7th Pay Commission : काय आहे Pay Matrix ज्याने सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार?

सातव्या वेतन आयोगात पगाराच्या वाढीसह पे मॅट्रिक्सची (Pay Matrix) घोषणाही करण्यात आली आहे. त्या आधारे कर्मचार्‍यांचे वेतन निश्चित केले जाईल. याला ग्रेड पेचा आणखी एक प्रकार म्हटलं जाऊ शकतं.

7th Pay Commission : काय आहे Pay Matrix ज्याने सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार?
canara bank mclr rllr

7th pay Commission : सरकारी कर्मचारी बर्‍याच दिवसांपासून सातव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत आहेत. आयोगाच्या शिफारशी लागू केल्या आहेत, पण त्यांचे वाढलेले पगार खात्यात कधी येतील याचीच वाट सरकारी कर्मचारी व अधिकारी करत आहेत. सातव्या वेतन आयोगात पगाराच्या वाढीसह पे मॅट्रिक्सची (Pay Matrix) घोषणाही करण्यात आली आहे. त्या आधारे कर्मचार्‍यांचे वेतन निश्चित केले जाईल. याला ग्रेड पेचा आणखी एक प्रकार म्हटलं जाऊ शकतं. (7th pay commission latest news update know all about pay matrix)

पे मॅट्रिक्स म्हणजे काय?

खरंतर, 7 वेतन आयोग (7th Pay Commission) असल्याने, केंद्रीय कर्मचाऱ्यांची स्थिती वेतन ग्रेडद्वारे नव्हे तर नवीन पे मॅट्रिक्सद्वारे (Pay Matrix) निश्चित केली जाते. याद्वारे, कर्मचारी त्यांच्या पगाराची पातळी शोधू शकतात. येत्या काळात होणाऱ्या संभाव्य वाढीबद्दल माहिती देखील मिळवू शकेल.

किमान पगारात झाली होती मोठी वाढ

आयोगाच्या शिफारशीनुसार सुरुवातीच्या कर्मचार्‍यांचे किमान वेतन 7000 रुपयांवरून 18000 रुपये केले गेले आहे. याशिवाय क्लास-वन अधिकाऱ्याचा किमान पगार 56100 रुपये निश्चित करण्यात आलाय. सातव्या वेतन आयोगांतर्गत वेतन, भत्ते, पेन्शनमध्ये 23.55 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची शिफारस केलीय.

नवीन पे-मॅट्रिक्स सिस्टीम तयार

सातव्या वेतन आयोगाने नव्या Pay Matrix ची घोषणा केलीय. Pay Matrix सह, केंद्रीय कर्मचारी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीस संपूर्ण करिअरच्या वाढीचे मूल्यांकन करू शकतील. नागरी कर्मचारी, संरक्षण दले आणि लष्करी नर्सिंग सर्व्हिससाठी स्वतंत्र Pay Matrix तयार केले गेलेय. आता त्या आधारे कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये वाढ होईल. त्याशिवाय कमिशनने एक नवीन Pay Matrix देखील जाहीर केला आहे, ज्याद्वारे कर्मचारी त्यांच्या नोकरीच्या सुरुवातीस संपूर्ण कारकिर्दीतील वाढीचे मूल्यांकन करू शकतील. यामध्ये सर्व क्षेत्रातील कर्मचार्‍यांसाठी स्वतंत्र Pay Matrix तयार करण्यात आलाय.

लवकरच पैसे भरले जाणार

या व्यतिरिक्त सरकारने महागाई भत्ता आणि महागाई सवलत (DA आणि DR) याचे तीन हप्ते लवकरच देण्याचा निर्णय घेतलाय. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे रोखलेले तीन हप्त्ये लवकरात लवकर देण्यात येणार आहेत, अशी ग्वाही अर्थ मंत्रालयाने मंगळवारी दिली. तसेच त्यांना 1 जुलै 2021 पासून लागू असलेल्या प्रभावी दरावर हप्त्यांचा मोबदला दिला जाईल. (7th pay commission latest news update know all about pay matrix)

संबंधित बातम्या – 

आताच बुक करा तुमची आवडी कार, पुढच्या महिन्यात वाढणार ‘या’ गाड्यांच्या किंमती

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल आज स्वस्त की महाग, वाचा तुमच्या शहरातले ताजे दर

Alert! जर नाही भरला ‘हा’ फॉर्म तर LIC मध्ये अडकतील पूर्ण पैसे, वाचा सविस्तर

Home Loan : गृहकर्ज घेण्यास अडचण येतेय, मग या गोष्टींकडे द्या लक्ष, सहज उपलब्ध होईल कर्ज

(7th pay commission latest news update know all about pay matrix)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI