किंमत 3 लाखांहून कमी, जबरदस्त मायलेज देणाऱ्या ‘या’ कार्सवर 60 हजारांचा डिस्काऊंट

अक्षय चोरगे

| Edited By: |

Updated on: Mar 14, 2021 | 9:17 AM

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे त्रस्त असलेले सर्व नागरिक स्वस्त आणि बेस्ट मायलेज कारचा पर्याय शोधत आहेत.

किंमत 3 लाखांहून कमी, जबरदस्त मायलेज देणाऱ्या 'या' कार्सवर 60 हजारांचा डिस्काऊंट
Datsun redi-GO, Maruti Alto 800 and Renault Kwid

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सध्या प्रत्येकजण चिंतेत आहे, अशा परिस्थितीत सर्व नागरिक स्वस्त आणि बेस्ट मायलेज कारचा पर्याय शोधत आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशाच काही गाड्यांबद्दल माहिती देणार आहोत, ज्या कार्स 3 लाखांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहेत आणि त्यांचे मायलेजही चांगले आहे. (Buy Datsun redi-GO, Maruti Alto 800 and Renault Kwid in less than Rs 3 lakh with Rs 60000 discount)

या यादीत Datsun redi-GO, Maruti Alto 800 आणि Renault Kwid या वाहनांचा समावेश आहे. या तीनपैकी कोणतीही कार विकत घेतल्यास तुम्हाला त्यावर 60 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. जाणून घ्या, ही संपूर्ण ऑफर काय आहे आणि तुम्ही या ऑफरचा कसा फायदा घेऊ शकता

Maruti Alto 800 वर शानदार ऑफर

मारुती सुझुकीची बेस्टसेलर हॅचबॅक कार मारुती अल्टो 800 (Maruti Alto 800) च्या खरेदीवर तुम्ही एकूण 39,000 रुपये वाचवू शकता. या महिन्यात मिळणाऱ्या या ऑफरनुसार ऑल्टो 800 वर 20,000 रुपयांची रोख सूट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4000 रुपये कॉर्पोरेट डिस्काऊंट दिला जात आहे. या कारची एक्स शोरुम किंमत 2.99 लाख रुपये इतकी आहे. या कारच्या टॉप व्हेरिएंटसाठी तुम्हाला 4.48 लाख रुपये मोजावे लागतील. ही कार 22.05 किलोमीटर प्रतिलिटर इतकं मायलेज देते.

मारुती सुझुकी अल्टोची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 2.99 लाख रुपये आहे. सुझुकी अल्टोकडे शक्तीसाठी 796 सीसी, 3-सिलेंडर, 12-वाल्व, बीएस -6 कम्प्लायंटचं इंजिन आहे. या कारच्या पॉवर परफॉर्मन्सबद्दल बोलायचं झाल्यास तिचे इंजिन 6000 आरपीएम वर 48PS ची जास्तीत जास्त पॉवर आणि 3500 आरपीएम वर 69 एनएम पीक टॉर्क तयार करतं. ऑल्टो इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनने सुसज्ज आहे.

Datsun redi-GO वर 45 हजार रुपयांची सूट

या कारची एक्स-शोरूम किंमत 2.83 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारच्या टॉप व्हेरिएंटसाठी तुम्हाला 4.77 लाख रुपये मोजावे लागतील. कंपनी या कारवर 45000 रुपयांपर्यंतची सूट देत आहे, ज्यात 15,000 रुपयांचा रोख डिस्काऊंट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 15,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट दिला जात आहे. ही ऑफर 31 मार्चपर्यंत आहे. या कारच्या मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास डॅटसन रेडी-गो एक लिटर पेट्रोलमध्ये 22 किलोमीटरपर्यंतचे मायलेज देते.

