AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आपल्या शेतात अनोख्या पांढऱ्या वांग्याची शेती करा, आणि कमवा लाखो रुपये…

तुमच्या शेतात किंवा किचन गार्डनमध्ये तुम्ही ही पांढरी वांगी कमावू शकतात. त्याच्या बिया तुम्हाला ऑनलाईन मिळू शकतात.

आपल्या शेतात अनोख्या पांढऱ्या वांग्याची शेती करा, आणि कमवा लाखो रुपये...
White Brinjal Farming Tips
| Updated on: Jun 07, 2026 | 4:55 PM
Share

शेतकरी आता नेहमीची पठडीतील पिके सोडून नवनवीन प्रयोग करत आहेत. लोक आता पारंपारिक भाज्या सोडून काही वेगळ्या जातीच्या भाज्या उगवणे पसंद करत आहेत. त्यामुळे बाजारात या नव्या जातीच्या भाज्यांना चांगले भाव मिळत आहेत. यात आता पांढरी वांगी म्हणजेच व्हाईट ब्रिजंलची मागणी खूप वाढली आहे. भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या पूसा लॅबने पांढरी वांगी -1 नावाचे नवीन वाण विकसित केले आहे.

वांग्याच्या या नव्या जातीमुळे कमी वेळात जास्त उत्पन्न मिळते. शेतकरी आणि बागायतीची आवड असणाऱ्यांनी हा नफ्याचा सौदा होणार आहे. या जातीच्या वांग्याचे प्रीमियम क्वालिटीच्या बिया राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून ऑनलाईन मिळत आहे. या बियांना घर बसल्या ऑर्डर करु शकता. चला पूर्ण माहिती पाहूयात.. पांढरी वांगी उगवण्याची पद्धत –

कृषी तज्ज्ञाच्या मते यास उगवण्यासाठी पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या सुपिक जमीन आणि पुरेशा सूर्यप्रकाशाची गरज असते. चांगले उत्पन्न येण्यासाठी बिया पेरण्यासाठी जमिनीची चांगली मशागत आणि संतुलित खतांचा वापर करणे गरजेचे असते. तर तुम्ही नियमित पाणी मिळण्याची काळजी घेतली तर वांग्याची ही व्हरायटी कमी पाणी आणि बदलत्या हवामानाच्या आव्हानातही चांगले उत्पन्न देते.

पेरणीची योग्य वेळ

पांढऱ्या वांग्यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे याच्या बिया पेरल्यानंतर केवळ ५० ते ५५ दिवसात पिक संपूर्णपणे कापण्यासाठी तयार होते. याच्या पेरणीसाठी उत्तर भारतात फेब्रुवारी ते मार्च आणि जून ते जुलै या दरम्यानचा काळ सगळ्यात बेस्ट मानला जातो. तर दक्षिण भारतात शेतकरी वर्षभर या वांग्याची शेती करु शकतात

घर बसल्या ऑनलाईन बिया मागवा

जर तुम्ही किचने गार्डन किंवा शेतासाठी या वांग्याच्या बिया खरेदी करु इच्छीत असाल तर तुम्हाला कुठे बाहेर जाण्याची अजिबात गरज नाही. राष्ट्रीय बिया महामंडळाच्या ऑनलाईन स्टोरवर जाऊन तुम्ही खूप कमी किंमतीत या बियांना बुक करु शकता. एडव्हान्स जातीच्या १० ग्रॅमच्या बियांचे पाकिटाची किंमत केवळ ८० रुपये आहे. ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर या बिया थेट तुमच्या घरी डिलिव्हरी केल्या जातील.

बाजारात पांढरी वांग्यांना त्यांचा अनोखा रंग आणि चवीमुळे चांगली मागणी आहे. त्यामुळे केवळ ८० रुपयांच्या किंमतीच्या बियांमुळे तुम्हाला चांगले वांग्याचे उत्पन्न मिळून तुम्ही लाखो रुपये कमावू शकता.

Follow Us
7 महिन्यांपासून पगार नाही; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
Pune : 7 महिन्यांपासून पगार नाही, 230 कामगार संकटात; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
Dilip Lande : शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मास्तर ढसाढसा रडले
NCP : नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मतदानाच्या काही तास आधी...कराळे मास्तर ढसाढसा रडले, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल...
Sanjay Raut : 500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल; अमित शहा, फडणवीस अन् शिंदेंना काय दिलं आव्हान
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल