AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2022: तेजी की घसरण; बजेटच्या दिवशी मार्केटचा मूड, एक नजर 10 वर्षांच्या आकड्यांवर

अर्थसंकल्प पूर्व चर्चेचा अंदाज घेत गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे. 13 जानेवारी पासून आजपर्यंत बाजारात तेजीपेक्षा घसरण सर्वाधिक नोंदविली गेली आहे.

Budget 2022: तेजी की घसरण; बजेटच्या दिवशी मार्केटचा मूड, एक नजर 10 वर्षांच्या आकड्यांवर
| Edited By: | Updated on: Jan 29, 2022 | 10:23 PM
Share

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2022) सादर होण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक आहेत. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात (Share Market Updates) तेजी-घसरणीच सत्र सुरूचं आहे. अर्थसंकल्प पूर्व चर्चेचा अंदाज घेत गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे. 13 जानेवारी पासून आजपर्यंत बाजारात तेजीपेक्षा घसरण सर्वाधिक नोंदविली गेली आहे. 13 जानेवारीला सेन्सेंक्स 61235 अंकांवर बंद झाला होता. मात्र, या आठवड्यात 4000 अंकांच्या घसरणीसह 57200 वर पोहोचला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या दिवशी नेमका बाजारचा मूड कसा(Share market performance budget day) असेल यावर सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. गेल्या10 वर्षातील अर्थसंकल्पाच्या दिवशी निफ्टी 50 , निफ्टी बँक आणि निफ्टी मिडकॅप 100 सर्वाधिक कामगिरी अर्थसंकल्प 2021 वेळीच दिसून आली.

अहवाल काय सांगतो?

बँक ऑफ बडोदाच्या अहवालात अर्थसंकल्पाच्या एक आठवड्यापूर्वी आणि नंतरचे शेअर बाजाराच्या कामगिरीचे विश्लेषण केले आहे. या कालावधीत निफ्टी-50 स्टॉक्सने 0.71 टक्के रिटर्न दिल्याचे दिसून आले आहे. समान कालावधीत अमेरिकेच्या वॉल स्ट्रीट इंडेक्स S&P500 ने 0.88 टक्के रिटर्न दिले होते. गेल्या दहा वर्षांच्या माहितीच्या आधारावर हे निष्कर्ष आहेत.

तेजी असो घसरण- मार्केट करेक्शन

अर्थसंकल्पातील लोकप्रिय घोषणेचा प्रभाव मार्केटवर अधिक काळ टिकाव धरत नसल्याचे दिसून येते. मार्केटमध्ये तेजी निर्माण होते आणि काही कालावधीतचं मार्केट स्थिरावण्याचा (करेक्शन) प्रयत्न करतो. अर्थसंकल्प 2021 दिवशी सेंन्सेक्स मध्ये 5 टक्क्यांची तेजी दिसून आली. पुढील सहा दिवसांपर्यंत तेजी टिकून राहिली. 22 फेब्रुवारी 2021 पर्यंत मार्केट पुन्हा स्थिरस्थावर झाले. अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजारात 2.42 टक्क्यांची घसरण नोंदविली गेली. दरम्यान, एका आठवड्यातच बाजारात 3.53 टक्क्यांचं करेक्शनही दिसून आलं. म्हणजे मार्केटमध्ये तेजी असो घसरण तत्काळ रिकव्हरीला सुरुवात होते.

गेल्या10 वर्षातील अर्थसंकल्पाच्या दिवशी निफ्टी 50 , निफ्टी बँक आणि निफ्टी मिडकॅप 100 सर्वाधिक कामगिरी अर्थसंकल्प 2021 वेळीच दिसून आली.

गेल्या दहा वर्षातील अर्थसंकल्प दिवशीची मार्केट तेजी-घसरण

• अर्थसंकल्प 2020 – 2.42 टक्क्यांची घसरण • अर्थसंकल्प 2019- 2.43 टक्क्यांची घसरण • फेब्रुवारी 2019- 0.59 टक्क्यांची तेजी • अर्थसंकल्प 2018- 0.16 टक्क्यांची घसरण • अर्थसंकल्प 2017- 1.76 टक्क्यांची तेजी • अर्थसंकल्प 2016 – 0.66 टक्क्यांची घसरण • अर्थसंकल्प 2015 – 0.48 टक्क्यांची तेजी • अर्थसंकल्प 2014: 0.28 टक्के घसरण • अर्थसंकल्प2013- 1.52 टक्के घसरण • अर्थसंकल्प 2012- 1.19 टक्के घसरण • अर्थसंकल्प 2011- 0.69 टक्के तेजी

इतर बातम्या

BUDGET 2022 : ‘टीम निर्मला’… अर्थमंत्र्यांचं भाषण कोण लिहितं? कहाणी बजेट घडविणाऱ्या हातांची!

Budget 2022 : जनधन खाते होणार डिजिटल? मोदी सरकार आगामी अर्थसंकल्पात जनधन खात्यांसंदर्भात करू शकते ‘ही’ मोठी घोषणा

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.