AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CRETA आणि SIERRA ला विसराल, भारतात भन्नाट SUV येतेय, 21 हजारात बुकींग सुरु

होंडा कार्स इंडिया भारतीय बाजारात होंडा एलिव्हेटचे फेसलिफ्ट मॉडेल लाँच करणार आहे. भारतीय बाजारात ही प्रथम लाँच होत आहे. या एलिव्हेटमध्ये अनेक प्रकारचे बदल पाहायला मिळणार आहेत.

CRETA आणि SIERRA ला विसराल, भारतात भन्नाट  SUV येतेय, 21 हजारात बुकींग सुरु
HONDA ELEVATE
| Updated on: Oct 01, 2026 | 4:30 PM
Share

भारतीय कार बाजारात एसयूव्हीची ( SUV ) प्रचंड क्रेज आहे. पुढच्या आठवड्यात बाजारात एक नवीन एसयुव्ही पाहायला मिळणार आहे. ही संपूर्णपणे नवीन कार नाही. तर सध्याच्या मॉडेलचे फेसलिफ्ट व्हर्जन असणार आहे. आपण बोलत आहोत होंडा एलिव्हेट फेसलिफ्टची ( Honda Elevate Facelift ) ही एसयुव्ही ६ ऑक्टोबर रोजी लाँच होणार आहे. या कारचे बुकींग आधीच सुरु झाली आहे. ग्राहक होंडाच्या अधिकृत डीलरशिपकडे या कारला २१ हजारात बुक करु शकतात. होंडा एलिव्हेट फेसलिफ्ट भारतातच प्रथम लाँच होणार आहे. सणासुदीच्या मोसमाची सुरुवातच या कारच्या लाँचने होणार आहे.

नव्या एलिवेटमध्ये डिझाईन बदलासह काही एडिशनल फिचर्स आणि एन्हान्समेंट मिळतील. कारच्या केबिनमध्ये अनेक बदल दिसतील. मात्र, कंपनीने सर्व फिचर्स उघड केलेले नाहीत. या कारमध्ये काय खास आहे हे पाहूयात…

होंडा एलिवेट फेसलिफ्टची बुकिंग सुरु

अपकमिंग होंडा एलिव्हेट फेसलिफ्टला तुम्ही २१ हजार रुपयात प्री-बुक करु शकता. होंडाने या ता कारला पहिल्यांदा २०२३ मध्ये बाजारात उतरवले होते. कंपनी तीन वर्षांतच या कारचे अपडेट घेऊन येत आहे, कारचा एक टीझर कंपनीने जारी केला आहे. ज्यात फ्रंट पॅनलवर लायटिंगचा नवीन पॅटर्न पाहायला मिळत आहे.

होंडा कार्स इंडियाचे व्हाईस प्रेसिडन्ट ( मार्केट आणि सेल्स ) कुणाल बहल यांनी सांगितले की नवीन एलिव्हेट सध्याच्या एसयुव्हीच्या धर्तीची असेल. ज्यात अनेक सारे फिचर्स जोडण्या सोबतच डिझाईन देखील अपडेट केले आहे. त्यांनी हे देखील सांगितले की भारत या वर्षासाठी प्रमुख मार्केट आहे आणि पहिला देश आहे जेथे एलिव्हेट फेसलिफ्ट लाँच होत आहे.

कारमध्ये खास काय?

स्पाय शॉट्सच्या आधारे बोलायचे झाले तर होंडा एलिव्हेट फेसमध्ये रिफ्रेश्ड ग्रिल, रिवाईज्ड लायटिंग सिग्नेचर्स आणि एक्सटिरिअरमध्ये अनेक इतर बदल केले आहेत. कारचा अपराईट आणि सध्या स्टान्स कायम राहिल. कंपनी कारमध्ये नवीन एलॉय व्ही डिझाईन देऊ शकते. याशिवाय इंटेरियरमध्ये देखील बदल केले आहेत.

होंडा एलिव्हेट फेसलिफ्टमध्ये 1.5 लिटरचे फोर सिलिंडर आय-व्हीटेक (i-VTEC) पेट्रोल इंजिन असणार आहे. जे 121 पीएसची पॉवर आणि 145 एनएमचे टॉर्क प्रोड्यूस करेल. या 6 स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटी गिअरबॉक्सचा पर्याय मिळेल.

सध्या एलिव्हेटची किंमत 11.91 लाख रुपयांनी सुरु होऊन 17.07 लाख रुपयांमध्ये सुरु होते. या कारचा थेट मुकाबला हुंडई क्रेटा, टाटा सिएरा, किआ सेल्टॉस, मारुती सुझुकी ग्रँड व्हीटारा आणि टोयोटा हायरायडरशी होणार आहे.

Follow Us
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...