धमाकेदार ऑफर! Maruti Alto अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी, कार आवडली नाही तर पैसे परत

धमाकेदार ऑफर! Maruti Alto अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी, कार आवडली नाही तर पैसे परत
maruti Suzuki alto (प्रातिनिधिक फोटो)

तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार खरेदी करु शकाल.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Jan 17, 2022 | 7:17 PM

मुंबई : तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार खरेदी करु शकाल. (bring home Maruti Alto 800 VXI in just 230000 rupees)

कोरोना काळात आपल्याकडे स्वतःची वैयक्तिक कार असणे गरजेजे झाले आहे. जर आपण सेकंड हँड कार (Second Hand Car) विकत घेण्याचा विचार करत असाल परंतु बजेटमुळे चिंतेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार डीलबाबत माहिती देणार आहोत.

कुठे मिळतेय ऑफर

आम्ही ज्या कारबद्दल तुम्हाला सांगत आहोत ती कार तुम्ही शोरुममधून खरेदी करण्यासाठी गेलात तर तुम्हाला त्यासाठी 4.50 ते 5 लाख रुपये मोजावे लागतील. त्यामुळे अर्ध्या किंमतीत मिळणाऱ्या या कारची डील तुमच्यासाठी परफेक्ट आहे. आज आम्ही तुम्हाला Maruti Alto 800 VXI या हॅचबॅक कारच्या एका डीलबाबत माहिती देत आहोत. CarDekho नावाच्या वेबसाइटवर सूचीबद्ध असलेली ही कार 2.3 लाख रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Maruti Alto 800 VXI चं हे 2015 मधील मॉडेल असून ही पेट्रोल कार आहे. ही फर्स्ट ओनर कार असून महाराष्ट्रातल्या MH46 या आरटीओमध्ये रजिस्टर्ड आहे. यामध्ये 796 सीसी क्षमतेचं इंजिन देण्यात आलं आहे. यामध्ये मॅन्यूअल ट्रान्समिशनचा पर्याय आहे. ही कार आतापर्यंत 75,505 किमी धावली आहे. या कारवर थर्ड पार्टी इन्श्योरन्स उपलब्ध आहे. ही कार पुण्यात उपलब्ध आहे.

बेनिफिट्स

संबंधित वेबसाईटने ग्राहकांसाठी फ्री आरसी ट्रान्सफरची सुविधा देऊ केली आहे. तसेच 6 महिन्यांसाठी रोडसाईड असिस्टन्सची (6 Months Pan India Road Side Assistance) सुविधादेखील ग्राहकांना मिळेल. कारवर 6 महिन्यांची वॉरंटी आहे (Comprehensive Warranty). जर तुम्हाला ही कार आवडली नाही तर तुम्ही ती 7 दिवसांच्या आत कार परत करुन दिलेले पैसे परत (7 Days Money Back Guarantee) मिळवू शकता. ग्राहक या लिंकवर (https://www.cardekho.com/buy-used-car-details/used-Maruti-Alto-800-Vxi-cars-Mumbai_5cde89d4-fd12-4c98-bd26-142d22765da4.htm) जाऊन या कारबाबतची माहिती जाणून घेऊ शकतात.

महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड कार घेणार असाल तर सर्व बाजूंनी कार तपासून पाहा. कारचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. कार मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, कार आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच ही कार खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही CarDekho वरुन घेतली आहे.

इतर बातम्या

3 लाखांहून कमी किंमतीत 5 गाड्या, मारुती वॅगनआरसह चांगले पर्याय उपलब्ध

आता 8 सीटर गाड्यांमध्ये 6 एयरबॅग्स अनिवार्य, लवकरच नियम लागू होणार

प्रतीक्षा संपली ! सेव्हन सिटर Kia Carens कार भारतात लॉन्च, फक्त 25 हजार रुपये देऊन करा बूक

(bring home Maruti Alto 800 VXI in just 230000 rupees)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें