AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कार खरेदीसाठी बँका किती टक्के व्याजदराने कर्ज देतायत? लोन व प्रक्रियेबद्दल ‘या’ गोष्टी अवश्‍य जाणून घ्या

कार खरेदी करण्यासाठी सध्या बँका 7 टक्के व्याजदराने कर्ज देत आहेत, तर अनेक बँका ऑन रोड किमतीच्या 100 टक्क्यांपर्यंत देखील कर्ज देण्याच्या तयारीत आहेत. तुम्हाला कार लोन पाहिजे असल्यास खालील बाबी अवश्‍य जाणून घ्या.

कार खरेदीसाठी बँका किती टक्के व्याजदराने कर्ज देतायत? लोन व प्रक्रियेबद्दल 'या' गोष्टी अवश्‍य जाणून घ्या
Cars ( प्रातिनिधिक फोटो)
| Edited By: | Updated on: Feb 20, 2022 | 11:30 AM
Share

तुम्ही नवी कार खरेदी करण्याच्या विचारात असाल आणि तुम्हाला त्यासाठी कार लोन (car loan) हवे असेल तर, मनात अनेक प्रश्न निर्माण होत असतात, कार लोन घेतल्यावर त्यासाठी किती व्याजदर (interest rate) आकारले जाईल, कार लोनसाठी बँकेकडून काही खास ऑफर आहे का, किंवा नवीन कार घ्यावी, की जुनी, असे अनेक प्रश्‍न पहिल्यांदा कार घेत असताना पडणे साहजिकच आहे. या लेखात अशाच काही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. छानशी नोकरी, एक सुंदर घर आणि सोबतीला कार असावी असे प्रत्येकाचे स्वप्न असते. कारचा विचार केल्यास अनेक जण कार घेण्यासाठी एकदम मोठी रक्कम भरु शकत नाही. त्यामुळे त्यासाठी कार लोनची चाचपणी केली जाते. कुठल्या बँकेकडून कार लोनसाठी ऑफर (loan offer) आहे का, याची पाहणी केली जाते. अशा वेळी विचारपूर्वक निर्णय घेणे योग्य असते. कार खरेदी करताना काही गोष्टींवर लक्ष देणे महत्वाचे ठरते.

BankBazaar.com वर दिलेल्या माहितीनुसार, बँक ऑफ बडोदा 7 टक्के दराने कार लोन देत आहे. यासोबतच बँक 1500 रुपये प्रोसेसिंग फी देखील आकारत आहे. त्याच वेळी, कॅनरा बँक 7.3 टक्के प्रारंभिक दराने कर्ज देत आहे. बँक एक हजार ते पाच हजार रुपयांच्या कर्जाच्या रकमेच्या 0.25 टक्के प्रक्रिया शुल्क आकारत आहे. अॅक्सिस बँक 7.45 टक्के सुरुवातीच्या दराने कर्ज देत आहे. त्यांच्याकडून 3500 ते 7000 रुपये दरम्यान प्रक्रिया शुल्क आकारला जात आहे, एसबीआय 7.2 टक्के दराने कर्ज देत आहे.

वेगवेगळ्या बँक ऑफर

लक्झरीयस कार घ्यायची असेल तर तुम्ही एचडीएफसी बँकेचा पर्याय निवडू शकतात. तेथे तुम्हाला तुमच्या गरजेनुसार कर्ज मिळेल, ऑन रोड किमतीवर 100 टक़्के फायनान्स करता येईल. दुसरीकडे, एसबीआय व्यावसायिक क्षेत्रातील लोकांसाठी एक विशेष योजना राबवत आहे. सीए, डॉक्टर आदी व्यावसायिक लोक एसबीआयकडून कर्ज घेऊ शकतात. जर तुम्हाला छोटी आणि स्वस्त कार घ्यायची असेल, तर तुम्हाला अॅक्सिस बँकेकडून चांगली ऑफर मिळू शकते.

नवी की जुनी?

जुन्या कारच्या विचारात असाल तर, त्यावरील जास्त व्याजदरामुळे जास्त ईएमआय बसण्याची शक्यता असते. कार जर चांगल्या स्थितीत असेल तेव्हाच कर्ज घेऊन जुनी कार खरेदी करणे योग्य ठरते. जर तुम्हाला जुन्या कारबद्दल शंका असेल तर तुम्ही बँकेकडून नवीन कारसाठी ‘कस्टमाइज्ड’ कर्ज घेऊ शकता, ज्यामध्ये सुरुवातीला इएमआय कमी असेल. यातून जुन्या कारच्या खरेदीमुळे होणारे नुकसान टाळता येईल. अनेक लोक पैसे वाचवण्यासाठी जुन्या कारचा पर्याय निवडत असतात. परंतु अशा वेळी जुन्या कारबद्दल असलेल्या सवलती जाणून घेण्यासाठी बँकेशी चर्चा करणे योग्य ठरते.

Know about car loan best interest rates and car loan process

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.