भारतीय बाजारपेठेमध्ये डॅटसन रेडी-गोची (Datsun Redi-Go) सुरुवातीची किंमत दिल्लीची एक्स-शोरूममध्ये 2.86 लाख रुपये आहे, जी त्याच्या टॉपच्या मॉडेलवर 4.82 लाखांवर गेली आहे. डॅटसन रेडी-गो भारतीय बाजारात 0.8- लीटर आणि 1- लिटर इंजिनमध्ये विक्रीस उपलब्ध आहे. या कारचे 0.8-लिटर इंजिन 5678 आरपीएम वर 54 पीएस पॉवर आणि 4386 आरपीएमवर 72 एनएम टॉर्क तयार करते. त्याच वेळी रेडी-गोचे 1 लिटर इंजिन 5500 आरपीएम वर 68 पीएस पॉवर आणि 4250 आरपीएम वर 91 एनएम टॉर्क तयार करते. त्याचे इंजिन 5-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनने सुसज्ज आहे. 0.8-लिटर इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशनसह सुसज्ज आहे. त्याच वेळी, त्याचे 1-लिटर इंजिन 5-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनने सुसज्ज आहे.

Renault Kwid वर 60 हजारांची बचत

या कारची एक्स शोरूम किंमत 3.13 लाख रुपये इतकी आहे. या कारच्या टॉप व्हेरिएंटसाठी तुम्हाला 5.31 लाख रुपये द्यावे लागतील. रेनॉच्या या लोकप्रिय हॅचबॅकने तुम्ही एक लिटर पेट्रोलमध्ये 22.3 किमीपर्यंत प्रवास करू शकता. कंपनी या कारवर एकूण 60,000 रुपयांची सवलत देत आहे, ज्यामध्ये 2020 मॉडेलवर 20000 रुपये आणि 2021 मॉडेलवर 10000 रुपये अशी सूट मिळू शकते. याशिवाय तुम्हाला 20 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस, 10,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस तसेच 10,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट दिला जात आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी कॉर्पोरेट डिस्काऊंटच्या जागी 5000 रुपयांची खास ऑफर दिली जात आहे.

रेनॉ क्विड बीएस 6 ही एक एंट्री लेव्हल हॅचबॅक कार आहे. क्विडच्या सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये 1.0 लीटरचे पेट्रोल इंजिन दिले आहे. जे 68 पीएसचे पॉवर आणि 91 एनएम टॉर्क जनरेट करु शकतं. इंजिन 5 स्पीड AMT (ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन) गियरबॉक्ससह देण्यात आले आहे. Renault Kwid BS6 या कारची सुरुवातीची किंमत 3.12 लाख रुपये (एक्स शोरुम) इतकी आहे.

रेनॉच्या क्विड RXL ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये फुल व्हील कवर, इन्टर्नली अॅडजस्टेबल ORVM, एसी, इलेक्ट्रिक पॉवर स्टीयरिंग आणि फ्रंट पॉवर विंडो मिळणार आहे. तसेच यात 12V फ्रंट पॉवर सॉकेट, रेडियो आणि एमपी3 सोबत सिंगल डिन स्टीरियो, हँड्स-फ्री टेलिफोन आणि ऑडियो स्ट्रीमिंग साठी ब्लूटूथ, थिएटर डिमिंगसोबत केबिन लाइट, ट्रॅफिक असिस्टन्स मोड आणि फ्रंट स्पीकर यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. सेफ्टीसाठी क्विड RXL AMT व्हेरियंटमध्ये ड्रायव्हर एयरबॅग, रियर पार्किंग सेन्सर्स, एबीएस, ईबीडी, सीट बेल्ट रिमाइंडर, ओवरस्पीड अलर्ट, रियर डोर चाइल्ड लॉक, हाई माउंटेड स्टॉप लॅम्प आणि सेंट्रल लॉकिंग सोबत रिमोट कीलेस एंट्री यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

इतर बातम्या

Registration Renewal : 15 वर्ष जुन्या गाड्या आता थेट भंगारात जाणार, 1 एप्रिलपासून नवे नियम लागू

शानदार ऑफर! अवघ्या 1.11 लाखात घरी न्या KIA Seltos कार

आपल्या कारला मिळणार Reservation, पार्किंग-चार्जिंगच्या खास सुविधा, वाचा सविस्तर

(Buy Datsun redi-GO, Maruti Alto 800 and Renault Kwid in less than Rs 3 lakh with Rs 60000 discount)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI