AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tata ची सर्वात छोटी SUV 4 ऑगस्टला बाजारात, 5 लाखांहून कमी किंमतीत दमदार फीचर्स

देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्स (Tata Motors) लवकरच आपली टाटा एचबीएक्स (Tata HBX) ही एसयूव्ही भारतात दाखल करू शकते.

Tata ची सर्वात छोटी SUV 4 ऑगस्टला बाजारात, 5 लाखांहून कमी किंमतीत दमदार फीचर्स
Tata Hbx
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 25, 2021 | 3:56 PM
Share

मुंबई : भारतात SUV सेगमेंट आता खूपच लोकप्रिय झालं आहे. ह्युंदाय क्रेटा (Hyundai Creta), किया सेल्टॉस (Kia Seltos), किया सोनेट (Kia Sonet), ह्युंदाय वेन्यू (Hyundai Venue), निसान मॅग्नाईट (Nissan Magnite) या SUVs ने भारतीय मार्केटमध्ये सध्या धुमाकूळ घातला आहे. या वाहनांच्या विक्रीबाबतची आकडेवारी पाहिल्यावर लक्षात येईल की, आता प्रीमियम SUV भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यामुळेच भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने Ignis आणि अर्बन SUV लाँच केली आहे. परंतु आता टाटा (Tata) कंपनीदेखील या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे. टाटा आणि ह्युंदाय या दोन वाहन उत्पादक कंपन्या लवकरच भारतीय मार्केटमध्ये दोन नव्या SUV लाँच करणार आहेत. (Tatas mini SUV HBX Hornbill will launch on 4th august in India with under 5 lakh rupees)

देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्स (Tata Motors) लवकरच आपली टाटा एचबीएक्स (Tata HBX) ही एसयूव्ही भारतात दाखल करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार ही कार 4 ऑगस्ट रोजी सादर केली जाऊ शकते. कंपनीने अद्याप या कारचे नाव जाहीर केले नाही. मात्र असे मानले जात आहे की, या कारला HBX Mini SUV असे नाव दिले जाऊ शकते.

हॉर्नबिल ही कंपनीची सर्वात छोटी एसयूव्ही असेल आणि यासाठी टाटाच्या फ्लॅगशिप एसयूव्ही हॅरियर आणि सफारी या 5 सीटर, सब 4 मीटर मॉडेलचे डिझाइन घेण्यात आले आहे. ही एसयूव्ही लॉन्च होण्यापूर्वीच या कारचे उत्पादन सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती आणि आता ही कार डीलर्सकडे पाठवण्यासाठी तयार आहे.

Tata HBX Hornbill चं डिझाइन

या मायक्रो एसयूव्हीमध्ये कंपनीचं इम्पॅक्ट 2.0 डिझाइन उपलब्ध असेल. याचं फ्रंट डिझाईन हॅरियर प्रमाणेच असेल, जे टाटाच्या सिग्नेचर ‘ह्युमॅनिटी लाइन’ ग्रिलसह येईल. अल्ट्रॉज हॅचबॅकनंतर हॉर्नबिल कंपनीच्या लाइन अपमधील दुसरे मॉडेल आहे जे ALFA (अ‍ॅजिल लाईट फ्लेक्सिबल अ‍ॅडव्हान्स) प्लॅटफॉर्मवर तयार केले गेले आहे. यामुळे, उत्कृष्ट सुरक्षा मिळेल आणि ही एसयूव्ही जबरदस्त सेफ्टी रेटिंग प्राप्त करेल अशीही अपेक्षा आहे.

याव्यतिरिक्त या एसयूव्हीच्या डिझाईनमध्ये एलईडी डीआरएलसह स्प्लिट हेडलॅम्प क्लस्टर आणि लो माउंटेड सर्कुलर फॉगलॅम्प, ट्राय-एरो पॅटर्नसह एलईडी टेललॅम्प्स, रूफ माउंटेड स्पॉयलर आणि 15 इंचांचे ड्युअल टोन अ‍ॅलोय व्हील्स देण्यात आले आहेत. यासह, इंटिरियरमध्ये एक फ्लोटिंग टचस्क्रीन मिळेल जी अँड्रॉइड ऑटो आणि Apple कारप्ले कनेक्टिव्हिटीसह येईल आणि यासह सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळेल. यामध्ये मल्टी फंक्शन, 3 स्पीक आणि स्टीयरिंग माउंटेड कंट्रोलसह फ्लॅट बॉटम स्टीयरिंग व्हील मिळेल. याशिवाय यात ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, ईबीडी व एबीएससह रियर पार्किंग कॅमेरासुद्धा मिळेल.

Tata HBX Hornbill चं इंजिन

या मिनी एसयूव्हीमध्ये 1.2 लीटर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन मिळेल जे 85 एचपी पॉवर आणि 113 एनएम टॉर्क जनरेट करेल. याबरोबरच स्टँडर्ड ऑप्शन म्हणून 5 स्पीड ट्रान्समिशन मिळणार असून 5 स्पीड एएमटी ऑप्शनदेखील उपलब्ध होईल. लॉन्चनंतर Tata HBX Hornbill ही कार महिंद्रा KUV100, मारुती सुझुकी इग्निस या गाड्यांना टक्कर देईल. या एसयूव्हीची सुरूवातीची किंमत 5 लाख रुपये असेल.

इतर बातम्या

शानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात

भारतात Hyundai च्या ‘या’ SUV ची रेकॉर्डब्रेक विक्री, एका महिन्यात 11000 हून अधिक बुकिंग्स

मारुती, टाटा आणि रेनॉच्या ‘या’ तीन गाड्यांना मध्यमवर्गीय कुटुंबांची पसंती

(Tatas mini SUV HBX Hornbill will launch on 4th august in India with under 5 lakh rupees)

Follow Us
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न.

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या