Huawei ने आणला जबरदस्त फोन! 12,000 nits ब्राइटनेससह Mate 90 Pro मध्ये मिळणार भन्नाट फीचर्स
Huawei ने Mate 90 आणि Mate 90 Pro हे स्मार्टफोन सादर केले असून Mate 90 Pro मधील डिस्प्ले विशेष चर्चेत आहे. कंपनीच्या माहितीनुसार या फोनच्या स्क्रीनची पीक ब्राइटनेस 12,000 nits पर्यंत आहे.

सणासुदीचा काळ सुरू होतोय आणि प्रत्येक टेक कंपनी आपले बेस्ट प्रोडक्ट लाँच करण्याच्या गडबडीत आहे. याशिवाय कोणता टिव्ही घ्यायचाय कोणता फोन घ्यायाचाय याच्या गोंधळात अडकलेली आहे. अशातच हुवाईने एक सुंदर फोन ग्राहकांसमोर आणला आहे.हुवाईने एकत्रच हुवाई मेट 90 आणि मेट 90 प्रो मॅक्स लाँच केला आहे.याची खासियत म्हणजे आहे फोनचा 1200 units चा ब्राईटनेस. त्यामुळे यावर्षी ग्राहकांची कोणता फोन घ्यायचा या विचारानेच तारांबळ उडणार एवढं नक्की
डिस्प्लेमध्ये काय खास
हुवाई मेट 90 Pro मध्ये 6.75 इंचाचा LTPO OLED डिस्प्ले मिळणार आहे. याचे रिझोल्यूशन 2832 X 1280 पिक्सेल असून 1 ते 120Hz Adapative Refresh Rate सपोर्ट आहे. डिस्प्लेवर 1440Hz PWM Dimming आणि 300 Hz Touch Sampling Rate देखील देण्यात आला आहे. या स्क्रिनची पिक ब्राईटनेस 12,000 units पर्यंत असल्याचा हुवाईचे म्हणणे आहे. तसेच या स्क्रिनला तिसऱ्या जनरेशनचे Kunlun Glass चे संरक्षण मिळाले आहे.
Kirin 9035 प्रोसेसरची ताकद
या फोनमध्ये हुवाई चा Kirin 9035 चिपसेट देण्यात आला आहे. फोन
HarmonyOS 7.0 वर चालतो. RAM साठी 12GB आणि 16GB असे पर्याय 256GB पासून 1TB पर्यंत उपलब्ध आहे.
कॅमेरा सेटअप
फोटोग्राफी करणार्यांसाठी फोनमध्ये ट्रिपल रिअर सेटअप आहे. यात 50 MP चा मेन कॅमेरा असून त्याला F1.4 ते F4.0 Variable Aperature आणि OIS सपोर्ट आहे. याशिवाय 40MP Ultra – Wide कॅमेरा आणि 50MP macro telephoto कॅमेरा देण्यात आला आहे.फोनमध्ये 4x optical zoom, 8x quality zoom आणि 100x digital room सपोर्ट आहे. सेल्फिसाठी 13MP ultra – wide फ्रंट कॅमेरा आणि 3D depth sensing देण्यात आले आहे.
6600mAh बॅटरी आणि 100W चार्जिंग
हुवाई मेट 90 pro मध्ये 6600 बॅटरी आहे. फोन 100W Wired Supercharge आणि 50W wireless charging ला सपोर्ट करतो. याशिवाय 18W wired reverse charging आणि wireless reverse charging ची सुविधा मिळते. फोनला IP68 आणि IP69
रेटिंगही देण्यात आले आहे.
हुवाई मेट 90 pro ची किंमत किती
हुवाई मेट 90 pro सध्या चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. 12GB + 256GB मॉडेलची किंमत 6,999 युआन, 12GB + 512GB मॉडेलची किंमत 7,999 युआन, 16GB + 512 GB मॉडेलची किंमत 8,499 युआन आणि 16GB + 1TB मॉडेलची किंमत 9,999 युआन आहे. भारतीय रूपयानुसार या फोनची किमत 1 लाख, 1.22 लाख आणि 1.44 लाख रुपये आहे.
पण सध्या हा फोन भारतात केव्हा लाँच होणार याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.