Cotton Crop : कापसाला विक्रमी दर, आता बियाणांसाठीही मोजावे लागणार अधिकचे पैसे, वेध खरिपाचा

Cotton Crop : कापसाला विक्रमी दर, आता बियाणांसाठीही मोजावे लागणार अधिकचे पैसे, वेध खरिपाचा
संग्रहीत छायाचित्र

कापसाच्या वाढीव दराचा परिणाम हा आगामी खरीप हंगामापर्यंत जाणवणार आहे. आतापर्यंत वाढत्या दरामुळे जिनिंग चालक तसेच व्यापारी त्रस्त होते. सध्या कापूस हंगाम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, यानंतर शेतकऱ्यांना वाढत्या बियाणाच्या दराचा सामना करावा लागणार आहे. यंदा कापसाला विक्रमी असा 11 रुपये क्विंटलचा दर मिळाला असल्याने आगामी खरिपात कापसाचे क्षेत्र वाढणार हे साहजिकच आहे. असे असतानाच 'बीजी 2' या बियाणाच्या पाकिटाच्या दरात तब्बल 43 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राजेंद्र खराडे

|

Mar 20, 2022 | 11:46 AM

औरंगाबाद : कापसाच्या वाढीव दराचा परिणाम हा आगामी (Kharif Season) खरीप हंगामापर्यंत जाणवणार आहे. आतापर्यंत वाढत्या दरामुळे जिनिंग चालक तसेच व्यापारी त्रस्त होते. सध्या कापूस हंगाम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, यानंतर शेतकऱ्यांना वाढत्या बियाणाच्या दराचा सामना करावा लागणार आहे. यंदा (Cotton Rate) कापसाला विक्रमी असा 11 रुपये क्विंटलचा दर मिळाला असल्याने आगामी खरिपात कापसाचे क्षेत्र वाढणार हे साहजिकच आहे. असे असतानाच (Cotton Seeds) ‘बीजी 2’ या बियाणाच्या पाकिटाच्या दरात तब्बल 43 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा अधिसूचनाच सरकारने काढल्या आहेत. बियाणे उत्पादन, संशोधन आणि त्यावर होणाऱ्या खर्चाचा विचार करीता बियाणे दरात वाढ होण्याची अपेक्षा बियाणे उत्पादक कंपन्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार ‘बीजी 1’ चे दर आहे तेच ठेवण्यात आले आहेत. तर दुसरीकडे अधिकची मागणी असलेल्या ‘बीजी2’या बियाणे पाकिटात तब्बल 43 रुपायांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता वाढीव दरात कापसाची विक्री केली तर वाढीव दरानेच बियाणे खरेदी करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावणार आहे.

उद्योजकांचे समाधान, शेतकऱ्यांना आर्थिक फटका

कापसाच्या बियाणे निर्मितीमधील वाढता खर्च पाहता बियाणे दरात वाढ करण्याची अपेक्षा उद्योजक व्यक्त करीत होते. त्यानुसार ‘बीजी2’ च्या दरात वाढ करण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे ‘बीजी1’ मध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. शिवाय झालेली वाढ ही अत्यल्प असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे कापसाच्या वाढीव दराचा सर्वच शेतकऱ्यांना फायदा झाला असे नाही किंवा सर्वच शेतकऱ्यांना विक्रमी दर मिळाला असेही नाही. त्यामुळे भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेता हे दर वाढवले असल्याचा आरोप केला जात आहे. यंदा कापसाला विक्रमी दर मिळाल्याने आगामी क्षेत्रात वाढ होणार असल्याचा अंदाज आहे.

कापूस बियाणे दरात काय झाले बदल?

कापूस बियाण्याचे दर वाढलेले आहेत. शिवाय यंदापासूनच नवीन दराची अंमलबजावणी होणार आहे. ‘बीजी1’ आणि ‘बीजी2’ या बियाणांची निर्मिती करणाऱ्या देशभर कंपन्या आहेत. बियाणे तयार करण्यासाठी होणारा खर्च वाढलेला आहे. त्यामुळे ‘बीजी2’ हे बियाणाचे पाकीट गतवर्षी 767 रुपायांना होते ते आता 810 रुपायांना मिळणार आहे. यामध्ये 43 रुपायांची वाढ करण्यात आली असून यासंबंधीच्या अधिसूचना कृषी व शेतकरी कल्याण विभागाने काढलेल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामापासूनच वाढीव दराने शेतकऱ्यांना बियाणांची खरेदी करावी लागणार आहे.

यंदा कापसाचे क्षेत्रही वाढणार

कापसाला मिळालेला विक्रमी दर आणि वर्षानुवर्षे घटत चालले क्षेत्र यामध्ये आता यंदा बदल होईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केलेला आहे. कधी नव्हे ते कापसाला 11 हजार रुपये क्विंटल असा दर मिळाला होता. त्यामुळे शेतकरी यावेळी कापूस लागवडीवर भर देणार आहेत. बियाणे दरात वाढ झाली तरी त्याचा परिणाम क्षेत्रावर होणार नाही. शेतकऱ्यांना केवळ वाढीव उत्पादनाची आणि वाढीव दराची अपेक्षा असल्याचे लातूरचे कृषी अधिक्षक दत्तात्रय गवसाने यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Agricultural Pump: अहो खरंच..! शेतकऱ्यांच्या हितासाठी महावितरणचे अधिकारी रस्त्यावर, आता उरले 11 दिवस

Mango : अवकाळीनंतर वाढीव तापमानाचा धोका, उन्हामुळे भाजलेल्या आंब्याचे होते तरी काय ?

Washim : खरिपातील दोन्ही शेतीमालाच्या दरात घसरण, शेतकऱ्यांचे ‘टायमिंग’ चुकले

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें