AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tata Nano पेक्षाही छोटी इलेक्ट्रिक कार, एका चार्जमध्ये धावते 290 किमी, किंमत किती?

सध्या ग्राहक इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याकडे जास्त कल देत आहेत. मात्र, अशातच आता TATA NANO पेक्षाही छोटी इलेक्ट्रिक कार बाजारात आली आहे. जी एका चार्जमध्ये 290 किमी धावते.

Tata Nano पेक्षाही छोटी इलेक्ट्रिक कार, एका चार्जमध्ये धावते 290 किमी, किंमत किती?
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 16, 2026 | 2:52 PM
Share

मोठ्या SUV आणि लांब पल्ल्याच्या इलेक्ट्रिक कारची क्रेझ वाढत असताना, स्मार्ट (smart) या जर्मन कार ब्रँडने आपल्या छोट्या सिटी कारकडे पुन्हा लक्ष वळवले आहे. पॅरिस मोटर शोमध्ये कंपनीने आपल्या लोकप्रिय दोन आसनी कारचे नवे इलेक्ट्रिक रूप Smart #2 सादर केले आहे. शहरातील अरुंद रस्ते आणि पार्किंगची समस्या लक्षात घेऊन ही कार तयार करण्यात आली आहे.

Tata Nano पेक्षाही छोटी

Smart #2 ची लांबी 2746 मिमी, रुंदी 1760 मिमी आणि उंची 1555 मिमी आहे. या कारमध्ये दोन जणांसाठी आसनव्यवस्था देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तिची लांबी 3099 मिमी असलेल्या Tata Nano पेक्षाही कमी आहे. या कारचे डिझाइन Mercedes-Benz ने केले आहे.

एका चार्जमध्ये 290 किमीची रेंज

Smart #2 मध्ये 35.8 kWh क्षमतेचा लिथियम आयर्न फॉस्फेट (LFP) बॅटरी पॅक देण्यात आला आहे. कंपनीच्या माहितीनुसार, ही कार एका चार्जमध्ये 290 किमीपर्यंत प्रवास करू शकते. यामध्ये 65 kW DC फास्ट चार्जिंगची सुविधाही आहे. फास्ट चार्जरच्या मदतीने बॅटरी 10 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करण्यासाठी 20 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो, असा दावा करण्यात आला आहे.

किंमत किती?

जर्मनीमध्ये Smart #2 ची सुरुवातीची किंमत 19990 युरो (सुमारे 21.28 लाख रुपये) ठेवण्यात आली आहे. तर विशेष Couture Edition ची किंमत 25690 युरो (सुमारे 27.35 लाख रुपये) आहे. या किमती जर्मन बाजारासाठी असून, इतर देशांमध्ये आयात शुल्क आणि इतर खर्चांमुळे किंमत वाढू शकते.

28 वर्षांनंतर पुनरागमन

शहरांसाठी छोट्या कार तयार करण्याच्या उद्देशाने स्मार्ट ब्रँडची सुरुवात 1990 च्या दशकात झाली. 2019 मध्ये Mercedes-Benz आणि चीनच्या Geely समूहाने संयुक्त उपक्रम सुरू केला. आता Smart #2 च्या माध्यमातून कंपनी आपल्या दोन आसनी कारच्या परंपरेला इलेक्ट्रिक तंत्रज्ञानाची जोड देत आहे. मात्र, भारतात ही कार कधी दाखल होणार आणि तिची किंमत किती असेल, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Follow Us
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता