AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Namo Shetkari Yojana: 92 लाख शेतकरी 4 हजारांच्या प्रतीक्षेत, नमो योजनेचे दोन हप्ते कधी जमा होणार? अपडेट काय?

Namo Shetkari Yojana 9th and 10th installment: नमो शेतकरी योजनेचा 9 वा आणि 10 वा हप्ता अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. ऐन दुष्काळात पैशांची निकड असताना हा हप्ता अडकून पडला आहे.

Namo Shetkari Yojana: 92 लाख शेतकरी 4 हजारांच्या प्रतीक्षेत, नमो योजनेचे दोन हप्ते कधी जमा होणार? अपडेट काय?
92 लाख शेतकरी 4 हजारांच्या प्रतीक्षेत, नमो योजनेचे दोन हप्ते कधी जमा होणार?
| Updated on: Oct 23, 2026 | 2:02 PM
Share

Namo Shetkari Yojana 9th and 10th installment: राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. पाण्याचे दुर्भिक्ष, चाऱ्याचा प्रश्न, रोजगार आणि पोटाची खळगी भरण्यासाठी तांडे शहराकडे वळत आहेत. सध्या काही गावं ओस पडायला लागली आहेत. पुढील दोन ते तीन महिन्यात ग्रामीण भागातील परिस्थिती अत्यंत विदारक होण्याची भीती आहे. अशावेळी बळीराजा सरकारी योजनांकडे डोळे लावून बसला आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हप्ते थकले आहेत. राज्यातील जवळपास 92 लाख पात्र शेतकरी चार हजार रुपयांच्या प्रतीक्षेत आहेत. पण अद्याप या मदतीविषयी सरकारकडून अधिकृतपणे काहीच माहिती समोर आलेली नाही.

अंतिम मंजूरीच नाही

पीएम किसान सन्मान निधी योजनेसारखीच राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली होती. ही योजना ऑक्टोबर 2023 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेत शेतकऱ्यांना केंद्राच्या धरतीवर दरवर्षी 6,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य तीन हप्त्यात दिले जात आहे. सध्या पीएम किसान योजनेचे हप्ते नियमितपणे जमा होत आहे. शेतकऱ्यांना आता 24 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. नमो शेतकरी योजनेचे नववा आणि दहावा हप्ता प्रलंबित आहेत. या दोन्ही हप्त्यांसाठी 3,700 कोटींची गरज आहे. या निधीसाठी मार्च आणि जुलै महिन्यात प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. पण त्याला अद्याप मंजूरी मिळाली नाही.

शेतकऱ्यांपुढे मोठा आर्थिक प्रश्न

राज्य सरकारने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपायांची मदत जाहीर केली आहे. तर सरकारच्या निकषानुसार ही मदत वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तर आता शेतकरी वर्ग नमोचा हप्ताही जमा करण्याची मागणी करत आहेत. शेतीचे उत्पन्न घटले आहे. रब्बी हंगाम हातचा जाण्याची शक्यता आहे. यामुळे कुटुंबाचा गाडा कसा हाकावा आणि जनावरांचे वैरण, पाण्याचा प्रश्न कसा सोडवावा या विवंचनेत शेतकरी आहेत. त्यांना ही चार हजारांची मदत मिळाल्यास मोठा आर्थिक दिलासा मिळेल. शेतकऱ्यांना लवकरच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपयांची मदत मिळण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या अखेरीस अथवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात 24 वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.

Follow Us
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…
मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो - राज ठाकरे
Raj Thackeray : मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो; राज ठाकरेंचा दुष्काळावरून इशारा
AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; ऑडिओ क्लिपवरून जरांगे संतप्त
Manoj Jarange Patil : AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; कथित ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे पाटील संतप्त
जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले....
CM Devendra Fadnavis : जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले, संपूर्ण फॉरेन्सिक तपासणी...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख....
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख 15 हजार 697 शेतकऱ्यांना मिळणार लाभ
7 महिन्यांपासून पगार नाही; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
Pune : 7 महिन्यांपासून पगार नाही, 230 कामगार संकटात; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
Dilip Lande : शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मास्तर ढसाढसा रडले
NCP : नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मतदानाच्या काही तास आधी...कराळे मास्तर ढसाढसा रडले, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल...
Sanjay Raut : 500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल; अमित शहा, फडणवीस अन् शिंदेंना काय दिलं आव्हान
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप