AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रस्ते बांधकामासाठी 15 लाख कोटी खर्च करणार; नितीन गडकरींची मोठी घोषणा

नितीन गडकरी म्हणाले की, येत्या दोन वर्षात Ministry of Road Transport ने पायभूत सुविधांसाठी 15 लाख कोटी खर्च करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.

रस्ते बांधकामासाठी 15 लाख कोटी खर्च करणार; नितीन गडकरींची मोठी घोषणा
नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: May 01, 2021 | 4:00 PM
Share

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी म्हटलं आहे की, येत्या दोन वर्षांत भारतातील रस्ते बांधकाम अजून पुढे नेण्याचं उद्दीष्ट ठेवून त्यांच्या मंत्रालयाने कामाला सुरुवात केली आहे. रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या विकासास प्राथमिकता देणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कामं केली जातील. इंडो-यूएस पार्टनरशिप व्हिजन समिटमध्ये ते बोलत होते. (Nitin Gadkari announced, 15 lakh crores will be spent in road construction)

नितीन गडकरी म्हणाले की, येत्या दोन वर्षात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Road Transport) पायभूत सुविधांसाठी सुमारे 15 लाख कोटी रुपये खर्च करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. रस्ते आणि महामार्ग क्षेत्रात केंद्राने 100 टक्के थेट परकीय गुंतवणूकीला यापूर्वीच परवानगी दिली आहे, ज्यामुळे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी आपल्या मंत्रालयाच्या संसाधनांना आणखी चालना मिळेल. त्यांचे मंत्रालय चालू आर्थिक वर्षात आपली कामगिरी सुधारण्यात सक्षम होईल आणि दररोज 40 कि.मी. महामार्ग बांधण्याचे उद्दीष्ट साध्य करेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

इंडो-यूएस पार्टनरशिप व्हिजन समिटला संबोधित करताना नितीन गडकरी म्हणाले की, भारतातील पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूकीची मोठी संधी आहे. ते म्हणाले, भारत सरकार आपल्या नागरिकांसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम करत आहे. महामार्ग, रस्ते आणि बंदरे सुधारण्याचे उद्दीष्ट आहे. NHAI प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांना आपली गुंतवणूक हेजिंगद्वारे कव्हर करावी लागेल, अशी माहितीही त्यांनी दिली.

गडकरी म्हणाले की, विमानतळ, मेट्रो रेल्वे, रेल्वे स्थानकांसह पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याची मोठी संधी आपल्यासमोर आहे. इलेक्ट्रिक पब्लिक ट्रान्सपोर्टमध्येदेखील गुंतवणूक करण्याची संधी आपल्याकडे आहे.

दररोज विक्रमी 37 किमी रस्त्याचे बांधकाम

दररोज 37 किलोमीटर रस्ता तयार होत असताना रस्ते पायाभूत सुविधा वेगाने प्रगती करीत आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) नुकताच अवघ्या 24 तासात 2,580 मीटर लांबीच्या चौपदरी महामार्गाचे बांधकाम करण्याचा विक्रम केला आहे. हा एक जागतिक विक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.

महामार्गांसाठी 5 पट खर्च

भारताने यावर्षी 20 मार्चपर्यंत 1,37,625 किलोमीटरपर्यंत महामार्गांचे बांधकाम केले आहे. एप्रिल 2014 पर्यंत 91,287 किलोमीटर महामार्गांचे बांधकाम करण्यात आले होते. या कालावधीत भारताने महामार्गांच्या बांधकामासाठी पाचपट जास्त पैसे खर्च केले आहेत. गडकरी म्हणाले की, गेल्या सात वर्षात भारताने राष्ट्रीय महामार्गाची लांबी 50 टक्क्यांनी वाढवली आहे.

अलीकडेच गडकरी यांनी भारतभरातील रस्ते बांधकाम प्रकल्पांमध्ये सहभागी असलेल्या एजन्सींना रस्ते प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी पायाभूत निधी (इन्फ्रास्ट्रक्चर फंड) तयार करण्याचे आवाहन केले.

इतर बातम्या

आता इतर राज्यांमध्ये गाडी घेऊन गेल्यास री-रजिस्ट्रेशन करावं लागणार नाही, सरकारचा नवा प्रस्ताव

रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांना ‘ब्रेक लागणार’, ‘या’ कंपनीची भन्नाट आयडिया

(Nitin Gadkari announced, 15 lakh crores will be spent in road construction)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या