BLOG: कोरोनाची महामारी गरिबांना कुठे घेऊन जाणारे?

महामारी, धार्मिक दंगली, दुष्काळ यापैकी जगात काहीही झालं तरी गरीबाचीच होरपळ होते. इतर घटकांना किमान प्रिव्हिलेज असल्याने त्यांना निदान २ वेळचं जेवण तरी मिळतं. हे आज पुन्हा एकदा जवळून अनुभवलं.

BLOG: कोरोनाची महामारी गरिबांना कुठे घेऊन जाणारे?
Follow us
| Updated on: Apr 04, 2020 | 3:58 PM

युवल नोआ हरारी हा त्याच्या सेपिअन्स या पुस्तकात असं म्हणतो की, “Unjust discrimination often get worse, not better with time. Money comes to money, poverty to poverty and ignorance to ignorance!”

महामारी, धार्मिक दंगली, दुष्काळ यापैकी जगात काहीही झालं तरी गरीबाचीच होरपळ होते. इतर घटकांना किमान प्रिव्हिलेज असल्याने त्यांना निदान 2 वेळचं जेवण तरी मिळतं. हे आज पुन्हा एकदा जवळून अनुभवलं.

आज सकाळी 11 च्या सुमारास जळगावमधील तांबापुरा परिसरातील (ज्या भागातल्या कचरावेचक मुलांसोबत आम्ही काम करतोय.) 7 कचरावेचक महिला अचानक आमच्या दारात येऊन थबकल्या. उन्हा-तान्हात किमान 6-7 किलोमीटर चालत, त्यातही आमचं घर शोधत शोधत या महिला (म्हाताऱ्या) घरापर्यंत पोचल्या होत्या. 

आम्ही “या घरात” म्हटलं आणि त्या निमुटपणे घरात आल्या. त्या कशासाठी आल्यात हे त्यांनीही आम्हाला सांगितलं नाही आणि आम्हीही त्यांना विचारलं नाही, इतकं त्यांचं दूरवर चालत येण्याचं कारण स्पष्ट होतं.

“तुम्ही सर्वजण कसे आहात? आपली मुलं कशी आहेत?”. कदाचित आम्ही त्यांना फक्त विचारण्याचाच उशीर होता.

“ताई, खूप वाईट वेळ आली आमच्यावर, घरात काहीच खायला उरलेलं नाही आता. रोज तांबापुरमध्ये खिचडी वाटणाऱ्याची गाडी येते. आम्हाला चमचाभर खिचडी देतात आणि मोठमोठ्या कॅमेरामधून आमचे फोटो काढतात. गाडी आली की आमची पोरं भुकेच्या पायी ताटल्या घेऊन त्या गाडीच्या मागे पाळतात ना तेव्हा आमचा गहिरा जीव तुटतो ताई, काय करता अशी वेळ आली. 8 दिवसांपासून पोरांना थोडं फार खाऊ घालतोय आणि आम्ही उरलं तर खातो नाहीतर पाणी पिऊन झोपून राहतो. आतापर्यंत काम करून खाल्लं. कधीच कोणापुढे हात नाही पसरवला पण या बिमारीने आम्हाला ते पण करायला भाग पाडलं. घरात पोरं ‘आहे का माडी भाकर, आहे का माडी भाकर’ असं विचारतात तेव्हा असं वाटतं की आत्महत्या करून घ्यावी.”

त्यांच्यासाठी राशन-पाण्याची सोय करेपर्यंत 2 तास गेले आणि त्या 2 तासांत या महिलांनी आमच्यासमोर त्यांचं दुःख मांडलं. घरात सगळ्यांना जेवायला वाढलं, 4 घास खाल्ले आणि म्हणाल्या की “जात नाहीये, इतक्या दिवसापासून नीट खाल्लं नाहीये तर भूक पण मरून गेलीये आमची.”

घरून जाताना सारख्या आम्हाला, आई-बाबांना हात जोडत होत्या. त्यांना आठवड्याभराचं राशन-पाणी देऊन त्यांच्या घरी सोडून आलोय पण त्या जोडलेल्या हातांमधून आत्मसन्मान चिरडून टाकणारी लाचारी मात्र मनाला कायमच बोचत राहणारे.

