AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एससी, एसटीवर अन्याय, लोकशाही संपवून मनुस्मृती…डिलिमिटेशन बिलामुळे देशावर संकट, INDIA आघाडीचा खळबळजनक दावा!

ज्या निवडणूक आयोगाने 10 कोटी लोकांना मतदार यातीतून बाहेर काढलं त्याच निवडणूक आयोगाकडे मतदारसंघ पुनर्रचनेची जबाबदारी देण्यात आली आहे. आम्हाला हे मान्य नाही, अशी भूमिका खरगे यांनी घेतली.

एससी, एसटीवर अन्याय, लोकशाही संपवून मनुस्मृती...डिलिमिटेशन बिलामुळे देशावर संकट, INDIA आघाडीचा खळबळजनक दावा!
india alliance and mallikarjun khargeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 28, 2026 | 1:49 PM
Share

संविधान संशोधन विधेयक हे लोकशाहीसाठी मोठं संकट आहे. लोकशाहीला संपवून संपूर्ण सत्ता आपल्या हातात घेण्यासाठी हे विधेयक आणले जात आहे. आता 850 जागा वाढवून भाजपा कायमस्वरुपी सत्ता आपल्या हातात घेऊ इच्छीत आहे.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एससी, एसटीच्या हिताचा विचार या विधेयकात करण्यात आलेला नाही. विधेयकात एसी, एसटीच्या जागाही वाढायला हव्यात. परंतु आताच्या विधेयकात तशी कोणतीही तरतूद नाही. 2026 सालाची जनगणना येणार आहे. ताज्या जनगणनेच्या आधारे मतदारसंघांची पुनर्रचना झाली तर एससी, एसटी प्रवर्गाला जास्त जागा मिळू शकतात. परंतु एससी, एसटीला त्यांचा वाटा मिळू नये यासाठी सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न केला जातोय. विधेयकाच्या तरतुदीतून हीच बाब दिसत आहे.

ज्या निवडणूक आयोगाने 10 कोटी लोकांना मतदार यातीतून बाहेर काढलं त्याच निवडणूक आयोगाकडे मतदारसंघ पुनर्रचनेची जबाबदारी देण्यात आली आहे. आम्हाला हे मान्य नाही. ज्ञानेश कुमार हे तर आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत. त्यांच्याच नेतृत्त्वात सगळं होत असेल तर मनमानी कारभार चालेल. निवडणूक आयोग मनमानी पद्धतीने काम करण्याची शक्यता आहे. राखीव जागा खुल्या प्रवर्गाला दिल्या जाऊ शकतात, असा मोठा आरोपही खरगे यांनी केला.

Follow Us
मोदींचं डिलिमिटेशनबाबत सुचक ट्विट! महिलांना दिलेलं वचन पूर्ण केल्याचा.
मोदींचं डिलिमिटेशनबाबत सुचक ट्विट! महिलांना दिलेलं वचन पूर्ण केल्याचा केला उल्लेख, नेमकं काय म्हणाले पंतप्रधान?
वडिलांचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा, लेकीचा मात्र तीव्र विरोध...
वडिलांचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा, लेकीचा मात्र तीव्र विरोध; सुशीलकुमार आणि प्रणिती शिंदेंमध्ये मतभेद!
राज ठाकरेंचा कल्याण-डोंबिवलीत दोन दिवसीय दौरा; 27 गावांसाठी मनसेची...
राज ठाकरेंचा कल्याण-डोंबिवलीत दोन दिवसीय दौरा; 27 गावांसाठी मनसेची खास रणनीती!
तुतारीच्या हातात कमळ; अंबादास दानवेंनी पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचलं
Ambadas Danve vs Sharad Pawar : तुतारीच्या हातात कमळ; ठाकरे सेनेच्या अंबादास दानवेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचलं
इंडिया आघाडीमध्ये मोठा भूकंप; वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?
Varsha Gaikwad : Delimitation Bill : इंडिया आघाडीमध्ये मोठा भूकंप; वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?
इंडिया आघाडीला मोठा धक्का; डिलिमिटेशन विधेयकाला DMK चा पाठिंबा....
DMK : इंडिया आघाडीला मोठा धक्का; डिलिमिटेशन विधेयकाला DMK चा पाठिंबा, राजकीय समीकरणं बदलणार?
डिलिमिटेशन विधेयकावर अनिल देसाईंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका; म्हणाले
डिलिमिटेशन विधेयकावर अनिल देसाईंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका; म्हणाले, उद्धव ठाकरेंचा निर्णय...
सुप्रिया सुळे इंडिया आघाडीच्या बैठकीला का गेल्या नाहीत? अमोल कोल्हे...
सुप्रिया सुळे इंडिया आघाडीच्या बैठकीला का गेल्या नाहीत? अमोल कोल्हेंनी सांगितलं कारण
बेधुंद कारभार सुरूय, सत्ता आणि पैशांसाठी सर्व काही चाललंय....
Harshwardhan Sapkal On Sharad Pawar : बेधुंद कारभार सुरूय, सत्ता आणि पैशांसाठी सर्व काही चाललंय....
मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; आज रात्रीपासून पश्चिम रेल्वे
Mumbai Megablock Update : मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; आज रात्रीपासून पश्चिम रेल्वेवर 5 तासांचा जम्बो ब्लॉक