दसरा-दिवाळीत कार घेताय, सावध, तर Tata-Maruti नंतर या कारच्या किंमतीत वाढ
सणासुदीचे दिवस सुरु होण्याच्या मुहूर्तालाच आलेल्या एका निर्णयाने दसरा आणि दिवाळीत कार घेण्याची इच्छा बाळगणणाऱ्यांच्या खिशावर भार पडणार आहे.

जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचे ठरवत असाल तर तुम्हाला एक मोठा झटका बसू शकतो. कारण, आता पुन्हा कारच्या किंमतीत वाढ होणार आहे. ऑटोमोबाईल बाजारात आधी मारुती आणि टाटा कंपन्यांनी त्यांच्या कारच्या किंमती वाढवल्या होत्या. आता स्कोडा ऑटो इंडियाने देखील कारच्या किंमतत वाढ करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने अधिकृतपणे ही घोषणा केली आहे की १ ऑक्टोबर २०२६ पासून तिच्या गाड्यांच्या किंमतीत वाढ होणार आहे.
स्कोडा ही तिच्या प्रिमीयम बिल्ड क्वालिटी आणि शानदार ड्रायव्हिंग डायनेमिक्ससाठी ओळखली जाते. यात या किंमती वाढीमुळे ग्राहकांचे बजेट थोडे प्रभावित होऊ शकते. चला तर कोणत्या मॉडेलवर किती रुपये वाढणार हे पाहूयात..
1.2% टक्क्यांपर्यंत वाढ
स्कोडा ऑटो इंडियाने दिलेल्या माहितीनुसार कारच्या किंमतीत 1.2 टक्के वाढ केली जाणार आहे. कंपनीच्या मते ग्राहकांच्या खिशावर जास्त भार येऊ नये यासाठी ही वाढ वेग-वेगळ्या मॉडेल आणि व्हेरिएंट आधारे निश्चित केली आहे. यासाठी स्कोडाने मुल्य वृद्धीच्या एक ठराविक उच्च सीमा निश्चित केली आहे. कंपनीच्या मते मॉडेल वा व्हेरिएंट कुठेलेही असो, कोणत्याही कारच्या किंमतीत कमाल २० हजार रुपयांपर्यंत वाढ केली जाणार आहे. यामुळे त्या ग्राहकांना दिलासा मिळेल जे महागडे मॉडेल खरेदी करण्याची इच्छा बाळगून आहेत.
सर्वच मॉडेलमध्ये समान दरवाढ
कंपनीने हे स्पष्ट केले आहे की नवीन प्राईज स्ट्रक्चर स्कोडाच्या संपूर्ण भारतीय पोर्टफोलिओवर लागू होणार आहे. भारतात स्कोडाचे मॉडेल्सची मागणी खूप जास्त आहे. अलिकडे स्कोडाच्या पोर्टफोलियोत नवीन लाँच झालेली कॉम्पॅक्ट एसयुव्ही स्कोडा काईलाक, मिड साईज एसयुव्ही स्कोडा कुशाक आणि सेडान सेगमेंट स्कोडा स्लाव्हिया यांचा समावेश आहे.
याशिवाय हिच्या प्रीमियम सेगमेंटमधील कार उदा. स्कोडा कोडियाक, स्कोडा ऑक्टेव्हिया आरएस आणि स्कोडा सुपर्ब यांचा समावेश आहे. आणि यांच्या किंमतीवरही परिणाम झालेला आहे.
का महाग झाली स्कोडा ?
ऑटो इंडस्ट्रीत सतत वाढती इनपुट कॉस्ट आणि कच्च्या मालाच्या किंमतीत झालेला मोठा वाढ यामुळे स्कोडाने कारच्या किंमती वाढवल्या आहे. स्टील, एल्युमिनियम आणि इलेक्ट्रॉनिक कंपोनट्सच्या पुरवठा साखळीत बदलाने वाहन निर्मात्यांवर आर्थिक दबाव वाढला आहे.दरम्यान, स्कोडा ऑटो इंडियाच्या व्यवस्थापनाचा असा विश्वास आहे की, वाढलेल्या उत्पादन खर्चाचा काही भार ग्राहकांवर टाकणे भाग पडल आहे. मात्र ₹२०,००० ची किंमत मर्यादा घालून, कंपनीने आपला प्रीमियम बेस कायम ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत, जेणेकरून सणासुदीच्या काळात विक्रीवर परिणाम होणार नाही. तुम्ही १ ऑक्टोबर नंतर स्कोडाची नवीन कार खरेदी करण्याची योजना करत असाल तर तुम्हाला व्हेरिएंटनुसार थोडी अधिक रक्कम खर्च करावी लागेल.
