AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांना ‘ब्रेक लागणार’, ‘या’ कंपनीची भन्नाट आयडिया

रेनॉ (Renault) कंपनीने जाहीर केलं आहे की, ते आपल्या सर्व वाहनांचा वेग कमी करणार आहेत. (Renault Cars And SUVs to have Top Speed Limit)

रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांना 'ब्रेक लागणार', 'या' कंपनीची भन्नाट आयडिया
Renault India
| Updated on: Apr 28, 2021 | 4:58 PM
Share

मुंबई : रेनॉ (Renault) कंपनीने जाहीर केलं आहे की, ते आपल्या सर्व वाहनांचा वेग कमी करणार आहेत. कंपनीने म्हटले आहे की, जागतिक बाजारपेठेत त्यांच्या गाड्या जास्तीत जास्त 180 किमी प्रतितास वेगमर्यादेसह सादर केल्या जातील. कार चालकांची सुरक्षा आणि रस्ते अपघातांचा विचार करता कंपनीने हा निर्णय घेतला आहे. (All new Renault Cars And SUVs to have Top Speed Limit of 180 KPH from 2022)

कंपनीच्या सीएसआर रोडमॅट दरम्यान रेनॉ ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी Luca de Meo यांनी या योजनेबद्दलची माहिती सादर केली. वाहने जसजशी अधिक तंत्रज्ञानाने सुसज्ज होत आहेत, त्यासोबतच कंपन्या गाड्यांचा वेगदेखील वाढवत आहेत. परंतु वारंवार होणारे रस्ते अपघात लक्षात घेता आता बर्‍याच कंपन्या गाड्यांचा वेग कमी करण्याच्या उपक्रमावर काम करत आहेत.

रेनॉने म्हटलं आहे की, ते त्यांच्या सर्व मोटारींच्या स्पीडवर कॅप लावणार आहेत आणि ही कॅप 180 किमी प्रतितास इतकी असेल (रेनॉ गाड्यांमध्ये स्पीड लिमिट असणार). कंपनी आपल्या वाहनांमध्ये नवीन सेफ्टी टेकचा वापर करणार आहे. यामध्ये सेफ्टी कोचचा समावेश असेल. याच्या मदतीने वाहनचालकांना ट्रॅफिक डेटा आणि पुढील धोक्याची माहिती दिली जाईल, असं कंपनीने म्हटलं आहे.

यावेळी कंपनीने सेफ गार्डियन (Safe Guardian) नावाचं आणखी एक फीचर सादर केलं आहे. जर आपली कार अधिक वेगाने धावत असेल आणि रस्त्याच्या कडेने जात असेल तर गाडीची सिस्टिम त्यास डिटेक्ट करेल आणि गाडीचं स्पीड आपोआप कमी होईल, यासाठी सेफ गार्डियन फीचर कामी येईल. कारमेकर कंपनीने म्हटलं आहे की, गाडीत सर्व सदस्य चालकाची सुरक्षेसंबधित अनेक प्रकारची मदत करु शकतील. तसेच कंपनी गाडीच्या सर्व प्रकारच्या माहितीसाठी आपल्या गाड्यांवर QR कोड स्टीकर्स लावणार आहे.

नव्या अवतारात 2021 Renault Triber MPV भारतात दाखल

फ्रेंच कार निर्माता कंपनी रेनॉने आपली लोकप्रिय एमपीव्ही रेनॉल्ट ट्रायबर (MPV Renault Triber) भारतात नवीन अवतारात सादर केली आहे. कंपनीने ही कार काही अपडेट्ससह सादर केली आहे. या 2021 रेनॉ ट्रायबरची (2021 Renault Triber) सुरुवातीची किंमत 5.30 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, नवीन Triber MPV लुक, फीचर्स आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत पूर्वीपेक्षा अधिक दमदार आहे. यामध्ये, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल फीचर्स उपलब्ध असतील, ज्याच्या मदतीने आपण कॉल घेण्यास किंवा ऑडिओ नियंत्रित करण्यास सक्षम असाल. या व्यतिरिक्त चालकाच्या जागेसाठी हाइट अॅडजेस्टमेंट फीचर, ड्युअल टोन एक्सटीरियर, एलईडी टर्न इंडिकेटर्स आणि नवीन Cedar Brown कलर देण्यात आला आहे.

चार व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध

रेनॉ ट्रायबर एमपीव्ही (Renault Triber MPV) ही कार चार व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. यामध्ये RXE, RXL, RXT आणि RXZ या व्हेरिएंट्सचा समावेश आहे. या कारचं बेस बेस व्हेरिएंट असलेल्या RXE व्हेरिएंटची किंमत 5.30 लाख रुपये इतकी आहे, तर टॉप मॉडेल असलेल्या RZX AMT व्हेरिएंटसाठी 7.65 लाख रुपये मोजावे लागतील. या कारचं मिड रेंज मॉडल असलेल्या RXL व्हेरिएंटसाठी कंपनीने 5.99 लाख रुपये ही किंमत निश्चित केली आहे. या कारच्या ऑटोमॅटिक व्हेरिएंटची किंमत 6.50 लाख रुपये इतकी ठेवण्यात आहे. याशिवाय RXT च्या मॅन्युअल मॉडेलची किंमत 6.50 लाख रुपये आणि ऑटोमॅटिक व्हेरिएंटची किंमत 7.05 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. या कारचे बेस मॉडेल केवळ मॅन्युअल ट्रान्समिशन गीयरबॉक्ससह येते.

हेही वाचा

7 नव्या बदलांसह 2021 Maruti Suzuki Swift बाजारात, ‘या’ फीचर्समुळे कारची लोकप्रियता आणखी वाढेल

भारतीयांच्या मनात भरलेली TATA Tiago क्रॅश टेस्टमध्ये पास की नापास?

किंमत 3 लाखांहून कमी, जबरदस्त मायलेज देणाऱ्या ‘या’ कार्सवर 60 हजारांचा डिस्काऊंट

(All new Renault Cars And SUVs to have Top Speed Limit of 180 KPH from 2022)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.