भारतीयांच्या मनात भरलेली TATA Tiago क्रॅश टेस्टमध्ये पास की नापास?

भारतीय ग्राहक गेल्या काही वर्षांपासून गाडी खरेदी करताना आपल्या आणि वाहनाच्या सुरक्षिततेचा (Car Safety) अधिक विचार करत आहेत.

भारतीयांच्या मनात भरलेली TATA Tiago क्रॅश टेस्टमध्ये पास की नापास?
Tata Tiago
Follow us
| Updated on: Mar 14, 2021 | 9:18 AM

मुंबई : भारतीय ग्राहक गेल्या काही वर्षांपासून गाडी खरेदी करताना आपल्या आणि वाहनाच्या सुरक्षिततेचा (Car Safety) अधिक विचार करत आहेत. प्रत्येक ग्राहक त्याची ड्रिम कार किती सुरक्षित आहे, याचा विचार हमखास करतो. जगभरात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या वाहनं बनवताना केवळ तिच्या लुक्स आणि फिचर्सचाच विचर न करता कारच्या सुरक्षिततेचाही खूप विचार करतात. परंतु काही कंपन्या अशाही आहेत ज्यांच्या कार बाहेरुन दमदार दिसतात, परंतु मजबुती आणि सुरक्षिततेच्या बाबतीत मागे पडतात. (Tata Tiago scored a 4-star rating in Global NCAP test)

भारतीय मार्केटवर सुरुवातीपासूनच हॅचबॅक कार्सचं वर्चस्व राहिलं आहे. त्यामुळे अनेक कार कंपन्या भारतीयांची मागणी आणि पसंती लक्षात घेत गाड्या डिझाईन करुन भारतीय मार्केटमध्ये लाँच करत आहेत. टाटा मोटर्स कंपनीची टाटा टियागो (TATA Tiago) ही कार 2016 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. लाँचिंगपासूनच या कारला भारतीय मार्केटमध्ये लोकप्रियता मिळाली आहे. दरम्यान, भारतीयांच्या पसंतीस उतरलेल्या टियागोला ग्लोबल NCap सुरक्षा टेस्टमध्ये चार स्टार रेटिंग मिळलं आहे. त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत टाटा टियागो पास झाली आहे, असं म्हणता येईल.

TATA Tiago चं लिमिटेड एडिशन सादर

टाटा कंपनीने गेल्या महिन्याभरात TATA Tiago चं लिमिटेड एडिशन आणि AMT व्हेरिएंट मार्केटमध्ये सादर केलं आहे. टाटा मोटर्सने (Tata Motors) टियागो लिमिटेड एडिशन (Tiago Limited Edition) कार गेल्या महिन्यात 5.79 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) या प्राईस टॅगसह सादर केली होती. ही हॅचबॅक कार आता टाटाच्या डीलरशिप्सकडे दिसू लागली आहे. हे लिमिटेड एडिशन मॉडल डेटोना ग्रे रंगात पाहायला मिळू शकतं. याशिवाय गाडी दोन रंगांमध्ये सादर केली जाऊ शकते. ज्यामध्ये फ्लेम रेड आणि पर्लसेंट व्हाईट या रंगांचा समावेश आहे.

लिमिटेड एडिशन टियॅगोमध्ये 14 इंचांचे एलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. रेग्युलर ट्रिमशिवाय Tiago लिमिटेड एडिशनमध्ये रियर पार्सल ट्रे आणि वॉईस कमांड सिस्टिमसह पाच इंचांची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे. अडंर द हुड गाडीत 1.2 लीटरचं रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. जे 85 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करतं. याची मोटर 5 स्पीड मॅनुअल युनिटद्वारे जबरदस्त पॉवर देते.

