AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yamaha FZ अवघ्या 40 हजारात खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

ट्रोलच्या वाढत्या किंमती (Petrol Price Hike) कमी होण्याचे नाव घेत नसल्यामुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहने किंवा सेकंड हँड मार्केटच्या (Second Hand Bikes) दिशेने वाटचाल करत आहेत. दरम्यान, अनेक कंपन्या आहेत ज्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटारसायकली लाँच केल्या आहेत.

Yamaha FZ अवघ्या 40 हजारात खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
Second Hand Yamaha Fz (प्रातिनिधिक फोटो)Image Credit source: bikes24.com
| Updated on: Feb 28, 2022 | 8:00 AM
Share

मुंबई : पेट्रोलच्या वाढत्या किंमती (Petrol Price Hike) कमी होण्याचे नाव घेत नसल्यामुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहने किंवा सेकंड हँड मार्केटच्या (Second Hand Bikes) दिशेने वाटचाल करत आहेत. दरम्यान, अनेक कंपन्या आहेत ज्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटारसायकली लाँच केल्या आहेत. पण अनेक ग्राहक आहेत जे चार्जिंग स्टेशनची समस्या लक्षात घेऊन पेट्रोल स्कूटर किंवा सेकेंड हँड बाईकची निवड करत आहेत. अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक बाईक घेऊन आलो आहोत. यामाहा एफझेड एस एफ1 ड्युअल डिस्क (2014 Yamaha FZ S FI (V 2.0) Dual Disc) असं या या बाईकचं नाव आहे. ही बाईक खूपच कमी किंमतीत तुम्ही खरेदी करु शकता. यामाहाची ही बाइक bikedekho नावाच्या वेबसाइटवर सूचीबद्ध आहे, जी सेकंड हँड सेगमेंटची बाइक आहे.

नवीन Yamaha FZ S ची ऑन रोड किंमत जवळपास 1.40 लाख रुपये इतकी असली तरी सेकंड हँड सेगमेंटमध्ये ही बाईक 40,000 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

Yamaha FZ S FI (V 2.0) Dual Disc मध्ये 149 क्षमतेचं इंजिन आहे, जे 13.2 PS पॉवर आणि 12.8 Nm टॉर्क जनरेट करू शकते. तसेच, या बाईकच्या पुढील आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक सिस्टम आहे. यामध्ये युजर्सना ट्युबलेस टायर्स मिळतील. ही बाईक 1 लीटर पेट्रोलमध्ये 53 किमी मायलेज देते.

bikedekho वर सूचीबद्ध केलेल्या माहितीनुसार हे 2014 चे मॉडेल आहे. या बाईकने 80000 किलोमीटरचा प्रवास केला आहे. तसेच ही फर्स्ट ओनर बाइक आहे आणि ती मुंबईतल्या आरटीओमध्ये नोंदणीकृत आहे. कंपनीने या बाईकची एक रिपोर्ट लिस्ट जारी केली आहे, ज्यामध्ये सर्व फीचर्सचे स्टेटस जाहीर केले आहेत. ग्राहक BikeDekho कंपनीच्या वेबसाईटवरील मुंबई सेक्शनमध्ये ही बाईक पाहू शकतात. तिथे या बाईकबाबतची माहिती जाणून घेऊ शकता.

महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड बाईक घेणार असाल तर सर्व बाजूंनी वाहन तपासून पाहा. बाईकचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. वाहन मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, बाईक आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच ही अॅडव्हेंचर बाईक खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही bikedekho वरुन घेतली आहे.

इतर बातम्या

आता इलेक्ट्रिक गाड्यांमधल्या बॅटरी रिसायकल होणार, Ford आणि Volvo ने सुरु केली स्टार्टअप कंपनी

कार खरेदीसाठी बँका किती टक्के व्याजदराने कर्ज देतायत? लोन व प्रक्रियेबद्दल ‘या’ गोष्टी अवश्‍य जाणून घ्या

BMW ची इलेक्ट्रिक Mini Cooper SE भारतात लाँचिंगसाठी सज्ज, कशी असेल नवीन EV?

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.