडे जोकर महाशय ऑटोमध्ये फिरत असतात.त्यांना एक लहान मुलगा दिसतो आणि चॉकलेटचं आमिष दाखवून ते त्याला पळवून नेतात.
आता आपला बॅटमॅन हे सगळं पाहून शांत बसणार तरी कसा? लगेच घरी जातो, बॅटमॅनचे कपडे चढवतो आणि जोकरला शोधायला बाहेर पडतो. पण इथेच खरी गंमत आहे. गोथम सिटीमध्ये बॅटमॅनकडे भारी बॅटमोबाईल असते. आपल्या देशी बॅटमॅन चक्क म्हशीवर सवार होऊन निघतो. म्हशीवर सवार होऊन हा पठ्ठ्या जोकरच्या मागे लागतो.
His other Batman videos are so good too! This one featuring the Joker and just look at that Batmobile which is more like BhaisMobile. Such an insanely talented guy! https://t.co/scCMYxPiSx
— r (@bekhayalime) November 16, 2026
जोकर बॅटमॅनची फाईट अन् मागे ‘साजन साजन’ हे गाणं
पुढे बॅटमॅन आणि जोकराची गाठ पडते. बॅटमॅन त्या मुलाला वाचवतो आणि मग त्या दोघांमध्ये सुरू होते जोरदार फाईट. पण या फाईटमध्ये ना बॅकग्राऊंडला खतरनाक म्युझिक नाही, ना धडकी भरवणारा आवाज…तर इथे साजन साजन तेरी दुल्हन हे रोमँटिक आणि आयकॉनिक गाणं वाजतं. एकीकडे बॅटमॅन जोकरला मारतोय आणि दुसरीकडे हे गाणं, हा विरोधाभास लोक पोट धरून हसत आहेत.
Addicted to this edit 🫶🏻 https://t.co/3FLhJK2feH
— Sachya (@sachya2002) November 16, 2026
हा खरा बॅटमॅन नाही, AI चा खेळ आहे
आता काही लोकांना वाटेल की आपल्या गावात खरचं असा बॅटमॅन फिरतोय की काय? तर थांबा हा खरा प्रकार नाही. ai तंत्रज्ञानाचा वापर करून हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. बंगळूरूमधील एका कंटेट क्रिएटरने या देशी बॅटमॅनची भन्नाट मालिका तयार केली आहे.
या व्हिडिओमध्ये हॉलिवूडचा सुपरहिरो थेट भारतीय गावात आणला आहे. इथे बॅटमोबाईलऐवजी म्हैस मिळते. जोकरला ऑटो मिळतो आणि फाईटला जुन्या हिंदी गाण्यांचा तडका दिला जातो. त्यामुळेच ही कल्पना लोकांना चांगलीच आवडतेय.
खरं सांगायचं तर बॅटमॅनने एवढ्या वर्षात अनेक व्हिलनशी पंगा घेतला असेल, पण म्हशीवर बसून जोकरचा पाठलाग करण्याची कल्पना बहुतेक त्यालाही सुचली नसेल, म्हणूनच हा देशी बॅटमॅन सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
