शानदार ऑफर! अवघ्या 1.11 लाखात घरी न्या KIA Seltos कार

अक्षय चोरगे

|

Updated on: Mar 13, 2021 | 11:53 AM

दिल्लीत या कारची एक्स-शोरूम किंमत 11,06,229 रुपये इतकी आहे. परंतु केवळ 1 लाख 11 हजार रुपयात तुम्ही ही कार घरी घेवून जाऊ शकता

शानदार ऑफर! अवघ्या 1.11 लाखात घरी न्या KIA Seltos कार
KIA seltos

मुंबई : तुम्ही स्वत: साठी एक उत्तम कार शोधत असाल परंतु कमी बजेटमुळे तुमच्यासमोर अडचणी येत असतील, तर तुमच्यासमोर एक चांगली संधी उपलब्ध आहे, ज्यात केवळ 1 लाख 11 हजार रुपये देऊन दमदार इंजिन आणि शानदार फिचर्सने सज्ज अशी कॉम्पॅक्ट एसयूव्ही किआ सेल्टॉस (SUV Kia Seltos) तुम्ही घरी नेऊ शकता. Kia Seltos चं HTE G Petrol वेरिएंट केवळ 1 लाख 11 हजार रुपयांमध्ये खरेदी करता येईल, तर उर्वरित रक्कम EMI द्वारे भरता येईल. (Buy Kia seltos by paying down payment of Rs 111000 and Easy EMI)

दिल्लीत या कारची एक्स-शोरूम किंमत 11,06,229 रुपये इतकी आहे. केवळ 1 लाख 11 हजार रुपये डाउन पेमेन्ट केल्यानंतर तुम्हाला पाच वर्षांसाठी उर्वरित 9,95,229 रुपये कर्ज घ्यावे लागेल. या कर्जाच्या रकमेवर 9.8 टक्के व्याज लागू असेल आणि पुढील पाच वर्षांत तुम्हाला एकूण 12,62,880 रुपये द्यावे लागतील. यामध्ये तुम्ही एकूण 2,67,651 रुपये व्याज द्यावे लागेल. पुढील पाच वर्ष तुम्हाला दरमहा 21,048 रुपये ईएमआय भरावा लागेल.

जर तुम्हाला असे वाटत असेल की दरमहा 21,048 रुपयांचा ईएमआय तुमच्यासाठी खूप जास्त आहे तर तुम्ही या फायनान्सचा कालावधी वाढवू शकता. जर तुम्ही हे कर्ज फेडण्यासाठी 6 वर्षांसाठी कालावधी घेतलात तर तुम्हाला दरमहा 18,337 रुपये ईएमआय द्यावा लागेल. अशा प्रकारे, तुम्हाला 6 वर्षांत एकूण 13,20,264 रुपये द्यावे लागतील. यात 3,25,035 रुपये व्याज असेल.

Kia Seltos चे फीचर्स

या कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये तुम्हाला 1.4 लीटर GDI टर्बो चार्ज्ड पेट्रोल इंजिन आणि 1.5 लीटर नॅचरली एस्पीरेटेड इंजिन मिळेल. या कारचं नॅचरली अॅस्पिरेटेड इंजिन 113bhp पॉवर आणि 144Nm टॉर्क जनरेट करतं. त्याच वेळी, टर्बो चार्ज इंजिन 138bhp पॉवर आणि 242Nm टॉर्क जनरेट करतं. यासह ही कार मॅन्युअल ट्रान्समिशनसह सादर करण्यात आली आहे, ही कार एक लीटर पेट्रोलमध्ये 16.8 किमी इतकं मायलेज देते.

इतर बातम्या 

मोठी संधी ! 12 लाखांची Mahindra Scorpio आता फक्त 1.33 लाखामध्ये, जाणून घ्या काय आहे ऑफर?

Volvo India ची मोठी घोषणा, आता डिझेल कार बनवणार नाही

Ford EcoSport चं नवं वेरिएंट भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Buy Kia seltos by paying down payment of Rs 111000 and Easy EMI)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI