AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DMK : इंडिया आघाडीला मोठा धक्का; डिलिमिटेशन विधेयकाला DMK चा पाठिंबा, राजकीय समीकरणं बदलणार?

DMK : इंडिया आघाडीला मोठा धक्का; डिलिमिटेशन विधेयकाला DMK चा पाठिंबा, राजकीय समीकरणं बदलणार?

| Updated on: Nov 28, 2026 | 12:49 PM
Share

डिलिमिटेशन विधेयकाला द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) पक्षाने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. खासदारांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तामिळनाडूतील सध्याच्या जागांचा 7.18 चा रेशो कायम ठेवणे आणि पुनर्रचना पुढील 25 वर्षांसाठी लागू करणे या दोन प्रमुख मागण्या मान्य झाल्याने DMK ने विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लोकसभेत NDA चे संख्याबळ वाढले आहे.

द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) पक्षाने डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, ही एक महत्त्वाची राजकीय घडामोड मानली जात आहे. चेन्नई येथे झालेल्या पक्षाच्या खासदारांच्या बैठकीत या विधेयकाच्या बाजूने मतदान करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

माजी मुख्यमंत्री आणि DMK प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी यापूर्वी दोन प्रमुख मागण्या मांडल्या होत्या. पहिली मागणी म्हणजे, जर जागा वाढल्या तरी तामिळनाडूतील सध्या असलेला 7.18 चा जागांचा रेशो कायम राखला जावा. दुसरी मागणी म्हणजे, जर पुनर्रचना झाली तर ती पुढील 25 वर्षांपर्यंत लागू राहिली पाहिजे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधेयकाच्या सध्याच्या मसुद्यामध्ये या दोन्ही मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे DMK ने विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

DMK चे 22 खासदार लोकसभेत असल्याने, त्यांच्या पाठिंब्यामुळे लोकसभेत एनडीएच्या संख्याबळात वाढ झाल्याचे चित्र आहे. या निर्णयामुळे विधेयकाला संसदेत मंजुरी मिळण्याचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे.

Published on: Nov 28, 2026 12:49 PM

Follow Us