सोलापूरमध्ये दोन वर्षात 53 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, केवळ 16 कुंटुबांना सरकारी मदत

| Updated on: Mar 20, 2021 | 12:13 AM

सोलापूर जिल्ह्यात मागील दोन वर्षात एकूण 53 शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे. Farmers committed suicide solapur

सोलापूरमध्ये दोन वर्षात 53 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, केवळ 16 कुंटुबांना सरकारी मदत
सांकेतिक फोटो
Follow us on

सोलापूर: आम्ही सत्तेत आल्यानंतर जगाच्या पोशिंद्याला अशी मदत करू, तशी मदत करू, अशा जाहीर बतावण्या प्रत्येक राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून जाहीर व्यासपीठावरून केल्या जातात. मात्र, वास्तविक कोणत्याही पक्षाचे सरकार सत्तेत आल्यानंतर या बतावण्या दूर तर जातात शिवाय शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अटी आणि नियमांकडे बोट दाखवले जाते. त्यामुळे कधी कधी शेतकऱ्याला आपलं सगळं काही संपलं असं वाटून थेट मृत्यूला कवटाळण्याच्या अनेक घटना घडत आहेत. सोलापूर जिल्ह्यात मागील दोन वर्षात एकूण 53 शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे. (Fifty Three Farmers commited suicide during last two years in Solapur)

सोलापूरमध्ये केवळी 16 कुटुंबांना लाभ

विशेष म्हणजे 53 पैकी 16 शेतकऱ्यांना मृत्यू पश्चात शासकीय मदत मिळाली आहे, तर उर्वरित 37 शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सरकारच्या निकषानुसार नव्हत्या. म्हणून त्यांना मदत नाकारण्यात आली आहे, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांनी मदतीसाठी केलेल्या अर्जावर 37 शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सरकारी निकषात बसत नसल्यामुळे त्यांना मदत नाकारण्यात आल्याचा शेरा मारण्यात आला आहे.

दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा

19 मार्च 1986 ला महाराष्ट्रात पहिल्यांदा एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना सुमारे पस्तीस वर्षापूर्वी घडली होती. पस्तीस वर्षांनंतरही शेतकऱ्यांचा हालअपेष्टा संपल्या नाहीत. निसर्गाच्या भरवशावर बळीराजा काळ्या आईची पेरणी करतो. मात्र, या शेतकऱ्याला निसर्गाचा लहरीपणा मोठा नडतो. कधी कोड्या दुष्काळाने तर कधी ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांच्या उद्या शेतातील पिके नष्ट होतात, त्यामुळे या पिकावर बघितलेल्या स्वप्नांचा चुराडा होतो आणि शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढतच राहतो, यातूनच शेतकरी आत्महत्या च्या घटना घडत आहेत.

80 टक्के आत्महत्या सरकारी निकषाबाहेर

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांच्या मृत्यूपश्चात कुटुंबीयांना एक लाख रुपयांची सरकारी मदत देण्याची योजना आहे, मात्र सरकारच्या या योजनेत 70 ते 80 टक्के शेतकरी बसत नाहीत त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना मलती पासून दूर राहावे लागत आहे,,

त्या 19 मार्चला नेमकं काय घडलं होतं?

गेल्या काही काळापासून महाराष्ट्रातले शेकडो किसानपूत्र 19 मार्चला एक दिवसाचा अन्नत्याग करतात. पण 19 मार्चच का? असा सवाल तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आहे, पहिली शेतकरी आत्महत्या. यवतमाळ जिल्ह्यातल्या चिलगव्हाणचे शेतकरी साहेबराव करपे यांनी कुटुंबासह विष घेऊन आजच्याच दिवशी आत्महत्या केली होती. ते साल होतं 1986. त्या दिवशी साहेबराव करपे, पत्नी आणि चार मुलांना घेऊन विनोबांच्या पवनारला गेले. परत आले. रात्री जेवण तयार केले. त्यात विष कालवले, सर्व मुलांना जेवू घातले, स्वत: केले आणि मृत्यूला कवटाळले. साहेबरावांची सहकुटुंब आत्महत्या ही फक्त महाराष्ट्रच नाही तर देशातली पहिली सामुहिक शेतकरी आत्महत्या मानली जाते. त्यानंतर जवळपास 5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

संबंधित बातम्या:

पहिल्या शेतकरी आत्महत्येचं कारण तुम्हाला माहिती आहे? का शेकडो किसानपुत्र आज दिवसभरासाठी अन्नत्याग करतायत? वाचा सविस्तर…

(Fifty Three Farmers committed suicide during last two years in Solapur)