मोठी संधी ! 12 लाखांची Mahindra Scorpio आता फक्त 1.33 लाखामध्ये, जाणून घ्या काय आहे ऑफर?

12 लाखांपेक्षा जास्त किंमत असलेली Mahindra Scorpio ही गाडी आता फक्त 1.33 लाख रुपयांत खरेदी करता येणार आहे. (mahindra scorpio best offer)

  • Publish Date - 9:27 pm, Fri, 12 March 21
मोठी संधी ! 12 लाखांची Mahindra Scorpio आता फक्त 1.33 लाखामध्ये, जाणून घ्या काय आहे ऑफर?
Mahindra Scorpio

मुंबई : आपल्या घरासमोर एखादी महागडी कार असावी अशी प्रत्येकालाच इच्छा  असते. कार खरेदी करायची आहे, पण पुरेसे भांडवल नसणाऱ्यांसाठी आता एक नामी संधी चालून आली आहे. 12 लाखांपेक्षा जास्त किंमत असलेली Mahindra Scorpio ही गाडी आता फक्त 1.33 लाख रुपयांत खरेदी करता येणार आहे. जाणून घ्या या खास ऑफर विषयी. (buy mahindra scorpio on just one lakh 33 thousand best offer)

Mahindra Scorpio ही महागडी SUV कार आहे. बाजारात कित्येक महागड्या कार येऊन गेल्या, पण Mahindra Scorpio या कारची मागणी आजही तेवढीच आहे. हीच कार खरेदी करण्याची संधी आता Droom देत आहे. Mahindra Scorpio कारची मूळ किंमत 12 लाख रुपये आहे. मात्र, Droom संकेतस्थळाने सांगितल्याप्रमाणे ही कार आता फक्त 1.33 रुपयांत खरेदी करता येणार आहे. ही कार सेकंडहॅण्ड आहे. Droom च्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीप्रमाणे Mahindra Scorpio ही कार 1,33,500 रुपयांत मिळू शकेल. Droom या संकेतस्थळावर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. Droom च्या संकेतस्थळावर वेगवेगळ्या गाड्या सेकंडहॅण्ड स्वरुपात खरेदी करण्यासाठी उपलब्ध असतात.

Droom वरील Mahindra Scorpio चे वैशिष्य काय?

Droom संकेत स्थळावर दिलेल्या माहितीप्रमाणे Mahindra Scorpio चे विक्रीस असलेले मॉडेल 2009 सालातील आहे. ही कार आतापर्यंत 10800 किलोमीटर धावलेली असून ही डिझेलवर चालणारी कार आहे. वेबसाईटवर दिलेल्या प्रोडक्ट डिस्क्रिप्शननुसार ही एक प्री-ओन्ड एसयूवी कार आहे. कार खरेदी करायची असेल तर त्यासोबत तुम्हाला कारचे आरसी बुक, फ्री रोड साइड असिस्टंस मिळेल. तसेच Mahindra Scorpio Ex 2009 या मॉडेलविषयी अधिक माहिती हवी असेल तर Droom या संकेतस्थळावर जाऊन 4005 रुपयांचे टोकन अमाउंट देऊन कारचे सर्व फिचर्स आणि सुविधेबद्दल माहिती मिळवता येऊ शकते.

Mahindra Scorpio Ex 2009 चे फिचर्स काय?

droom वर दिलेल्या माहितीनुसार Mahindra Scorpio Ex 2009 या कारचे मायलेज 14 किलोमीटर प्रतिलीटर एवढे आहे. कारला 2523 cc चे इंजिन असून 3200 RPM वर 75bhp इतकी पॉवर तसेच, 1400 RPM वर 200 Nm टॉर्क जनरेट करते. या कारच्या चाकांची साईझ 15 इंच असून ही गाडी 5 सीटर आहे. या गाडीविषी अधिक माहिती हवी असेल तर (https://droom.in/product/mahindra-scorpio-ex-2009-5ed73d0c076e4b8e068b459d145) अधिकची माहिती मिळू शकेल.

इतर बातम्या :

Volvo India ची मोठी घोषणा, आता डिझेल कार बनवणार नाही

नवीन Tata Safari 2021 खरेदी करताय? ‘इतके’ महिने वाट पाहावी लागेल

Ford EcoSport चं नवं वेरिएंट भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(buy mahindra scorpio on just one lakh 33 thousand best offer)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI