किआ कंपनीचा नवा विक्रम; भारतात इतक्या कार्सची विक्री

भारतातील एकूण कनेक्टेड कारविक्रीमध्ये किआचा वाटा 55 टक्के इतका आहे. | Kia cars

किआ कंपनीचा नवा विक्रम; भारतात इतक्या कार्सची विक्री
Follow us
| Updated on: Dec 17, 2020 | 3:31 PM

नवी दिल्ली: गेल्या वर्षभरात नावारुपाला आलेल्या किआ कंपनीने (Kia Motors) भारतीय बाजारपेठेत दमदार कामगिरी करुन दाखविली आहे. कंपनीने भारतात एक लाखाहून अधिक कनेटेक्ड कार्सची विक्री केली आहे. किआ कंपनीकडून प्रसिद्धीपत्रक जारी करून याविषयी माहिती देण्यात आली. (Kia sells one lakh connected cars)

भारतातील एकूण कनेक्टेड कारविक्रीमध्ये किआचा वाटा 55 टक्के इतका आहे. किआच्या Seltos GTX Plus DCT 1.4 टर्बो मॉडेलची भारतात सर्वाधिक विक्री झाली. किआच्या एकूण कनेक्टेड कार विक्रीत सेल्टो जीटीएक्स या कार विक्रीचे प्रमाण 15 टक्के इतके आहे.

यासंदर्भात माहिती देताना किआ मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कुकयुन शिम यांनी म्हटले की, आमचे आधुनिक यूवीओ कनेक्ट तंत्रज्ञान सहज, सुरक्षित आणि अविस्मरणीय प्रवासाच्या दिशेने टाकलेले एक यशस्वी पाऊल आहे. भारतात सुरुवातीपासूनच आम्ही कारच्या तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केले आहे. आम्ही कार कनेक्टिव्हिटीमध्ये आणखी एक मैलाचा दगड ओलांडण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत, असे ककयुन शिम यांनी म्हटले.

किआ कंपनीकडून प्रत्येक कनेक्टेड कारच्या खरेदीवर तीन वर्षांसाठी यूवीओ कनेक्टची (UVO connect) सुविधा मोफत मिळते. या तंत्रज्ञानामुळे रिमोट इंजन स्टार्ट\ स्टॉप, टक्कर होत असल्यास ऑटो सूचना, चोरी झालेल्या वाहनाचे इमोबिलायझेशन, रिमोट स्मार्ट प्युअर एअर ऑन, लाईव्ह कार ट्रँकिंग, जिओ फेंसिंग यासारखी फिचर्स उपलब्ध होतात.

गेल्या महिन्यात किआच्या 11,417 सोनेट कारची विक्री झाली. त्यामुळे ही कार भारतातील सर्वाधिक विक्री झालेली कॉम्पॅक्ट एसयुव्ही ठरली आहे. तत्पूर्वी सेल्टोसची बी-एसयूव्ही सेगमेंट कारही लोकप्रिय ठरली होती. मात्र, सोनेट कारच्या आगमनानंतर सेल्टोसच्या विक्रीला खीळ बसली होती.

संबंधित बातम्या:

कारप्रेमींच्या आनंदावर विरजण; 1 जानेवारीपासून ‘या’ कारची किंमत वाढणार

किआ मोटर्सचा नवा प्लॅन; भारतातील निमशहरी आणि ग्रामीण बाजारपेठ काबीज करण्याची तयारी

(Kia sells one lakh connected cars)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.