आताच बुक करा तुमची आवडी कार, पुढच्या महिन्यात वाढणार ‘या’ गाड्यांच्या किंमती

मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (Maruti Suzuki India ltd) ही भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे.

आताच बुक करा तुमची आवडी कार, पुढच्या महिन्यात वाढणार 'या' गाड्यांच्या किंमती
वैशिष्ट्ये : 2021 स्विफ्ट VXi मध्ये एक नवीन ऑडिओ हेड युनिट मिळाले आहे, जे वॉल्यूम आणि ट्रॅक बदलांसाठी फेदर-टच कंट्रोलसह येते. यात पूर्वीप्रमाणेच ब्लूटूथ, यूएसबी आणि AUX कनेक्टिव्हिटी आहे. त्याच वेळी, टॉप व्हेरिएंट क्रूझ कंट्रोल, कलर एमआयडी आणि ऑटो फोल्डिंग ओआरव्हीएमसह येईल. कारमध्ये एलईडी हेडलॅम्प्स, 7.0 इंच टचस्क्रीन, कीलेस एन्ट्री आणि ऑटो क्लायमेट कंट्रोल, रियर व्ह्यू कॅमेरा यांसह अनेक वैशिष्ट्यांचा (फीचर्स) समावेश करण्यात आहे.

नवी दिल्ली : मारुती सुझुकी (Maruti Suzuki) कार घेण्याची योजना आखत असाल तर कार खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे. कारण, पुढच्या महिन्यापासून म्हणजे एप्रिल 2021 पासून मारुती आपल्या कारची किंमत वाढवत आहे. हे इनपुट किंमतीत (Input cost) वाढ झाल्यामुळे केले जात आहे, कारण त्याचा कारच्या उत्पादन खर्चावर परिणाम होत आहे. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (Maruti Suzuki India ltd) ही भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. (auto news maruti suzuki india to raise prices of cars from next month)

कंपनीने जानेवारी 2021 मध्ये इनपुट खर्चात वाढ झाल्याचे नमूद केले होते आणि काही कार मॉडेल्सच्या किंमती देखील वाढवल्या आहेत. त्याचबरोबर कंपनी एप्रिलमध्ये पुन्हा किंमती वाढवणार आहे. गेल्या एका वर्षापासून विविध इनपुट खर्चात वाढ झाल्यामुळे कारच्या किंमती वाढत आहेत, त्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होत आहे.

ऑटो उद्योग संस्था सियामच्या मते, भारतात प्रवासी वाहनांच्या विक्रीत 18 टक्क्यांनी वाढ झाली असून, फेब्रुवारीमध्ये एकूण 2,81,380 वाहनांची विक्री झाली. तर मागील वर्षी याच महिन्यात 2,38,622 वाहने विकली गेली. मारुती सुझुकी इंडियानेही असे केले असेल तर फेब्रुवारी 2021 मध्ये 1,144,761 युनिट्स विकल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत ते 8.27 टक्क्यांनी अधिक आहेत. दुसरीकडे, ह्युंदाई मोटर इंडियाच्या विक्रीत 28.97 टक्क्यांची वाढ झाली असून फेब्रुवारीमध्ये ती 51,600 वाहनांवर पोचली.

डिसेंबर तिमाहीत 1,996.7 कोटी नफा

डिसेंबरच्या तिमाहीत मारुतीच्या नफ्यात 26 टक्क्यांनी वाढ झाली असून याचा परिणाम कंपनीला 1,996.7 कोटी नफा झाला. तर मागील आर्थिक वर्षात ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये ते 1,587.4 कोटी होते. डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीने 4,95,879 वाहने विकली, जी मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 13.4 टक्क्यांनी वाढली आहेत. (auto news maruti suzuki india to raise prices of cars from next month)

संबंधित बातम्या – 

बहुप्रतीक्षित Electric Jaguar I-Pace भेटीला, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

शानदार ऑफर! 5 लाखांची कार अवघ्या 1.90 लाखात

Tata Safari ला टक्कर देण्यासाठी महिंद्रा आणि ह्युंदायच्या नव्या गाड्या सज्ज

(auto news maruti suzuki india to raise prices of cars from next month)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI