Omicron Alert: औरंगाबादेत होम क्वारंटाइन बंद! मोठे उत्सव, लग्न टाळण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश!

औरंगाबादः ओमिक्रॉन (Omicron) हा नवा विषाणू आणि कोरोनाची तिसरी लाट (Corona third wave) अशी दोन्ही संकटं घोंगावत असताना औरंगाबाद जिल्हा प्रशासन अलर्टवर आहे. जिल्हा टास्कफोर्सने सोमवारी तातडीची बैठक घेऊन काही निर्णय घेतले. त्यानुसार, जिल्ग्यातील कोणत्याही कोरोनाबाधित रुग्णाला (Corona Positive) घरी उपचार घेता येणार नाहीत. शासकीय किंवा खासगी कोव्हिड सेंटरमध्येच त्यांना दाखल व्हावे लागेल अशा सूचना […]

Omicron Alert: औरंगाबादेत होम क्वारंटाइन बंद!  मोठे उत्सव, लग्न टाळण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 1:04 PM

औरंगाबादः ओमिक्रॉन (Omicron) हा नवा विषाणू आणि कोरोनाची तिसरी लाट (Corona third wave) अशी दोन्ही संकटं घोंगावत असताना औरंगाबाद जिल्हा प्रशासन अलर्टवर आहे. जिल्हा टास्कफोर्सने सोमवारी तातडीची बैठक घेऊन काही निर्णय घेतले. त्यानुसार, जिल्ग्यातील कोणत्याही कोरोनाबाधित रुग्णाला (Corona Positive) घरी उपचार घेता येणार नाहीत. शासकीय किंवा खासगी कोव्हिड सेंटरमध्येच त्यांना दाखल व्हावे लागेल अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. तसेच प्रत्येक खासगी रुग्णालयात RTPCR चाचणीची सोय करणे सक्तीचे करण्यात आले आहे.

जिल्ह्याधिकाऱ्यांचे नवे आदेश काय?

– शहरातील चौका-चौकात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना दंड ठोठावण्यात येणार आहे. – खासगी रुग्णालयात ओपीडीबरोबरच RTPCR तपासणी सक्तीची करावी – कोव्हिड पॉझिटिव्ह अहवाल आल्यास अशा नागरिकांचे घरीच विलगीकरण करणे बंद करावे. त्यांना संस्थात्मक विलगीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. – लसीकरणाचे प्रमाण जास्तीत जास्त वाढवावे. – विना मास्क वाहनधारक दिसल्यास संबंधित गाडीचा फोटो परिवहन विभागाकडे पाठवला जाील. – अशा वाहनधारकाला परिवहन विभागामार्फत नोटीस दिली जाईल.

औरंगाबादेत ओमिक्रॉन संशयित रुग्ण?

इंग्लंडहून औरंगाबादेत येणाऱ्या एका कुटुंबातील एक तरुणी मुंबईत ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळली. हे कुटुंब मूळचे औरंगाबादचे असल्याने कुटुंबातील वडील यानंतर मुंबईत क्वारंटाइन झाले आणि तरुणीची आई व बहीण औरंगाबादेत क्वारंटाइन झाले होते. मुंबईतील सात दिवस क्वारंटाइन कालावधीनंतर वडील औरंगाबादेत आले असता त्यांना कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना ओमिक्रॉनची बाधा आहे की नाही, हे तपासण्यासाठी त्यांचे स्वॅब पुण्यातील जिनोम सिक्वेन्सिंग लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील यंत्रणाही अलर्ट झाली असून या व्यक्तीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिनोम सिक्वेन्सिंग लॅबचा प्रस्ताव पाठवावा

कोरोनाबाधित व्यक्ती ओमिक्रॉनग्रस्त आहे की नाही, हे कळण्यासाठी औरंगाबाहून रुग्णाचे स्वॅब पुण्याला पाठवले जातात. तेथील जिनोम सिक्वेन्सिंग लॅबकडून अहवाल येण्यासाठी खूप प्रतीक्षा करावी लागते. तामुळे अशा प्रयोगशाळेचा प्रस्ताव घाटी रुग्णालयाने तयार करून तो शासनास पाठवावा,असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

इतर बातम्या-

जेसीबीनं खोदकाम सुरु होतं, अचानक झाला खणखणाट, औरंगाबादेत सापडले ब्रिटिशकालीन घबाड

अमित शहांचा तो प्रयत्न मनोबल खचलेल्या भाजप कार्यकर्त्यांना सावरण्याचा; बाळासाहेब थोरातांचा खोचक टोला

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.