Farming Tips : प्रत्येक सीजनमध्ये या चार भाज्या लावा मजबूत कमाई करा, कमी खर्चापासून विक्रीपर्यंत सर्व गणित समजून घ्या
Farming Tips : काही पिकं अशी असतात, जी कमी खर्चात मजबूत फायदा मिळवून देतात. या पिकांची शेती फायद्याचा सौदा ठरतो. महत्वाचं म्हणजे तु्म्ही या पिकांमधून वारंवार नफा कमवू शकता. जाणून घ्या त्या बद्दल.

थंडीच्या सीजनसाठी हिरव्या भाज्यांची पेरणी सुरु झाली आहे. काही दिवसात हिरव्या भाज्या बाजारात मोठ्या प्रमाणात दिसू लागतील. तुम्ही शेतकरी आहात आणि भाज्यांच्या शेतीमधून तुम्हाला लाखो रुपये कमवायचे असतील तर लवकरात लवकर ही शेती सुरु करा. कारण जितक्या लवकरात लवकर तुम्ही हे पीक घ्याल, तितके तुम्हाला बाजारपेठेत चांगले पैसे मिळतील. आम्ही तुम्हाला अशा चार भाज्य सांगणार आहोत, ज्यात तुम्ही 20 ते 50 हजार रुपयांची गुंतवणूक करुन मोठी कमाई करु शकता. या भाज्यांचं पीक घेणं ही सोपं आहे. त्यासाठी फारसे तण काढण्याची किंवा कुदळीने खणण्याची गरज नसते. एकदा पेरणी केली की, मग काही दिवसात तुम्ही कापणी करु शकता.
अशा काही भाज्या आहेत, ज्या एकदा पेरणी केल्यानंतर कमीत कमी दोन ते तीनवेळा कापणी करु शकता. यात कोथिंबीर, पालक, मूळा आणि मटार ही पीकं आहेत. या चारही भाज्यांची मागणी कधीच कमी होत नसते. मटर आणि कोथिंबीरची डिमांड नेहमीच असते. पालकच्या भाजीची तुम्ही दोन ते तीनवेळा कापणी करु शकता. मूळ्याच्या भाजीतून चांगली कमाई होऊ शकते. ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. या चार भाज्यांची शेती करुन सीजनमध्ये तुम्ही चांगली कमाई करु शकता.
1 एकरमध्ये चार पीकं कशी घ्यायची?
एक एकर जमिनीत 0.30 एकरमध्ये कोथिंबीर, 0.25 एकरमध्ये पालक, 0.20 एकरमध्ये मूळा आणि 0.25 एकरमध्ये मटर उगवू शकता.
किती खर्च येईल?
शेताच्या नागंरणीसाठी 4 हजार रुपयापर्यंत खर्च करु शकता.
बियाणे आणि बियाणे प्रक्रियेवर 7,000 रुपयांपर्यंत खर्च केला जाऊ शकतो.
शेणखत आणि रासायनिक खतांचा 9,000 रुपयांपर्यंत खर्च जाऊ शकतो.
सिंचन आणि लहान उपकरणांसाठीचा 3,000 रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.
तण काढणे, कापणी आणि मजुरी यासाठी जास्तीत जास्त 12,000 रुपयापर्यंत खर्च होऊ शकतो.
जर तुम्हाला माल थेट बाजारात पोहोचवायचा असेल, तर पॅकेजिंग आणि वाहतुकीसाठी 8,000 खर्च येऊ शकतो.
अतिरिक्त खर्चासाठी तुम्ही 8,000 बाजूला ठेवू शकता.
म्हणजे सुरुवातीला एकूण खर्च 50 हजार रुपयापर्यंत जाऊ शकतो.
हे सर्वात महत्वाचं आधी वाचा
ही माहिती अंदाजाच्या आधारावर आहे. ही सर्व माहिती अचूक मानू नये. शेतातून थेट हा माल तुम्ही बाजारात पोहोचवत असाल, तर एका सीजनमध्ये चांगली कमाई सुद्धा होऊ शकते. जास्त आणि कमी कमाई उत्पादनावर सुद्धा अवलंबून आहे.
