संभाजी ब्रिगेडने अडविला पालकमंत्र्यांचा ताफा, सक्तीच्या वीजबिल वसुलीवर भरणे मामांनी काय सांगितला मधला मार्ग?

| Updated on: Mar 06, 2022 | 4:20 PM

कृषीपंपाकडील वाढती थकबाकी आणि सक्तीची वीजबिल वसुली हा विषय आता सबंध राज्यात पेटलेला आहे. रब्बी हंगामामुळे शेतकऱ्यांचा हात दगडाखाली अडकलेला आहे तर वीजबिल वसुली केल्याशिवाय पर्यायच नसल्याचे कारण देत महावितरणकडून वसुली मोहीम राबवली जात आहे. कृषीपंपाकडील वसुली अदा करुनही विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा ताफा पुणे-सोलापूर मार्गावरील टेंभुर्णी येथे अडविला.

संभाजी ब्रिगेडने अडविला पालकमंत्र्यांचा ताफा, सक्तीच्या वीजबिल वसुलीवर भरणे मामांनी काय सांगितला मधला मार्ग?
कृषीपंपाची वीजबिलापोटी सक्तीची वसुली केली जात आहे. त्यामुले संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा ताफा अडिवला होता.
Follow us on

माढा: संदीप शिंदे :  (Agricultural Pump) कृषीपंपाकडील वाढती थकबाकी आणि सक्तीची वीजबिल वसुली हा विषय आता सबंध राज्यात पेटलेला आहे. (Rabi Season) रब्बी हंगामामुळे शेतकऱ्यांचा हात दगडाखाली अडकलेला आहे तर (Electricity Bill Recovery) वीजबिल वसुली केल्याशिवाय पर्यायच नसल्याचे कारण देत महावितरणकडून वसुली मोहीम राबवली जात आहे. कृषीपंपाकडील वसुली अदा करुनही विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा ताफा पुणे-सोलापूर मार्गावरील टेंभुर्णी येथे अडविला. शिवाय सक्तीच्या वसुलीतून शेतकऱ्यांची मुक्तता करण्याची मागणी केली. यावर हजरजबाबी पालकमंत्री यांनीही तोडगा सांगितला. शेतकऱ्यांची परस्थिती ही नाजूक आहे. शिवाय वाढती थकबाकी हा केवळ सोलापूर जिल्ह्याचाच विषय नसून राज्याचा झाला आहे. त्यामुळे सक्तीची वसुली न करता बिलाचे टप्पे पाडण्याची मागणी कॅबिनेटच्या बैठकीत करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पालकमंत्र्यांनी सांगितला हा मार्ग

सध्या महावितरण आणि शेतकऱ्यांची स्थिती ही समानच आहे. दोन्हीही घटक आर्थिक संकटात आहेत. पण वाढीव वीजबिल आणि सक्तीची वसुली ही शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे. त्यामुळे कृषीपंपाचा बिलभरणा हा टप्प्याटप्प्याने करण्याची मुबा देणे आवश्यक आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच ठरवून दिलेली रक्कम अदा केली आहे त्यांना पुन्हा सक्तीची वसुली आकारु नये. महावितरणने शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांनी महावितरणचा विचार केला तर हा प्रश्न मार्गी लागणार आहे. शिवाय मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत यावर वीजबिलावर तोडगा काढला जाणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

कृषीपंपाच्या थकबाकीपोटी हंगाम सुरु होतानाच शेतकऱ्यांनी प्रति कृषीपंपाला घेऊन 5 हजार रुपये अदा केले आहेत. असे असताना पुन्हा महावितरणकडून सक्तीची वसुली केली जात आहे. शिवाय सुरळीत विद्युत पुरवठा नसल्याने पिकांचे नुकसान होत आहे. पोषक वातावरणामुळे पिके जोमात आहेत पण आता ऐनवेळी पाणी मिळत नसल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे. यापुर्वी कृषीपंपाच्या बिलापोटी रक्कम अदा करुनही पुन्हा वसुलीसाठी अधिकारी खेटे मारत आहेत. त्यामुळे पिकांची जोपासणा करावी कशी असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

संबंधित बातम्या :

Rabi Season: कडधान्याचे पीक गतवर्षी साधले यंदा नेमके काय झाले? पीक पध्दतीमध्ये बदल करुनही निराशाच

Sugar production: साखर उत्पादनात महाराष्ट्राचीच बाजी, यंदा हंगाम लांबणीवर, काय आहेत कारणे?

Rabi Crop: अखेर शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली, शेतीमालाला योग्य दर अन् आवक वाढली तरी चिंता नाही?