टाटा टियागो 2016 मध्ये लाँच करण्यात आलेली कार आहे. लाँचिंगपासूनही टाटाच्या लाईनअपमध्ये ही एक मजबूत आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली कार आहे. कंपनीने 2020 मध्ये त्यांच्या गुजरातमधील साणंद प्लांटमधून टियागोचे 3,00,000 युनिट्स रोलआउट केले होते. ही टाटाची IMPACT डिझाईन फिलॉसफीअंतर्गत बनलेली पहिली कार होती. टियागोला ग्लोबल NCap सुरक्षा टेस्टमध्ये चार स्टार रेटिंग मिळलं आहे. या कारच्या काही वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये कार एयर बॅग, रियर पार्किंग असिस्ट आणि ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्यूशनसह सादर करण्यात आली आहे.

नवी Tata Tiago भारतात लाँच

टाटा मोटर्सने नुकतीच त्यांची एन्ट्री लेव्हल हॅचबॅक कार टियागो (Tata Tiago) ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन (AMT) सह लॉन्च केली आहे. या आलिशान कारची किंमत 5.99 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) इतकी ठेवण्यात आली आहे.. टाटा मोटर्सने नवीन XTA व्हेरियंट लॉन्च केल्यामुळे ऑटोमेकर कंपनीकडे आता टियागो लाइन-अपमध्ये चार एएमटी व्हेरियंट आहेत.

नवीन टियागो एक्सटीए व्हेरिएंट एक्सटी ट्रिमवर आधारीत आहे आणि यामध्ये यासारखे अनेक फीचर्स मिळतील. या भारतीय कार निर्मात्या कंपनीने फेब्रुवारी 2021 मध्ये ट्रिपल-डिजिट ग्रोथ नोंदवली आहे, मुख्यत: टियागो हॅचबॅक, नेक्सॉन सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि अल्ट्रॉज प्रीमियम हॅचबॅक या कार्समुळेच हे शक्य झालं आहे. आतापर्यंत कंपनीने देशांतर्गत बाजारात हॅचबॅक कारच्या 3.25 लाखाहून अधिक युनिट्सची विक्री केली आहे. टाटा मोटर्सच्या पॅसेंजर व्हेइकल बिझनेस युनिटच्या (PVBU) मार्केटिंग विभागाचे प्रमुख विवेक श्रीवत्स म्हणाले की, एटीएसला असलेली वाढती मागणी लक्षात घेऊन कंपनीने एक्सटीए व्हर्जन सादर केलं आहे. श्रीवत्स म्हणाले, “आम्हाला विश्वास आहे की हे नवीन व्हेरिएंट आम्हाला मिड-हॅच सेगमेंटमध्ये आमच्या प्रतिस्पर्ध्यांहून उत्कृष्ट सिद्ध करेल.

टाटा टियागो ही कार 2016 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. तेव्हापासून टाटा लाईनअपमध्ये ही कार बेस्ट परफॉर्मर ठरली आहे. कंपनीने 2020 मध्ये गुजरातमधील साणंद प्लांटमध्ये 300,000 युनिट वाहनांची निर्मिती केली केली आहे. टाटाच्या IMPACT डिझाईन फिलॉसफी अंतर्गत ही पहिली कार होती. टियागोने ग्लोबल NCap सेफ्टी टेस्टमध्ये चार-स्टार रेटिंग मिळवलं आहे. या कारच्या सेफ्टी फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये तुम्हाला एअर बॅग्स, रियर पार्किंग असिस्ट आणि ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्यूशनसारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.

कारमध्ये हरमनची 7 इंचाची इन्फोटेनमेंट टचस्क्रीन, 15 इंचाचे अ‍ॅलोय व्हील्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर इत्यादी फीचर्सने नवं एक्सटीए व्हेरियंट सज्ज आहे. नवीन व्हेरिएंटमध्ये 1.2 लिटरचे रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 85 बीएचपी पॉवर आणि 113 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल किंवा 5-स्पीड ऑटोमेटेड मॅनुअल ट्रान्समिशनसह (AMT) जोडले आहे.

इतर बातम्या 

मोठी संधी ! 12 लाखांची Mahindra Scorpio आता फक्त 1.33 लाखामध्ये, जाणून घ्या काय आहे ऑफर?

Volvo India ची मोठी घोषणा, आता डिझेल कार बनवणार नाही

Ford EcoSport चं नवं वेरिएंट भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Tata Tiago scored a 4-star rating in Global NCAP test)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.