Toor Crop : हमीभावापेक्षा दरवाढीवरच शेतकऱ्यांचे लक्ष, सोयाबीनचेच सूत्र तुरीलाही लागू..!

| Updated on: Mar 20, 2022 | 2:20 PM

'नाफेड' च्यावतीने राज्यभर तूर हमीभाव केंद्र उभारुन आता दोन महिन्याचा कालावधी लोटला आहे. हंगामाच्या सुरवातीला बाजारभावापेक्षा खरेदी केंद्रावर अधिकचा दर असल्यामुळे शेतकरी आता खरेदी केंद्रावरच तूर विकणार असे चित्र होते. पण दोन महिन्यानंतरही शेतकऱ्यांची भूमिका ही वेगळीच असल्याचे दिसत आहे. कारण दोन महिन्यांमध्ये केवळ 1 हजार 260 टनच तूर हमीभाव केंद्रावर खरेदी झाली आहे. विशेष म्हणजे अजूनही खुल्या बाजारात हमीभाव केंद्रापेक्षा दर कमी असताना हे चित्र आहे.

Toor Crop : हमीभावापेक्षा दरवाढीवरच शेतकऱ्यांचे लक्ष, सोयाबीनचेच सूत्र तुरीलाही लागू..!
तुरीला अपेक्षित दर नसल्यामुले बाजारपेठेत तुरीची आवक घटली आहे.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

लातूर : ‘नाफेड’ च्यावतीने राज्यभर (Toor Crop) तूर हमीभाव केंद्र उभारुन आता दोन महिन्याचा कालावधी लोटला आहे. हंगामाच्या सुरवातीला बाजारभावापेक्षा खरेदी केंद्रावर अधिकचा दर असल्यामुळे शेतकरी आता खरेदी केंद्रावरच तूर विकणार असे चित्र होते. पण दोन महिन्यानंतरही (Farmer) शेतकऱ्यांची भूमिका ही वेगळीच असल्याचे दिसत आहे. कारण दोन महिन्यांमध्ये केवळ 1 हजार 260 टनच तूर (Guarantee Price Centre) हमीभाव केंद्रावर खरेदी झाली आहे. विशेष म्हणजे अजूनही खुल्या बाजारात हमीभाव केंद्रापेक्षा दर कमी असताना हे चित्र आहे. यंदा सोयाबीन, कापूस याप्रमाणेच तुरीच्या उत्पादनात घट झाली आहे. ज्याप्रमाणे सोयाबीन आणि कापसाचे दर हंगामाच्या अंतिम टप्प्यात वाढले अशीच स्थिती तुरीबाबत होईल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे. त्यामुळेच ना खरेदी केंद्रावर ना खुल्या बाजारात तर तूर शेतकऱ्यांच्या घरीच असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

यामुळे घटले तुरीचे उत्पादन

अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरिपातील सोयाबीन आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र, तूर पिकावर याचा परिणाम झाला नव्हता. एवढेच नाही तर या पावसामुळे तुरीचे पीक बहरले होते. असे असताना हंगामाच्या अंतिम टप्प्यात अवकाळी आणि ढगाळ वातावरणामुळे शेंग पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे उत्पादनात घट झाली होती. शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन पदरी पडलेले नाही.

शेतकऱ्यांना काय आहे अपेक्षित?

सोयाबीन आणि कापसाबाबत शेतकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचा काय परिणाम झाला हे यंदा पाहयला मिळाले आहे. केवळ साठवणूक केल्याने दुपटीने अधिकचा दर कापूस आणि सोयाबीनला मिळालेला आहे. उत्पादनात घट झाल्याने यामध्ये दरवाढ होणार हा विश्वास शेतकऱ्यांना होता. त्यामुळे लागलीच सोयाबीन आणि कापसाची विक्री न करता पाच महिने हे पीक शेतकऱ्यांनी साठवलेच. त्यामुळेच कापसाला 11 हजार तर सोयाबीनला 7 हजार 600 पर्यंतचा दर मिळाला होता. हीच अपेक्षा शेतकऱ्यांना तुरीपासून आहे. त्यामुळे शेतकरी ना खरेदी केंद्रावर ना खुल्या बाजारपेठेत विक्री करीत आहे. शेतकऱ्यांना वाढीव दराची अपेक्षा आहे.

काय आहे बाजारपेठेतले चित्र ?

राज्यातील 32 जिल्ह्यांमध्ये तूर हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. शिवाय नाफेडने तुरीसाठी 6 हजार 300 चा दर ठरवून दिला आहे. असे असाताना दुसरीकडे खुल्या बाजारात 5 हजार 900 ते 6 हजार 200 पर्यंतचा दर मिळत आहे. हा सरासरी एवढा दर असतानाही शेतकऱ्यांना अपेक्षित दराची प्रतिक्षा आहे. त्यामुळे तुरीचे दर वाढणार की शेतकऱ्यांना शेवटी खरेदी केंद्रावरच विक्री करावी लागणार हे पहावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Positive News: संकटावर मात करुन द्राक्षाचा गोडवा सातासमुद्रा पार, सर्वाधिक निर्यात नाशिकातून

Cotton Crop : कापसाला विक्रमी दर, आता बियाणांसाठीही मोजावे लागणार अधिकचे पैसे, वेध खरिपाचा

Agricultural Pump: अहो खरंच..! शेतकऱ्यांच्या हितासाठी महावितरणचे अधिकारी रस्त्यावर, आता उरले 11 दिवस