AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मायलेज एकदम भारी आणि फोनशी होणार कनेक्ट, हिरोची Super Splendor XTEC लाँच

हिरो कंपनीने सुपर स्प्लेंडर XTEC 125 सीसी बाइक लाँच केली आहे. नवी डिझाईन आणि अॅडव्हान्स फीचर्सह ही बाइक सादर करण्यात आली आहे. या गाडीचा मायलेजही जबरदस्त असल्याचं कंपनीने सांगितलं आहे.

मायलेज एकदम भारी आणि फोनशी होणार कनेक्ट, हिरोची Super Splendor XTEC लाँच
Hero Super Splendor XTEC ग्राहकांच्या भेटीला, मायलेजसह इतर वैशिष्ट्ये जाणून घ्याImage Credit source: Hero Motocorp
| Updated on: Mar 07, 2023 | 2:01 PM
Share

मुंबई : हिरो मोटोकॉर्पच्या स्प्लेंडर ही देशातील सर्वात लोकप्रिय बाइक आहे. गेली अनेक वर्षे या बाइकनं आपलं राज्य चालवलं आहे. त्यामुळे कंपनीही या बाइकमध्ये काळानुरूप अपडेट करत मार्केटमध्ये लाँच करते. आता कंपनीने Hero Super Splendor XTEC ही बाइक लाँच केली आहे. हिरो बाइक कंपनीने स्टायलिंग अपडेट्स आणि प्रीमियम कनेक्टिव्हिटी फीचर्ससह बाजारात लाँच केली आहे.आतापर्यंत कंपनी स्प्लेंडरचं हे व्हेरियंट 100 सीसी इंजिनसह विकत होती. यात अपडेट करत XTEC वर्जनमध्ये 125 सीसी सुपर स्प्लेंडर लाँच केली आहे. चला जाणून घेऊयात या व्यतिरिक्त कंपनीने कोण कोणते फीचर्स दिले आहेत

Hero Super Splendor XTEC Price in India

नवा बाइक कंपनीने तरुणांच्या मागणी लक्षात घेऊन तयार केली आहे. हिरो सुपर स्प्लेंडर XTEC आता अपडेट करण्यात आली आहे. या बाइकमध्ये हाय इंटेंसिटी पोजिशिनिंग लॅम्प एलईडी हेडलॅम्पसह दिले आहेत. त्याचबरोबर फ्युअल इंडीकेटरसह फुल डिजिटल स्पीडोमीटर, सर्व्हिस रिमाइंडर आणि बाइकमध्ये काही तांत्रिक अडचण अल्यास इंडिकेटर दिलं आहे.

नव्या हिरो मोटरसायकलमध्ये कंपनीने कॉल आणि एसएमएस अलर्टसह ब्लुटूथ कनेक्टिव्हिटी फीचर दिलं आहे. 125 सीसी सेगमेंटमध्ये लाँच केलेल्या या बाइकमध्ये ड्युअल टोन स्ट्राइप्स आहेत. त्यामुळे बाइक दिसण्यास अधिक आकर्षक आहे. यात बाइक युएसबी पोर्ट दिला आहे. त्यामुळे बाइक चालवताना मोबाईल फोन चार्ज करू शकता.

Hero Super Splendor XTEC की इंजिन डीटेल्स

125 सीसी बीएस6 इंजिन असलेली ही बाइक 68 किमीचा मायलेज देते, असा कंपनीने दावा केला आहे. त्याचबरोबर बाइकचं इंजिन 7500 आरपीएमवर 10.7 बीएचपी पॉवर आणि 6000 आरएमपीवर 10.6 एनएम टॉर्क जनरेट करते.

Hero Super Splendor XTEC बाइकची किंमत

हिरो मोटारसायकल कंपनीने ही गाडी दोन व्हेरियंटमध्ये लाँच केली आहे. या बाइकच्या ड्रम व्हेरियंटची किंमत 83 हजार 368 रुपये (एक्स शोरुम) इतकी आहे. तर डिस्क ब्रेक व्हेरियंटची किंमत 87 हजार 268 रुपये (एक्स शोरुम) इतकी आहे.

Follow Us
11 गुन्हे दाखल, SITचा मोठा खुलासा; 4650 व्हिडिओ लिंक हटवल्या
11 गुन्हे दाखल, SITचा मोठा खुलासा; 4650 व्हिडिओ लिंक हटवल्या.
17 मार्च ते आजपर्यंत, अशोक खरात प्रकरणात काय-काय घडलं? SIT ने...
17 मार्च ते आजपर्यंत, अशोक खरात प्रकरणात काय-काय घडलं? SIT ने....
बारामती निवडणुकीवर फडणवीसांची साद; नेमकं काय होणार?
बारामती निवडणुकीवर फडणवीसांची साद; नेमकं काय होणार?.
खरात प्रकरणी एकनाथ शिंदेंच्या चौकशीबाबत संजय शिरसाटांचे मोठे वक्तव्य
खरात प्रकरणी एकनाथ शिंदेंच्या चौकशीबाबत संजय शिरसाटांचे मोठे वक्तव्य.
काँग्रेस उमेदवार मागे घेण्यास तयार पण...त्या एका अटीमुळे......
काँग्रेस उमेदवार मागे घेण्यास तयार पण...त्या एका अटीमुळे.......
मुंबई मेट्रोची नववी मार्गिका आजपासून प्रवाशांच्या सेवेत, CM फडणवीसांनी
मुंबई मेट्रोची नववी मार्गिका आजपासून प्रवाशांच्या सेवेत, CM फडणवीसांनी.
काँग्रेसचा डाऊनफॉल? पार्थ पवारांचा उल्लेख आणि विरोधकांचे प्रत्युत्तर
काँग्रेसचा डाऊनफॉल? पार्थ पवारांचा उल्लेख आणि विरोधकांचे प्रत्युत्तर.
तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ; सुरज चव्हाणांचा काँग्रेसला इशारा
तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ; सुरज चव्हाणांचा काँग्रेसला इशारा.
ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांचं आंदोलन, परीक्षांवर होणार परिणाम?
ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांचं आंदोलन, परीक्षांवर होणार परिणाम?.
पार्थ पवार यांच्या विधानावर सुप्रिया सुळेंचं एका वाक्यात उत्तर
पार्थ पवार यांच्या विधानावर सुप्रिया सुळेंचं एका वाक्यात उत्तर.