एरवी पोरं आम्हाला सारखी म्हणत असतात की “काश! आम्ही तुमच्या घरात जन्माला आलो असतो तर किती भारी झालं असतं.” आज मुलांची परिस्थिती ऐकून त्यांच्या काळजीने रडायला आलं कारण पोरं दिवसातून एकच वेळ जेवताय आणि दिवस मारून नेताय. आणि आम्ही मात्र घरात आहोत आणि दिवसभर भूक लागेल म्हणून खूप सारं खायलाही आणून ठेवलंय. खरंच सगळ्यांनीच प्रिव्हिलेज्ड कुटुंबात जन्माला येणं हे स्वप्नवतच आहे, नाही?

आता तुम्ही म्हणाल, हे तर गरिबांचं गाऱ्हाणं गाणं झालं, पण या कठीण परिस्थितीवर मात करता येईल का? तर मित्रांनो, यावर संपूर्ण मात करता येईल का हे निश्चित नाही सांगता यायचं मात्र थोडेसे प्रयत्न करून गरिबांच्या पोटाची धग मात्र आपण नक्कीच कमी करू शकतो.

जळगावमध्ये आम्ही काही मित्र एकत्र येऊन एका कुटुंबाला साधारण आठवडाभर पुरेल इतका शिधा एकत्र करून त्याचं पाकीट बनवतोय. हे पाकीट जळगावातील वेगवेगळ्या वस्तींमधील कुटुंबाना नेऊन देतोय. शिध्याचे सामान घेण्यासाठी अनेक मित्र-मैत्रिणी आम्हाला आर्थिक मदत करीत आहेत. या पाकिटात गहू, तांदूळ, डाळ, चहा, साखर, तेल, पोहे, बेसन पीठ, मीठ-मसाला आणि डेटॉल अशा वस्तू अंतर्भूत आहेत. अर्थात हे सगळं करत असताना physical distancing पाळायलाच हवं.

याचसोबत राज्य सरकारकडून ज्यांच्याकडे रेशन कार्ड नसेल अश्या कुटुंबांनासुद्धा 3 महिन्याचा शिधा मिळेल अशी घोषणा केली आहे. स्थानिक पातळीवर प्रशासनाशी संपर्क साधून आपल्याला आपल्या नजीकच्या वस्त्यांमधील लोकांना अश्याप्रकारे राशन मिळवून देता येईल का यासाठी सुद्धा प्रयत्न करता येतील.

खरंतर वस्तीत आलेल्या अन्नाच्या गाडीमागे धावावं लागणं हे वस्तीतल्या लोकांना जड जातंय सोबतच अनेकांचं म्हणणं आहे की आज आमच्यावर अशी वेळ आली तर लोकं घासभर अन्न देऊन त्याचे ढीगभर फोटो काढताय. तर जिथे कुठे हे वाटप सुरु असेल तिथे ते सन्मानपूर्वक होतंय का हाही महत्वाचा विषय आहे.

शेवटी काय तर COVID19 महामारीतून संवेदनशील आणि मदत करणाऱ्यांच्या आधाराने हेही दिवस निघून जातील पण या दरम्यान आलेली लाचारी आणि त्यातून त्यांचा चुरडला गेलेला आत्मसन्मान मात्र ते कदाचित आयुष्यभर नाही विसरू शकणार.

हे संकट मोठे आहे. 14 एप्रिल नंतर किंवा लॉकडाऊन संपल्यावर लगेच सगळ स्थिरस्थावर होणार नाही, पुढे देखील अनेक महिने ही लढाई चालणार आहे. मात्र या सगळ्या प्रक्रियेत आपण जर लोकांना आश्वस्त करू शकलो की आपण सगळे या लढाईत त्यांच्यासोबत आहोत तर इतरांनादेखील लढण्याचे बळ मिळेल हे निश्चित! 

– प्रणाली अद्वैत, जळगाव (9767488337)

(टीप – लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....