AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

681 किमी रेंज, 6.5 लाख रुपये भरून घरी आणा नवीन Tesla कार, महिन्याला भरा इतके रुपये

6.5 लाख रुपये भरून घरी आणा Tesla Model Y L कार. एकदा चार्ज केल्यानंतर धावते 681 किलोमीटर. कंपनीने या मॉडेलमध्ये केला मोठा बदल. जाणून घ्या सविस्तर.

681 किमी रेंज, 6.5 लाख रुपये भरून घरी आणा नवीन Tesla कार, महिन्याला भरा इतके रुपये
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 17, 2026 | 8:42 PM
Share

इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाने आपल्या लोकप्रिय Tesla Model Y L या इलेक्ट्रिक कारबाबत महत्त्वाचे अपडेट दिले आहे. आता ही कार 0 ते 100 किमी प्रतितास वेग अवघ्या 4.5 सेकंदांत गाठू शकते. आधीच्या तुलनेत ही कार 0.5 सेकंद लवकर वेग पकडणार आहे. मात्र, हे अपडेट 1 ऑक्टोबर 2026 नंतर खरेदी केलेल्या कारमध्येच मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

भारतीय बाजारात Tesla Model Y L ची एक्स-शोरूम किंमत 61.99 लाख रुपयांपासून सुरू होते. दिलेल्या माहितीनुसार, 6.5 लाख रुपये डाउन पेमेंट भरून ही कार खरेदी करता येऊ शकते. त्यानंतर दरमहा 49990 रुपये EMI भरावी लागेल. सध्या कंपनीकडून कोणतीही अधिकृत सवलत दिली जात नसल्याचे सांगितले आहे. प्रत्यक्ष EMI ही कर्जाचा कालावधी, व्याजदर आणि इतर अटींनुसार बदलू शकतो.

बॅटरी आणि रेंज

या इलेक्ट्रिक कारमध्ये 88 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 681 किलोमीटरपर्यंत धावू शकते. मात्र, प्रत्यक्ष रेंज ही वाहनाचा वेग, हवामान आणि ड्रायव्हिंगच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.

Tesla Model Y L मध्ये ड्युअल मोटर आणि ऑल-व्हील ड्राइव्ह सेटअप मिळतो. कंपनीने अधिकृत पॉवर आणि टॉर्कचे आकडे जाहीर केलेले नसले तरी अंदाजानुसार ही कार 514 HP पॉवर आणि 590 Nm टॉर्क देऊ शकते. कारचा दावा केलेला कमाल वेग 201 किमी प्रतितास आहे.

चार्जिंगच्या बाबतीतही ही कार विशेष ठरते. टेस्लाच्या सुपरचार्जरच्या मदतीने अवघ्या 15 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 288 किलोमीटरपर्यंतची रेंज मिळू शकते, असा कंपनीचा दावा आहे. ही कार 250 kW DC फास्ट चार्जिंग आणि 11 kW पर्यंत AC चार्जिंगला सपोर्ट करते.

चार्जिंग नेटवर्कचा विस्तार

भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी टेस्ला आपले चार्जिंग नेटवर्क विस्तारत आहे. दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या नेटवर्कमध्ये 20 सुपरचार्जर आणि 28 डेस्टिनेशन चार्जर्स आहेत. 2026 च्या अखेरपर्यंत आणखी तीन नवीन चार्जिंग साइट्स सुरू करण्याची योजना आहे.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट