AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

New Toyota Glanza : मध्यमवर्गीय कुटुंबासाठी बेस्ट कार; फक्त 11000 रुपये देऊन घरी आणा, किंमत अन् फिचर्स काय?

New Toyota Glanza : मध्यमवर्गीय कुटुंबासाठी बेस्ट कार बाजारात आली आहे. ही कार बुक करण्यासाठी11000 रुपये द्यावे लागतील. या कारची किंमत आणि फिचर्स जाणून घ्या.

New Toyota Glanza : मध्यमवर्गीय कुटुंबासाठी बेस्ट कार; फक्त 11000 रुपये देऊन घरी आणा, किंमत अन् फिचर्स काय?
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 14, 2026 | 6:44 PM
Share

मुंबई :  टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने नव्या भारताच्या बदलत्या आकांक्षा लक्षात घेऊन ‘न्यू टोयोटा ग्लान्झा’ या हॅचबॅकच्या लाँचची अधिकृत घोषणा केलीये. नवीन मॉडेल अधिक शार्प, स्पोर्टी डिझाइन, प्रीमियम इंटीरियर, ॲडव्हान्स्ड कनेक्टिव्हिटी, फीचर्स आणि सुरक्षा तंत्रज्ञानाचा उत्तम मेळ साधून प्रवास सुकर होतो. ‘व्हॉट अ मूव्ह’ या मोहिमेच्या मध्यवर्ती संकल्पनेवरून प्रेरित असलेली नवी टोयोटा ग्लान्झा ही शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही बाजारपेठेतील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विचारपूर्वक डिझाइन करण्यात आलीये. नव्या टोयोटा ग्लान्झासाठी बुकिंग 11000 रुपये या रक्कमेत सुरू झाली आहे. तिची सुरुवातीची किंमत 6,99,000 रुपये (एक्स-शोरूम) आहे.

टोयोटा किर्लोस्कर मोटरचे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर तादाशी असाझुमा म्हणाले, २०१९ मधील लाँचपासूनच टोयोटा ग्लान्झा ही एक हॅचबॅक म्हणून ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. २०२६ ची नवी टोयोटा ग्लान्झा याच भक्कम वारशावर आधारित आहे. अधिक शार्प व स्पोर्टी डिझाइन, केबिनचा प्रीमियम अनुभव आणि ॲडव्हान्स्ड सेफ्टी तंत्रज्ञानासह सादर करण्यात आली आहे. ग्राहकांसाठी अधिक आकर्षक पर्याय ठरते.  ग्राहकांसाठी हॅचबॅक सेगमेंट हा नेहमीच एक महत्त्वाचा टप्पा राहिलाय. ग्लान्झा ग्राहकांच्या या गरजा स्टाइल, गुणवत्ता आणि मानसिक समाधानासह पूर्ण करण्यासाठी डिझाइन करण्यात आलीये.

टोयोटा किर्लोस्कर मोटरचे सबरी मनोहर म्हणाले, ‘नव्या टोयोटा ग्लान्झामध्ये सुरक्षा, सोय आणि कनेक्टिव्हिटीच्या क्षेत्रात अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आलेत. ॲडेप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीपिंग असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, लेन डिपार्चर प्रिव्हेन्शन, ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग आणि हाय बीम असिस्ट यांसारख्या लेव्हल २ ॲडास फीचर्सचा समावेश आहे. तसेच नवी ग्लान्झा एक प्रीमियम ड्रायव्हिंग अनुभव प्रदान करते. सीएनजी व्हेरियंटमध्ये एएमटीचा समावेश ड्रायव्हिंग अधिक सुलभ करतो, तर व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, वायरलेस चार्जिंग आणि नवीन लुक यामुळे तिचे एकूण आकर्षण अधिक वाढते. या कारची बुकिंग 11 हजार रुपये आहे. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती कार सहज बुकिंग करू शकतो.

Follow Us
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून..
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ
ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
Dharashiv : ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला.....
Rahul Gandhi PC : दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला धक्कादायक अनुभव