Positive News: संकटावर मात करुन द्राक्षाचा गोडवा सातासमुद्रा पार, सर्वाधिक निर्यात नाशिकातून

जिथे उत्पादनाची शाश्वती नव्हती तिथे कशाची आलीयं निर्यात. यंदा द्राक्ष निर्यात सोडा पण बागेचा मालही पदरी पडतो की नाही अशी स्थिती निर्माण झाली होती. लागवडीपासूनच निसर्गाचा लहरीपणा काय असतो याची प्रचिती यंदा द्राक्ष बागायत शेतकऱ्यांना आली होती. महिन्यातून एकदा तरी अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण अन्यथा गारपिट ही ठरलेलीच. त्यामुळे उत्पादनावरील खर्च हा दुपटीने वाढला होता. शिवाय बागा अर्ध्यातून सोडता येत नव्हत्या.

Positive News: संकटावर मात करुन द्राक्षाचा गोडवा सातासमुद्रा पार, सर्वाधिक निर्यात नाशिकातून
प्रतिकूल परस्थितीमधूनही यंदा नाशिक जिल्ह्यातून द्राक्ष निर्यात झाली आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 5:03 PM

लासलगाव : जिथे उत्पादनाची शाश्वती नव्हती तिथे कशाची आलीयं निर्यात. यंदा (Grape Export) द्राक्ष निर्यात सोडा पण बागेचा मालही पदरी पडतो की नाही अशी स्थिती निर्माण झाली होती. लागवडीपासूनच (The vagaries of nature) निसर्गाचा लहरीपणा काय असतो याची प्रचिती यंदा द्राक्ष बागायत शेतकऱ्यांना आली होती. महिन्यातून एकदा तरी अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण अन्यथा गारपिट ही ठरलेलीच. त्यामुळे (Grape Production) उत्पादनावरील खर्च हा दुपटीने वाढला होता. शिवाय बागा अर्ध्यातून सोडता येत नव्हत्या. हे कमी म्हणून की काय निर्यातीच्या दरम्यानच कंटेनरच्या भाड्यामध्ये झालेली वाढ. चोहीबाजूने संकटे असतानाही हंगामाच्या अंतिम टप्प्यात का होईना सकारात्मक बाब घडली आहे. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत यंदा तब्बल 68 हजार 465 मेट्रीक टन द्राक्षाची निर्यात देशातून झाली आहे. यामध्ये सर्वाधिक वाटा हा नाशिक जिल्ह्याचाच राहिला असून त्यापाठोपाठ सांगली जिल्ह्यातून निर्यात झाली आहे. कीड-रोगराई, अवकाळी आणि थंडी यामुळे थेट द्राक्षाच्या दर्जावर परिणाम झाला होता असे असतानाही निर्याती योग्य द्राक्ष तयार करण्यात यश आले आहे. दरवर्षीपेक्षा निर्याचीचे प्रमाण कमी असले तरी ओढावलेल्या परस्थितीतून झालेली निर्यात दिलासादायकच आहे.

5 हजार 68 कंटनेरने निर्यात

राज्यात नाशिक आणि सांगली जिल्ह्यात निर्यातक्षम द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यामध्ये नाशिक जिल्ह्यात निफाड, दिंडोरी, चांदवड, सटाणा, देवळा आणि मालेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षांची लागवड करण्यात आली आहे.अवकाळी पाऊस, कडाक्याची थंडी यासारखे अनेक संकटावर मात करत द्राक्ष निर्यातीचा हंगाम अंतिम टप्प्यात आलेला असून 18 मार्च पर्यंत 5 हजार 68 कंटेनर मधून 68 हजार 465 मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहे.निर्यातदारांकडून ज्या दर्जाची मागणी होत होती त्याची पूर्तता करण्यात यश आल्याचे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे नाशिक विभागाचे रामनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

नैसर्गिक संकटावर मात करुन हंगाम अंतिम टप्प्यात

7 जानेवारीपासून द्राक्ष हंगामाला सुरवात होते. तेव्हापासूनच निसर्गाच्या लहरीपणालाही सुरवात झाली होती. महिन्यातून किमान एकदा तरी अवकाळी पाऊस किंवा ढगाळ वातावरण हे ठरलेलेच. त्यामुळे सुरवातीला द्राक्ष बागांवर त्याचा परिणाम झाला. बागा जोपासण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली होती. शिवाय वाढत्या थंडीमुळे द्राक्षाला तडे जाऊ नयेत म्हणून रात्रीचा दिवस करुन शेतकऱ्यांनी बागेमध्येच शेकोट्या पेटवून द्राक्षांचे संरक्षण केले होते. तर तोडणीच्या दरम्यान पुन्हा अवकाळीने नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात हजेरी लावली होती.

यंदाची द्राक्ष निर्यात आकडेवारी (मॅट्रिक टन)

आतापर्यंत  नेदरलॅन्ड –  46,532 मे टन,  युके –   6356 मे टन, जर्मनी –  6061मे टन, पोलंड –  3446 मे टन, डेन्मार्क –  858 मे टन, स्पेन –      736 मे टन अशी निर्यात झाली आहे.

द्राक्ष निर्यात आलेख

2017-18 -188221  मॅट्रिक टन निर्यातीतून   1 हजार 900 करोड उत्पादन मिळाले तर 2018-19 – 246133  मॅट्रिक टन निर्यातीमधून  2 हजार 335 करोड रुपये, 2019 -20 193690  मॅट्रिक टनाच्या निर्यातीमधून 2 हजार 177 करोड रुपये व गतवर्षी 246107 मॅट्रिक टन निर्यातीमधून 2 हजार 298 कोटीचे उत्पन्न मिळाले होते.

संबंधित बातम्या :

Photo Gallery : बीडात यंदाच्या हंगामात 400 एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्यांच्या काळजाचं पाणी-पाणी

Cotton Crop : कापसाला विक्रमी दर, आता बियाणांसाठीही मोजावे लागणार अधिकचे पैसे, वेध खरिपाचा

Agricultural Pump: अहो खरंच..! शेतकऱ्यांच्या हितासाठी महावितरणचे अधिकारी रस्त्यावर, आता उरले 11 दिवस

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.