AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO Balance Enquiry : ईपीएफओ सदस्य ‘या ‘पद्धतीनं चेक करू शकतात ऑनलाइन बॅलन्स

लाखो खातेदारांनी पीएफ (PF) रक्कम काढण्याचा कोविड (Covid)काळात सपाटा लावला होता, आता परिस्थिती पूर्वपदावर येण्याची चिन्हे दिसू लागताच ईपीएफओ (EPFO) सदस्यांची संख्या वाढली आहे. गेल्या वर्षीपेक्षा 10.22% वाढीची नोंद नोंदविण्यात आली आहे.

EPFO Balance Enquiry : ईपीएफओ सदस्य 'या 'पद्धतीनं चेक करू शकतात ऑनलाइन बॅलन्स
ईपीएफओ
| Edited By: | Updated on: Dec 21, 2021 | 12:54 PM
Share

मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी(EPFO)त या ऑक्टोबर महिन्यात 12.73 लाख सदस्यांनी नवीन नोंदणी केली आहे. EPFO सध्या 6 कोटींच्या घरात लाभधारक आहेत. गेल्या वर्षी याच महिन्याच्या तुलनेत ही वाढ 10.22 टक्के अधिक आहे. श्रम मंत्रालयाने सोमवारी याविषयीची माहिती समोर आणली. नवीन आकडेवारीनुसार, ऑक्टोबर 2021मध्ये 12.73 लाख सदस्यांनी नवीन नोंदणी केली आहे. एक वर्षापूर्वी ऑक्टोबर 2020मध्ये  ईपीएफओत 11.55 लाख सदस्यांनी नोंदणी केली होती.

महिलांचे प्रमाण  21 टक्के  ऑक्टोबरमध्ये नव्याने जोडलेले 7.57 लाख सदस्य पहिल्यांदा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अधिनियम 1952नुसार नोंदविण्यात आले. त्यातच या महिन्यात जवळपास 5.16 लाख सदस्यांनी ईपीएफओपासून वेगळे होत खाते बदल करत पुन्हा जोडले गेले. श्रम मंत्रालयानुसार, वेतन आकड्यांचे विश्लेषण केले असता, 22-25 वर्षाच्या कर्मचाऱ्यांचा भरणा अधिक आहे. महाराष्ट्र, हरयाणा, गुजरात, तमिळनाडू आणि कर्नाटक राज्यात  7.72 लाख नवीन सदस्य जोडणी करण्यात आली. यात महिलांचे प्रमाण 21.14 टक्के इतके आहे.

बॅलन्स टेक करण्याच्या स्टेप्स

1) बॅलन्स चेक करण्यासाठी EPFO ​​सदस्यांना EPFOHO UAN ENG टाइप करावं आणि 7738299899 या क्रमांकावर SMS पाठवावा. 2) अथवा 011-22901406 या दुरभाष केंद्रावर एक मिस कॉल करावा. त्यानंतर तुम्हाला पीएफ खात्यातील शिल्लक रक्कमे संदर्भात एक एसएमएस येईल. 3)  ईपीएफओ वेबसाइट वर जाऊन तुम्ही  पीएफ बॅलन्स तपासू शकता 4) यूएएन और ओटीपी क्रमांकासह उमंग ॲपवरून पीएफ पासबुक बघू शकता

महत्त्वाचा अलर्ट

पीएफ खातेधारकांना (PF Account holders) नामनिर्देशीत व्यक्तीचं नाव आणि इतर माहिती जोडण्याची कालमर्यादा संपतेय. नाॉमिनी (nominee) अॅड करण्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे तर नुकसानही तुमचेच होणार आहे. काही दुर्घटना घडली तर तुमच्या वारसाला, कुटुंबातील व्यक्तींना तुमच्या रक्कमेवर दावा करण्यात अडथळा येऊन नये यासाठी पीएफ कार्यालयानं (Provident Fund) ही कसरत चालवलीय. वारसदाराचं नाव न जोडल्यानं त्यांना पुढील अडचणींचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यात वेळ, पैसा आणि श्रम वाया जाऊ शकतात. तुम्हाला ऑनलाईन नॉमिनेशन अर्ज भरण्यासाठी त्यापेक्षा अगदी कमी वेळ लागेल हे निश्चित.

Omicron Alert: औरंगाबादेत होम क्वारंटाइन बंद! मोठे उत्सव, लग्न टाळण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश!

Aryan Khan | आर्यन खानसंबंधी कथित खंडणी प्रकरणाच्या तपासाला पूजा ददलानीमुळे ब्रेक?

मधाचा गोडवा अन् रोजगाराचीही संधी, काय आहे खादी-ग्रामोद्योग मंडळाची बेरोजगारांसाठीची योजना

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.