सोयाबीनच्या दराचा परिणाम आवकवर, शेतकऱ्यांचा निर्णय फायद्याचा का नुकसानीचा?

गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचे दर स्थिर राहिले तरी त्याचा आवकवर परिणाम झाला नव्हता पण आता दर घटताच त्याचा सर्वच बाजूंनी परिणाम पाहवयास मिळत आहे. वाढीव दराच्या अपेक्षेने सोयाबीनचा साठा शेतकऱ्यांनी केला होता. त्यानुसार दिवाळीनंतर दरही वाढले पण शेतकऱ्यांची अपेक्षा ही 9 हजाराची होती.

सोयाबीनच्या दराचा परिणाम आवकवर, शेतकऱ्यांचा निर्णय फायद्याचा का नुकसानीचा?
सोयाबीन संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 2:26 PM

लातूर : गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचे दर स्थिर राहिले तरी त्याचा आवकवर परिणाम झाला नव्हता पण आता दर घटताच त्याचा सर्वच बाजूंनी परिणाम पाहवयास मिळत आहे. वाढीव दराच्या अपेक्षेने (Soybean Stock) सोयाबीनचा साठा शेतकऱ्यांनी केला होता. त्यानुसार दिवाळीनंतर दरही वाढले पण  (Farmer) शेतकऱ्यांची अपेक्षा ही 9 हजाराची होती. आता अंतिम टप्प्यातील सोयाबीन सुरु आहे. असे असतानाही जानेवारी महिन्यात ज्याप्रमाणात दर वाढले होते ते दर टिकून राहिले नाहीत. गेल्या महिन्याभरात 6 हजार 600 वर गेलेले सोयाबीन आता 6 हजार 100 वर येऊन ठेपले आहे. दोन दिवसांपूर्वी दर हे कमी पण स्थिर होते असे असतानाही (Latur) लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 22 हजार पोत्यांची आवक ही सुरुच होती. मात्र, दरात 200 रुपयांची घट झाल्याने त्याचा परिणाम आवकवर झाला आहे. मंगळवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ 15 हजार पोत्यांची आवक झाली होती.

दर्जेदार सोयाबीनला अधिकचा दर

खरीप हंगामातील सर्वच पिकांचे हे पावसामुळे नुकसान झाले होते. आतापर्यंत चांगल्या प्रतीच्या माल विक्री करुन शेतकऱ्यांना चांगला दरही मिळालेला आहे पण सध्या साठवणूक केलेला माल बाजार समितीमध्ये दाखल होत आहे. मात्र, पावसामुळे तूर काळंवडलेली आहे तर सोयाबीनमध्ये माती आहे. त्यामुळे मालानुसार दर मिळत आहे. आता जे शेतकरी योग्य देखभाल करुनच माल विक्रीसाठी आणतील त्यालाच चांगला दर मिळणार आहे. त्यामुळे 5 हजारापासून ते 6 हजार 200 पर्यंतचे दर लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळत आहेत. गतआठवड्यात सोयाबीनची आवक वाढली होती पण गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा दर कमी झाल्याने शेतकऱ्यांनी आखडता हात घेतला आहे.

काय आहे बाजारपेठेकले वास्तव?

यंदा सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली असली तरी दर्जानुसार दर हे मिळालेले आहेत. या दरम्यान, मात्र शेतकऱ्यांनी घेतलेली भूमिकाही वेळोवेळी निर्णायक ठरलेली आहे. कारण दर कमी होताच शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीपेक्षा साठवणूकीवर भर दिला होता. तर अपेक्षित दरासाठी सातत्याने प्रतिक्षाच करावी लागली आहे. सध्या बाजारपेठेतले चित्र हे बदलत आहे. कारण शेतकऱ्यांकडे असलेले सोयाबीन हे सर्वोत्तम दर्जाचे नाही. शिवाय मागणीत वाढ नसल्याने एक तर दर स्थिर आहेत किंवा त्यामध्ये घट होत आहे. त्यामुळे हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांना अडचणीत यायचे नसेल तर दराचा विचार न करता टप्प्याटप्प्याने विक्री करणेच फायद्याचे राहणार असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Budget 2022 : नैसर्गिक आणि जैविक शेतीसंदर्भात अर्थसंकल्पात मोठ्या घोषणेची शक्यता, नरेंद्र मोदींचेही केमिकल फ्री शेतीचं आवाहन

अवकाळी, गारठ्यानंतर आता द्राक्ष बागायतदारांसमोर वेगळेच संकट, अंतिम टप्प्यात बागा सावरतेल का?

Kharif Season : खरिपातील शेतीमालाची आवक वाढली, आता दर्जानुसार मिळणार दर

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.