AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tata, Nissan कडून 2022 ची धडाक्यात सुरुवात; विक्रीत वाढ, Maruti, Hyundai ची विक्री घटली

टो सेक्टरने (Auto Sector) जानेवारी 2022 मधील वाहन विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. दरम्यान, अनेक वाहन कंपन्यांच्या विक्रीत घट झाली आहे, तर काही वाहन उत्पादकांनी प्रचंड नफा कमावला आहे. टाटा मोटर्सने (Tata Motors) जानेवारी 2022 मध्ये वाहन विक्रीत 27 टक्के वाढ केली आहे.

Tata, Nissan कडून 2022 ची धडाक्यात सुरुवात; विक्रीत वाढ, Maruti, Hyundai ची विक्री घटली
Car - प्रातिनिधिक फोटो (PS- Pixabay)
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Feb 02, 2022 | 4:27 PM
Share

मुंबई : ऑटो सेक्टरने (Auto Sector) जानेवारी 2022 मधील वाहन विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. दरम्यान, अनेक वाहन कंपन्यांच्या विक्रीत घट झाली आहे, तर काही वाहन उत्पादकांनी प्रचंड नफा कमावला आहे. टाटा मोटर्सने (Tata Motors) जानेवारी 2022 मध्ये वाहन विक्रीत 27 टक्के वाढ केली आहे, तर देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकीला (Maruti Suzuki) मात्र या काळात फटका बसला आहे. मारुती सुझुकी इंडियाची (MSI) घाऊक विक्री जानेवारी 2022 मध्ये 3.96 टक्क्यांनी घसरून 1,54,379 युनिट्सवर आली आहे. मारुतीने मंगळवारी एका निवेदनात सांगितले की, जानेवारी 2021 मध्ये कंपनीने 1,60,752 वाहनांची विक्री केली. याशिवाय, कंपनीची देशांतर्गत विक्री गेल्या महिन्यात 8 टक्क्यांनी घसरून 1,36,442 वाहनांवर आली, गेल्या वर्षातील याच महिन्यात 1,48,307 होती.

इलेक्ट्रॉनिक पार्ट्सच्या कमतरतेमुळे केवळ देशांतर्गत बाजारात विकल्या जाणाऱ्या वाहनांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे सेलवर परिणाम झाला आहे. जानेवारीत वाहनांच्या विक्रीत कोणत्या कंपनीला तोटा झाला आणि कोणाला नफा झाला ते जाणून घेऊया…

Hyundai Motor India च्या विक्रीत घट

वाहन कंपनी Hyundai Motor India ची एकूण विक्री जानेवारी 2022 मध्ये 11.11 टक्क्यांनी घसरून 53,427 युनिट झाली. कंपनीने मंगळवारी ही माहिती दिली. जानेवारी 2021 मध्ये कंपनीने 60,105 वाहनांची विक्री केली होती. कंपनीच्या म्हणण्यानुसार, गेल्या महिन्यात त्यांची देशांतर्गत विक्री 15.35 टक्क्यांनी घसरून 44,022 युनिट्स इतकी झाली आहे. वर्षभरापूर्वी याच महिन्यात 52,005 मोटारींची विक्री झाली होती. याशिवाय जानेवारी 2022 मध्ये कंपनीची निर्यात 9,405 युनिट्सपर्यंत वाढली आहे. जानेवारी 2021 मध्ये कंपनीने 8,100 युनिट्सची निर्यात केली होती.

निसान इंडिया नफ्यात

निसान इंडियाने जानेवारी 2022 मधील विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. कंपनीने या वर्षाच्या पहिल्या महिन्यात 4,250 युनिट्सची घाऊक विक्री केली असून, गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 5 टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. जपानी ब्रँडने निसान आणि डॅटसन वाहनांच्या 1,224 युनिट्सची भारतातून परदेशात निर्यात केली. कंपनी सध्या भारतातून नेपाळ, बांगलादेश, भूतान, श्रीलंका, युगांडा, झांबिया, केनिया, सेशेल्स, मोझांबिक, मॉरिशस, ब्रुनेई, टांझानिया आणि मलावीसह 15 देशांमध्ये आपले प्रोडक्ट्स निर्यात करते.

होंडा कार्स इंडियाच्या विक्रीत घट

Honda Cars India ची जानेवारी 2022 मध्ये देशांतर्गत बाजारात वर्ष-दर-वर्ष (YoY) विक्री 7.88 टक्क्यांनी घसरून 10,427 युनिट्सवर गेली आहे, कंपनीने गेल्या वर्षी याच महिन्यात 11,319 युनिट्सची विक्री केली होती. याच कालावधीत कंपनीची निर्यात 39.65 टक्क्यांनी वाढून 1,722 युनिट्सवर पोहोचली, जी गेल्या वर्षीच्या याच महिन्यात 1,233 युनिट्सची होती. एकंदरीत (देशांतर्गत आणि निर्यातीसह), कंपनीने जानेवारी 2022 मध्ये 12,149 युनिट्सची विक्री केली, जी जानेवारी 2021 मध्ये 12,552 युनिट्सच्या तुलनेत 3.2 टक्क्यांनी कमी आहे.

इतर बातम्या

Budget 2022: केंद्र सरकार EV चार्जिंग स्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीसाठी मोठी गुंतवणूक करणार!

Maruti Ertiga ला टक्कर देणारी Kia ची नवी कार या महिन्यात लाँच होणार, काय असेल खास?

Kia ते Toyota, पाहा पुढील दोन महिन्यांत भारतात लाँच होणाऱ्या गाड्या

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली