देशातील सर्वात लोकप्रिय SUV Kia Seltos मध्ये बिघाड, कंपनीने गाड्या परत मागवल्या

भारतीय बाजारात लाँच होताच लोकप्रिय झालेल्या SUV Kia Seltos मध्ये तांत्रिक बिघाड आला आहे. त्यामुळे कंपनीने या सर्व गाड्या परत मागवल्या आहेत.

देशातील सर्वात लोकप्रिय SUV Kia Seltos मध्ये बिघाड, कंपनीने गाड्या परत मागवल्या
Follow us
| Updated on: Jan 07, 2020 | 11:57 AM

मुंबई : भारतीय बाजारात लाँच होताच लोकप्रिय झालेल्या SUV Kia Seltos मध्ये तांत्रिक बिघाड आला आहे. Kia Seltos च्या 7-speed DCT transmission मध्ये बिघाड आला आहे. ही गाडी गेल्या वर्षी लाँच करण्यात आली. Kia Seltos च्या 1.4 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 7 स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटीक ट्रान्समिशन मॉडलमध्ये काही तांत्रिक बिघाड आला आहे. त्यामुळे कंपनीने या सर्व गाड्यांना रिकॉल केलं आहे. त्यानंतर कंपनी गाडीमध्ये एक सॉफ्टवेयर अपडेट करेल आणि त्यासाठी कंपनी ग्राहकांकडून कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारणार नाही (Kia Seltos company recall the units).

देशात गेल्या वर्षी लाँच झालेल्या Kia Motors कंपनीने फक्त 130 दिवसांमध्ये टॉप-10 ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये आपलं स्थान निश्चित केलं होतं. रिपोर्ट्सनुसार, ग्राहकांनी कंपनीकडे गाडीमध्ये काही बिघाड असल्याची तक्रार केली. पहिल्यांदा बंगंळुरुच्या ग्राहकाने याबाबतची तक्रार केली. त्याच्या मते, ट्राफिकच्या वेळी गाडीच्या ट्रान्समिशनमध्ये ओव्हरहिटिंग होते. तर दुसऱ्या ग्राहकाने सांगितलं, गाडीचा ट्रान्समिशन गिअर स्कीप होऊन जातो. या गाडीतील गिअर हे फक्त 2,4 आणि 6 मध्ये शिफ्ट होतात. तर 1,3 आणि 5 गिअर स्कीप होऊन जातात.

Kia Seltos मध्ये आलेल्या स्किपिंग गिअरच्या समस्येला ठीक करण्यासाठी कंपनीने गाडीच्या मालकांना मेसेज पाठवला आहे आणि त्यांनी एका सॉफ्टवेअर अपडेटसाठी गाडीला सर्व्हिस सेंटरमध्ये पाठवण्यास सांगितलं आहे. कारमध्ये हे सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी फक्त 30 मिनिटं लागणार आहेत. त्यानंतर गिअर स्कीपची समस्या दूर होईल.

Kia Seltos मधील ही समस्या एक मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे. याचा शोध कोरियामध्ये लागला.

Kia Seltos company recall the units

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.