पालघरमध्ये रणवीर सिंगने चिकूच्या बागेत पिकवली स्ट्रॉबेरी

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुका लज्जतदार चिकूसाठी प्रसिद्ध आहे. तर जव्हार तालुका मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखला (strawberry farm in palghar)  जातो.

पालघरमध्ये रणवीर सिंगने चिकूच्या बागेत पिकवली स्ट्रॉबेरी
Follow us
| Updated on: Dec 24, 2019 | 10:48 PM

पालघर : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुका लज्जतदार चिकूसाठी प्रसिद्ध आहे. तर जव्हार तालुका मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखला (strawberry farm in palghar)  जातो. त्यामुळे की काय पालघरमधील जमिनीत महाबळेश्वर किंवा हरियाणासारखी स्ट्रॉबेरीची शेतीचा यशस्वी प्रयोग धोका पत्करून करण्यात आला आहे . डहाणू तालुक्यातील ब्राम्हणवाड़ी येथे हरियाणाचा शेतकरी रणवीर सिंग याने स्ट्रॉबेरी लागवड करण्याचा अनोखा प्रयोग केला. त्यामुळे पालघर जिल्ह्यात स्ट्रॉबेरीची शेती करण्याचा प्रयत्न झाला. तसेच या पिकाची नैसर्गिकरित्या होणारी वाढ कौतुकास्पद ठरली (strawberry farm in palghar)  आहे.

रणवीर सिंग (वय 43) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे रणवीर सिंग यांनी कृषी पदविकामध्ये पीएचडी केली आहे. आपल्या मित्रासोबत भागीदारीत त्याने ही लागवड केली आहे. याकरिता त्यांनी डहाणू तालुक्यातील ब्राम्हणवाड़ी येथे 7 एकर शेती वर्षाला 2 लाख रुपये भाड़ेतत्वावर घेऊन हा अनोखा प्रयोग केला आहे.

रणवीर सिंग यांना या गावात 8 महीने झाले. या काळात त्याने 8 हजार स्ट्रॉबेरी रोपे महाबलेश्वर वाई येथून आणली. त्याची अर्धा एकर पेक्षा कमी जागेत लागवड केली. यासाठी त्याला वर्षाला एकूण खर्च दीड लाख रुपये इतका होणे अपेक्षित (strawberry farm in palghar)  आहे.

हा प्रयोग यशस्वी झाला तर त्यांना वर्षाकाठी 5 लाख रुपये इतके उत्पन्न मिळू शकते. या शेतीकरिता त्याना वातावरणात आवश्यक तापमान मिळत नसल्याने समस्या होत होत्या. सध्या या परिसरात 29 अंश सेल्सिअस तापमान असून या पिकाच्या वाढीसाठी 25 ते 28 अंश सेल्सिअस तापमान लागते. रणवीर यांनी संपूर्ण शेती ऑर्गनिक खते वापरून केली. त्यांचा या प्रयोगाने आदिवासी शेतकऱ्यांना ही प्रेरणा मिळणार (strawberry farm in palghar)  आहे.

“स्ट्रॉबेरी हे उतपन्न महाराष्ट्रामधील महाबळेश्वर येथे आणि हरियाणामधील ईसार येथे मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या फ़ळाचे वैशिष्ट्य म्हणजे कमी जागेत जास्ती उतपन्न देते. जवळपास 1 एकर मध्ये 30 हजार रोप लागवड करता येतात. तसेच याकरिता वर्षाला 5 लाख रुपये वर्षाला खर्च होतो. तर यातून खर्च काढून 5 ते 6 लाख नफा मिळतो. हरियाणामधील स्टोबेरी 30 मिमी पर्यंत असतात. त्यामानाने महाबळेश्वर मधील 25 मिमी पर्यंत असतात,” अशी माहिती रणवीर सिंग यांनी दिली.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.