Ford EcoSport चं नवं वेरिएंट भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

अक्षय चोरगे

अक्षय चोरगे | Edited By: अनिश बेंद्रे

Updated on: Mar 11, 2021 | 7:25 AM

फोर्ड इंडियाने (Ford India) बुधवारी आपली लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही इकोस्पोर्टचं नवं वेरिएंट भारतात लाँच केलं आहे.

Ford EcoSport चं नवं वेरिएंट भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Ford EcoSport SE

मुंबई : फोर्ड इंडियाने (Ford India) बुधवारी आपली लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही इकोस्पोर्टचं नवं वेरिएंट भारतात लाँच केलं आहे. या कारमध्ये, ग्राहकांना दोन बॉडी स्टाईल निवडण्याचा पर्याय देण्यात आला आहे. या वाहनाचे नाव इको इकोस्पोर्ट एसई (Ford EcoSport SE) असे ठेवण्यात आले असल्याचे कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. नवीन लाईनअप अनुक्रमे पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. या कारच्या पेट्रोल वेरिएंटची किंमत 10.49 लाख रुपये आणि डिझेल वेरिएंटची किंमत 10.99 लाख रुपये इतकी आहे. (New Ford EcoSport SE Launched in India Check Prices and Features)

फोर्ड इंडियाने म्हटले आहे की, नवीन व्हेरिएंटचे फीचर्स आणि डिझाइन त्यांच्या अमेरिकन आणि युरोपियन पार्टनर्सपासून प्रेरित आहे, जिथे कॉम्पॅक्ट एसयूव्ही रियर-माउंटेड स्पेयर व्हीलशिवाय विकल्या जातात. नवीन वाहन वापरण्यास सुलभ अशा पंचर किटसह सादर करण्यात आले आहे, ज्याद्वारे ग्राहक अवघ्या काही मिनिटांत टायर रिपेयर करु शकतो, त्यासाठी टायर त्याच्या जागेवरुन काढण्याची आवश्यकता नाही.

फोर्ड इंडियाचे मार्केटिंग, विक्री आणि सेवा कार्यकारी संचालक विनय रैना म्हणाले की, “ग्राहक या कारच्या डिझाईन आणि लुककडे आकर्षित होऊन या ग्लोबल बेंचमार्कला फॉलो करतात. या कारमध्ये अनेक कमालीचे फीचर्स देण्यात आले आहेत. ही कार ग्राहकांना ड्रायव्हिंगचा जबरदस्त अनुभव प्रदान करण्यास सक्षम आहे.

कंपनीने सांगितले की, SYNC 3 सारख्या आउटस्टँडिंग सेफ्टी आणि बेस्ट-इन-सेगमेंट टेक्नोलॉजीयुक्त नवीन इकोस्पोर्ट एसई मध्ये डिझेल आणि पेट्रोल इंजिन असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. त्याचे 1.5 लीटर थ्री सिलेंडर पेट्रोल इंजिन 122 पीएस पॉवर आणि 1.5 लीटर डिझेल इंजिन 100 पीएस पॉवर उत्पन्न करतं. दोन्ही इंजिनांना फोर्डच्या रिस्पॉन्सिव्ह आणि चपळ 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलं जाईल.

EcoSport SE SUV मध्ये काय आहे खास

सध्याच्या इकोस्पोर्ट आणि नवीन एसयूव्हीमधील सर्वात मोठा फरक म्हणजे या कारचा मागील भाग. इकोस्पोर्ट एसईमध्ये एक नवीन टेलगेट आहे जे क्रोम स्लॅट आणि नवीन नंबर प्लेट हाऊसिंगसह येतं. सोबत एक नवीन ड्युअल-टोन रियर बम्परही देण्यात आला आहे. एसई ट्रिममध्ये 16 इंचांचे हाय ग्लॉस सिल्व्हर अलॉय व्हील्सचा एक सेट देण्यात आला आहे. फॉगलॅम्प्सचं डिझाईनही बदललं आहे. आऊटर डिझाईन बऱ्यापैकी जुन्या कारप्रमाणेच आहे. यामध्ये क्रोम डिटेलसह हेक्सागोनल ग्रील आणि एलईडी डे-टाईम रनिंग लॅम्पसह मोठ्या प्रोजेक्टर हेडलॅम्प्स्चा समावेश आहे.

इतर बातम्या

नवीन Tata Safari 2021 खरेदी करताय? ‘इतके’ महिने वाट पाहावी लागेल

Volkswagen च्या ‘या’ शानदार SUV चं भारतात कमबॅक, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

या महिन्यात तीन नव्या SUV लाँच होणार, जाणून घ्या तुमच्यासाठी बेस्ट कार कोणती?

(New Ford EcoSport SE Launched in India Check Prices and Features)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI