PM Kisan Yojana 24 व्या हप्त्याची तारीख ठरली, 2000 रुपये मिळवण्यासाठी तात्काळ करा हे काम

PM Kisan 24th Installment : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 24 व्या हप्त्याची तारीख ठरली आहे. या योजनेतंर्गत पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळतात. पण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही निकष पूर्ण करावे लागतात.

PM Kisan Yojana 24 व्या हप्त्याची तारीख ठरली, 2000 रुपये मिळवण्यासाठी तात्काळ करा हे काम
PM Kisan Yojana
| Updated on: Oct 26, 2026 | 6:46 PM

PM Kisan 24th Installment : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या कोटयवधी शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. पीएम किसानच्या 24 व्या हप्त्याची तारीख समोर आली आहे. योजनेचा 24 वा हप्ता 30 ऑक्टोंबर 2026 ला मिळणार आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 2000 रुपये जमा होतील. जर, तुम्ही या योजनेचा लाभार्थी असाल आणि हप्ता वेळेवर कुठल्याही अडचणीशिवाय तुमच्या खात्यात जमा व्हावा अशी तुमची इच्छा असेल तर काही आवश्यक काम वेळेत पूर्ण करा. खासकरुन e-KYC. आधार आणि बँक खात्याशी संबंधित माहिती जरुर चेक करा.

पीएम किसान योजनेचा हप्ता कुठल्याही अडचणीशिवाय तुमच्या खात्यात जमा व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर e-KYC करणं आवश्यक आहे. त्याशिवाय आधार, बँक खातं आणि जमिनीच्या रेकॉर्डची माहिती सुद्धा योग्य असली पाहिजे. यात जर काही गडबड असेल, तर हप्ता मिळायला विलंब होऊ शकतो.

Loading...

शेतकरी या पद्धतीने e-KYC पूर्ण करु शकतात

– पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर OTP च्या माध्यमातून.

– पीएम किसान मोबाइल APP वर फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून.

– जवळच्या कॉमन सर्विस सेंटरवर (CSC) जाऊन

– आधार आणि बँक खात्याची माहिती सुद्धा चेक करा.

हप्त्याचे पैसे कधी अडकू शकतात?

शेतकऱ्यांनी हे सुद्धा तपासलं पाहिजे की, त्यांचं बँक खात आधारशी लिंक आहे का, DBT च्या माध्यमातून पैसा घेण्यासाठी सुरु आहे का, त्याशिवाय पोर्टसवर जमीन रेकॉर्ड्सच वेरिफिकेशन पूर्ण होणं आवश्यक आहे. आधार कार्ड आणि पीएम किसान रजिस्ट्रेशनच्या नावाची माहिती सुद्धा एकसारखीच असली पाहिजे. नाव आणि दुसऱ्या माहितीमध्ये फरक असेल तो हप्त्याचे पैसे अडकू शकतात.

किती हजार कोटी ट्रान्सफर केलेले?

पीएम किसान सम्मान निधि योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. हे पैसे तीन हप्त्यांमध्ये मिळतात. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 हजार रुपये ट्रान्सफर केले जातात. याआधी या योजनेचा 23 वा हप्ता 20 जून 2026 रोजी रिलीज केलेला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या तारकेश्वरमधून 9.44 कोटीपेक्षा जास्त शेतकरी खात्यात 18,880 कोटी रुपये ट्रान्सफर केलेले.

कधीपर्यंत ही योजना सुरु राहणार?

पीएम किसान सम्मान निधि योजना 2019 मध्ये सुरु झालेली. पात्र शेतकऱ्यांना शेती आणि दुसऱ्या गरजांसाठी आर्थिक मदत देणं या मागचा उद्देश आहे. योजनेतंर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 4.46 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर झाली आहे. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2030-31 पर्यंत ही योजना सुरु ठेवायला परवानगी दिली आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us