AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एलॉन मस्क यांच्या टेस्लाची कार हवेत उडाली, पण तज्ज्ञांनी उपस्थित केले महत्वाचे प्रश्न, म्हणाले, कार उडूच शकत नाही…..

एलॉन मस्क यांनी नुकतीच हवेत उडणारी कार लॉन्च केली, पण या कारवर आता तज्ञ्जांनी या कारवर टीका केली आहे. या कारचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता ही केवळ जाहिरातीसाठी केलेला प्रकार असून यातून केवळ मनोरंजन होणार असं म्हटलं आहे.

एलॉन मस्क यांच्या टेस्लाची कार हवेत उडाली, पण तज्ज्ञांनी उपस्थित केले महत्वाचे प्रश्न, म्हणाले, कार उडूच शकत नाही.....
एलॉन मस्क यांच्या फ्लाइंग कारवर प्रश्नImage Credit source: social media
| Updated on: Oct 17, 2026 | 8:43 PM
Share

जगातील प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीची एक कार सध्या चर्चेत आली आहे. या कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यात कार हवेत उडताना आणि हवेतच वेगवेगळ्या हालचाली करताना दिसते. या दृश्यांमुळे उडणाऱ्या कारचं स्वप्न प्रत्यक्षात उतरणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, या व्हिडीओनंतर ऑटो क्षेत्रातील तज्ज्ञांनी कारच्या क्षमतेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. ही कार खरोखरच उडू शकते का, की हा केवळ काही सेकंदांचा स्टंट आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.

टेस्ला कारचा व्हिडीओ व्हायरल

टेस्लाने आपल्या आगामी रोडस्टर कारच्या प्रात्यक्षिकाचा व्हिडीओ प्रसिद्ध केला. या व्हिडीओमध्ये कार एका वक्राकार रॅम्पवरून पुढे जाताना, हवेत झेप घेताना आणि हवेत कलाटणी घेऊन पुन्हा जमिनीवर उतरताना दिसते. या प्रात्यक्षिकामुळे सोशल मीडियावर या कारची चर्चा सुरू झाली. एलॉन मस्क यांनीही या व्हिडीओच्या माध्यमातून उडणाऱ्या कारच्या संकल्पनेवर भाष्य केले. टेस्ला आणि स्पेसएक्सच्या तंत्रज्ञानाचा वापर करून कारच्या क्षमतेत मोठे बदल करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे या प्रात्यक्षिकातून दिसून आले.

रॉकेटप्रमाणे उडण्याचा दावा

या कारमध्ये उच्च दाबाने साठवलेली हवा आणि विशेष थ्रस्टर्सच्या मदतीने कारला हवेत उचलण्याची यंत्रणा वापरण्याची संकल्पना आहे. कारची उंची नियंत्रित करण्यासाठी आणि हवेत हालचाली करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे.

मात्र, कार काही क्षण हवेत झेप घेते आणि पुन्हा जमिनीवर उतरते, याचा अर्थ ती पारंपरिक अर्थाने उडणारी कार बनली आहे, असे म्हणता येत नाही. प्रात्यक्षिकामध्ये कार किती वेळ हवेत राहू शकते आणि प्रत्यक्ष वापरात हे तंत्रज्ञान किती प्रभावी ठरेल, याबाबत अद्याप अनेक प्रश्न आहेत.

तज्ज्ञांनी उपस्थित केले प्रश्न

टेस्लाच्या या प्रात्यक्षिकानंतर कारच्या प्रत्यक्ष क्षमतेबाबत चर्चा सुरू झाली आहे. कार हवेत उडी घेऊ शकते, हे दाखवणे आणि ती सुरक्षितपणे दीर्घकाळ हवेत प्रवास करू शकते, हे सिद्ध करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

कारचे हे तंत्रज्ञान अंतिम उत्पादनात उपलब्ध होणार का, त्याची सुरक्षितता कशी तपासली जाणार आणि सार्वजनिक रस्त्यांवर अशा वाहनाला परवानगी मिळणार का, असे प्रश्नही महत्त्वाचे आहेत. सध्या उपलब्ध प्रात्यक्षिकावरून या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत.

2028 मध्ये उत्पादन सुरू होण्याची शक्यता

टेस्लाच्या नव्या रोडस्टरचे उत्पादन 2028 मध्ये सुरू होण्याचे नियोजन असल्याचे वृत्त आहे. मात्र, प्रात्यक्षिकात दाखवलेली सर्व वैशिष्ट्ये ग्राहकांना मिळणाऱ्या अंतिम मॉडेलमध्ये असतीलच, याची अद्याप खात्री नाही. विशेषतः हवेत उडण्याची क्षमता असलेल्या मॉडेलची उपलब्धता आणि त्याच्या वापरावरील निर्बंध याबाबत स्पष्टता आवश्यक आहे.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट