AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेसीबीनं खोदकाम सुरु होतं, अचानक झाला खणखणाट, औरंगाबादेत सापडले ब्रिटिशकालीन घबाड

औरंगाबादमध्ये सोमवारी शहरात ब्रिटिशकालीन नाणी सापडल्याचीच चर्चा रंगली. प्रियदर्शनी उद्यानात सुरु असलेल्या एका खोदकामात नाण्यांची पिशवी सापडल्याने यानिमित्ताने औरंगाबादचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत झाल्याचा भास झाला.

जेसीबीनं खोदकाम सुरु होतं, अचानक झाला खणखणाट, औरंगाबादेत सापडले ब्रिटिशकालीन घबाड
औरंगाबादेत सापडलेली ब्रिटिशकालीन नाणी
| Edited By: | Updated on: Dec 21, 2021 | 11:27 AM
Share

औरंगाबादः शहरातील सिडको परिसरातील प्रियदर्शिनी उद्यानात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे (Balasaheb Thackeray Memorial) काम सुरू आहे. या स्मारकाच्या संरक्षक भिंतीसाठीच्या खोदकामात सव्वाशे वर्षांपूर्वीची नाणी आढळून आली आहेत. तब्बल दोन किलो वजनाची ही नाणी ब्रिटिशकालीन (British Coins) असून त्यावर व्हिक्टोरिया राणीचा (Victoria Queen) मुकूट व मुद्रा आहेत. औरंगाबाद महापालिका प्रशासनाने पुरातत्त्व विभागाकडे (Archaeological department) ही नाणी सुपूर्द केली आहेत.

सोन्याचा मुलामा दिलेली 1,850 नाणी

खोदकाम सुरु असताना एका कापडी पिशवीत ही नाणी सापडली. पिशवीत आणखी एका जीर्ण झालेल्या पिशवीत ही नाणी होती. त्यामुळे नाण्यांचा मातीशी काहीही संपर्क झाला आणि कोणतीही रासायनिक प्रक्रिया झाली नाही. सुरुवातीला ही नाणी तांब्याची असावीत अशी शंका आली. हे पडताळून पाहण्यासाठी ज्वेलर्सना बोलावण्यात आले. तपासणीत नाण्यांना अत्यंत उच्च प्रतीचा सोन्याचा मुलामा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. ब्रिटिश काळातील सोन्याचा मुलामा इतका घट्ट होता की, खूप घासल्यानंतरही नाण्याचा रंग फिका पडत नसे. ही नाणी सव्वाशे वर्षांपूर्वीची असून त्यावर व्हिक्टोरिया राणीचा मुकूट व मुद्रा आहेत. एकूण दोन किलो वजनाच्या या नाण्यांवर 1881 चा स्पष्ट उल्लेख आढळतो.

जेसीबीच्या कामात अचानक झाला खणखणाट

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या संरक्षण भिंतीचे काम रत्नगुरू एजन्सीसला मिळालेले आहे. पाठीमागील बाजूस जेसीबीने खड्डे खोदून त्यातील माती बाहेर काढत असताना सोमवारी संध्याकाळी अचानक नाण्यांचा खणखणाट झाला. पाहणी केली असता एका गाठोड्यात नाणी सापडली. काही नाणी खड्ड्यातही आढळून आली. कंत्राटदार रोहीत स्वामी यांनी वॉर्ड अभियंता व्ही. के. गोरे यांना ही माहिती दिली. त्यानंतर महापालिका आणि पुरातत्त्व विभागातर्फे ही नाणी नेमकी कोणत्या काळातील आहेत, कशाची आहेत, यासंबंधी तपास केला.

इतर बातम्या-

Voting begins | भंडारा गोंदिया झेडपी निवडणूक, मतदानाला सुरुवात; विदर्भातील 38 नगरपंचायतींसाठी मतदान

Hindu CM in Jammu-Kashmir| जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू मुख्यमंत्र्यासाठी फिल्डिंग; कडाक्याच्या थंडीत राजकीय पारा वाढणार!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.