AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्ता आणि थकबाकी मिळणार?

7th Pay Commission | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. यामध्ये विशेषत: महागाई भत्त्याबाबत चर्चा होईल. यापूर्वी 26 जूनला कॅबिनेट सचिव आणि अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती.

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्ता आणि थकबाकी मिळणार?
money
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Jul 07, 2021 | 8:23 AM
Share

नवी दिल्ली: मोदी सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्यादृष्टीने बुधवारी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. या कर्मचाऱ्यांच्या वाढीव महागाई भत्ता आणि डियरनेस रिलीफसंदर्भात (DR) महत्वपूर्ण घोषणा होऊ शकते. तसेच जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांतील थकबाकीही दिली जाऊ शकते. तसे झाल्यास सप्टेंबर महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. (7th Pay Commission fake viral message on social media about da and dr salary components)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. यामध्ये विशेषत: महागाई भत्त्याबाबत चर्चा होईल. यापूर्वी 26 जूनला कॅबिनेट सचिव आणि अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. त्यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांना सप्टेंबर 2021 पासून महागाई भत्ता पुन्हा लागू करण्याचा निर्णय झाला होता. आता मोदी सरकार त्याला मान्यता देणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 17 टक्के डियरनेस अलाऊन्स (DA) मिळतो. गेल्या तीन हप्त्यामधील वाढ पकडून आता हा DA 28 टक्क्यांवर जाईल. जानेवारी 2020 मध्ये DA 4 टक्क्यांनी वाढला होता. त्यानंतर जुलै 2020 मध्ये तीन टक्क्यांनी तर जानेवारी 2021 मध्ये DA मध्ये 4 टक्क्यांनी वाढ झाली होती. आता जुलै महिन्यात त्यामध्ये आणखी तीन टक्क्यांची वाढ होऊ शकते. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण वेतनाच्या 31 टक्के इतका महागाई भत्ता (DA) मिळू शकतो. निवृत्ती वेतनधारकांच्या पेन्शनचा आकडाही याच गणितावर निश्चित होईल.

हेही वाचा :

7th Pay Commission : दहा हजार ग्रेड पे सरकारी कर्मचाऱ्याला जवळपास 2.88 लाखाचं नुकसान

7th Pay Commission : काय आहे Pay Matrix ज्याने सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार?

7th Pay Commission : सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना जुलैपासून वाढीव वेतन! काय फायदा होणार?

(7th Pay Commission fake viral message on social media about da and dr salary components)

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