नव्या अवतारात महिंद्रा Bolero!,कंपनीने टीझर जारी करुन वाढविली उत्सुकता…
Mahindra ने नवीन Bolero चा टीझर जारी केला आहे. या SUV मध्ये नवीन ग्राफिक्स आणि किरकोळ कॉस्मेटिक बदल असू शकतात. सध्याच्या मॉडलमध्ये 1.5 लिटरचे डीझेल इंजिन मिळणार आहे.

भारतीय बाजारातील सर्वात जुने मॉडेल असलेल्या बोलेरोला लोकांची मोठी पसंती मिळाली होती. आता महिंद्रा कंपनी बोलेरोचे अपडेटेड व्हर्जन सणासुदीत लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीने कारचा नवीन टीझर व्हिडीओ लाँच केला आहे. ही एसयुव्ही मार्केटमध्ये २५ वर्षांहून अधिक काळ विकली जात आहे. आता नव्या अपडेटेड बोलेरोत महिंद्रा कंपनीने इंजिन आणि एक्सटीरियरमध्ये अनेक बदल केले आहेत. चला तर पाहूयात या नव्या बोलेरोत काय-काय मिळणार आहे.
कंपनीने जारी केला टीझर व्हिडीओ
महिंद्राने बोलेरोच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याला कॅप्शन देताना, आता आणखीन दमदोर होणार आहे, असे म्हटले आहे. व्हिडीओत हे देखील लिहिले आहे, की ‘धुळ हटणार आहे’ यात बोलेरोच्या फ्रंट एंडची झलक दाखवली आहे. जे धुरात लपलेले आहे. दोन दशकाहून अधिक जुन्या असलेल्या बोलेरोची विक्री अजूनही होत असते. यास एक दमदार आणि मजबूत मल्टी – युव्ही मानली जाते. इंजिनच्या बाबतीत ही दमदार आहे. ज्यामुळे ग्रामीण क्षेत्रात बोलेरोला चांगली मागणी आहे.
आगामी बोलेरो ही सध्याच्या मॉडेलची नवीन व्हेरिएंट असू शकते. ज्यात जुजबी कॉस्मेटिक बदल आणि साईड पॅनलवर नवीन स्टिकर वा ग्राफीक्स असतील. हा सणासुदीतील सिझनचा स्पेशल व्हेरिएंट असू शकते. ज्याचा उद्देश्य ग्राहकांना दीर्घकाल सुरु असलेल्या मल्टी-युव्हीच्या आठवणींना उजाळा देणे असणार आहे. बोलेरोमध्ये मशीन-कट अलॉय व्हील्स, मॅन्युअल एअर इंडीशनिंग, फॅब्रिक जागा, एनालॉग इंस्ट्रुमेंट क्लस्टर, चारही दरवाज्यासाठी पॉवर विंडो, फॅब्रिक डेडलायनर आणि पॉवर स्टीअरिंग सारखी सुविधा मिळण्याची आशा आहे.
हा बदल होऊ शकतो…
गेल्या वर्षी महिंद्राने बोलेरोत एक 7-इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम बसवण्यात आली होती. ही ब्ल्युटुथ आणि युएसबी कनेक्टिव्हीटी सह गुगल मॅप्स सारख्या नेव्हीगेशन ऐप्ससाठी फोन मिररिंगची सुविधा देखील देतो. येणाऱ्या व्हेरिएंटमध्ये महिंद्राची सध्याची सिस्टीम कायम राखली जाऊ शकते. वा एक मोठा टचस्क्रीन सिस्टीम सादर केली जाऊ शकते. बोलेरोत गाडीत मोठा हॅलोजन हेडलाईट्स कायम राहण्याची शक्यता आहे. टर्न इंडिकेटर आणि पार्किंग लाईट क्लस्टर असतील. मेटल बम्बर देखील आधी सारखा असण्याची शक्यता आहे. ज्यात फॉग लँपसाठी देखील व्यवस्था असेल.
कधी होणार लाँच
महिंद्रा बोलेरात 1.5 लिटरचे तीन सिलिंडर असलेले एमहॉक टर्बो-डिझल इंजिन लावलेले असून ते 75 बीएचपीची पॉवर और 210 एनएची कमाल टॉर्क जनरेट करते. हे इंजिन पाच स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे आणि पॉवर मागच्या चाकांना पोहचवते. महिंद्राने गेल्या वर्षी बोलेराच्या सस्पेंशन सेटअपला अपडेट केले होते. आणि आशा आहे की ही अपडेटेड आगामी एडीशनमध्येही कायम राहील. महिंद्रा सध्या B4, B6 आणि B8 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. ज्याची एक्स- शोरुम किंमत 8.57 लाख रुपये ते 9.99 लाख रुपयापर्यंत आहे. महिंद्राचे नवीन व्हर्जन लवकरच लाँच होऊ शकते.
