सुप्रिया सुळे इंडिया आघाडीच्या बैठकीला का गेल्या नाहीत? अमोल कोल्हेंनी सांगितलं कारण
सीमान विधेयकावरील काँग्रेसच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पक्षाने अजून कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही, असे कोल्हे यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची विधाने इंडिया आघाडीमध्ये दुरावा निर्माण करत असून, त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने इंडिया आघाडीच्या बैठकीला गैरहजर राहण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
डिलिमिटेशन विधेयकावरून महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठा भूकंप झालेला आहे. या विधेयकासंदर्भात शरद पवारांच्या भूमिकेवरून काँग्रेसने केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कोल्हे यांच्या मते, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने या विधेयकावर अजून कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. पक्षाचे सर्व आठ खासदार सोमवारी एकत्र बसून विधेयकाचा अभ्यास करतील आणि त्यानंतरच निर्णय घेतील.
काँग्रेसच्या महाराष्ट्र स्तरावरील नेत्यांची टीका “दुधात मिठाचा खडा टाकण्यासारखी” असल्याचे कोल्हे यांनी म्हटले. काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या टीकेमुळेच पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला. स्वतः जयराम रमेश यांनी सुप्रिया सुळेंना फोन करून उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते, तरी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या विधानांमुळे हे शक्य झाले नाही, असे कोल्हे म्हणाले. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी विषयाचे पूर्ण आकलन न करता अशी विधाने करणे दुर्दैवी असल्याचे मत अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.
Published on: Nov 28, 2026 12:37 PM
सुप्रिया सुळे इंडिया आघाडीच्या बैठकीला का गेल्या नाहीत? अमोल कोल्हे...
बेधुंद कारभार सुरूय, सत्ता आणि पैशांसाठी सर्व काही चाललंय....
मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; आज रात्रीपासून पश्चिम रेल्वे
महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीला पुणे पोलिसांनी म्हटलं जयंती; अधिकृत....

