Rabbi Seasons: दुष्काळाशी सामना करणारे वाण, कमी पाण्यात हरभरा, करडई आणि ज्वारी ठरणार फायदेशीर

Rabi Season Crop : सध्या राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. अशावेळी कमी पाण्यात कोणतं पीक घेता येईल याच चिंतेत शेतकरी आहे. मुबलक पाणी असेल तर शेतकऱ्यांना दुष्काळाशी सामना करणारे वाण फायदेशीर ठरू शकते.

Rabbi Seasons: दुष्काळाशी सामना करणारे वाण, कमी पाण्यात हरभरा, करडई आणि ज्वारी ठरणार फायदेशीर
दुष्काळाशी सामना करणारे वाण, कमी पाण्यात हरभरा, करडई आणि ज्वारी ठरणार फायदेशीर
| Updated on: Oct 23, 2026 | 2:34 PM

Rabi Season Crop : राज्यातील अनेक भागात अपुरा पाऊस झाला. अल निनोमुळे दुष्काळाचे सावट पसरले आहे. कोरडवाहू शेतकरी चिंतेत आहे. आता परतीच्या पावसाची थोडीफार आशा आहे. कमी पाण्याचे योग्य नियोजन आणि योग्य पिकांची निवड करणे अशावेळी आवश्यक आहे. दुष्काळी परिस्थितीत योग्य वाण शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते. कमी पाण्यात हरभरा, करडई आणि ज्वारीचे हे वाण तुम्हाला चांगलं उत्पादन देऊ शकतात.

दुष्काळात कोरडवाहू शेतकर्‍यांनी कोणती पीकं घ्यावीत?

Loading...

कोरडवाहू शेतीत कमी पाण्यात आणि कमी कालावधीत येण्याऱ्या वाणाची रब्बी हंगामात निवड केल्यास मदत होऊ शकते. ही वाणं दुष्काळाशी सामान करू शकतात. कमी पाण्यात आणि वातावरणात तग धरून चांगले उत्पादन मिळू शकते.

ज्वारीचे वाण: मालदांडी (M 35-1), फुले यशोदा, फुले माऊली

हरभरा : विजय, विशाल, अथवा दिग्विजय यासारखी वाणं कोरडवाहू जमिनीसाठी चांगली मानली जातात

करडई: हे पीक सुद्धा अत्यल्प पाण्यात आणि कमी खर्चात चांगले उत्पादन देते

कडधान्ये: मूग, उडीद, हुलगा (कुळीथ), सूर्यफुल

आंतरपीक पद्धत: ज्वारी सोबत हरभरा, अथवा करडई आणि हरभरा असे आंतरपीक घेता येऊ शकते

दुष्काळात या उपाय योजना करा

मातीतील ओलावा टिकवा : दुष्काळात थोडेबहुत पाणी असल्यास पाण्याचा योग्य वापर महत्त्वाचा ठरतो. त्यासोबतच मातीत पाण्याचा ओलावा टिकावा यासाठी शेतातील काडीकचरा, ऊसाचे पाचट, प्लॅस्टिक आच्छादनाचा प्रयोग करू शकता. यामुळे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन रोखले जाते.

सुक्ष्म सिंचनाचा प्रयोग: ठिंबक सिंचन, तुषारचा वापर केल्यास पाण्याची मोठी बचत होईल आणि योग्य वेळी पिकांना पाणी मिळते.

पेरणीपूर्वी बियाण्यांना जीवाणू संवर्धक लावा आणि पोटॅशियम नायट्रेट अथवा स्प्रेडरचा वापर करा. यामुळे पिकांची मूळ मजबूत होतात . कृषी तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. तुमच्या जमिनीचा पोत, तिचे आरोग्य याचे रिपोर्ट कार्ड काढा आणि त्याआधारे वाणाची निवड करून पेरणी करा. दुष्काळाची स्थिती पाहता कमी कालावधीत आणि कमी खर्चा येणार्‍या पिकांची निवड करणे महत्त्वाचे आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us