AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बहुप्रतीक्षित Electric Jaguar I-Pace भेटीला, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

जॅग्वार लँड रोवर इंडिया (Jaguar Land Rover India) कंपनी भारतात त्यांची नवी इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच करणार आहे

बहुप्रतीक्षित Electric Jaguar I-Pace भेटीला, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास
Jaguar I-Pace Electric SUV
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: Anish Bendre | Updated on: Mar 23, 2021 | 7:40 AM
Share

मुंबई : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, प्रसिद्ध कार निर्माती कंपनी जॅग्वार लँड रोवर इंडिया (Jaguar Land Rover India) कंपनी भारतात त्यांची नवी इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच करणार आहे. (Jaguar I-Pace Electric SUV Launching today, know price and specs)

जॅग्वार लँड रोव्हर इंडियाने (Jaguar Land Rover India) त्यांची इलेक्ट्रिक एसयूव्ही आय-पेस (Electric Jaguar I-Pace) 9 मार्च रोजी भारतात लाँच करण्याची घोषणा केली होती, ही लाँच डेट पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर कार 23 मार्च 2021 रोजी (उद्या) लाँच केली जाणार असल्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली होती. त्यामुळे उद्या ही बहुप्रतीक्षित कार लाँच होणार आहे. दरम्यान, जॅग्वार लँड रोवरने (जेएलआर) आधीच या मॉडेलसाठी बुकिंग सुरु करण्यात आली आहे.

45 मिनिटात 80 टक्के चार्ज होणार

लँड रोवर डिफेंडरचे डिजिटल वेरिएंट सादर केल्यानंतर त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता भारतात Jaguar I-Pace च्या लाँचिंगसाठी कंपनी उत्सूक आहे. Jaguar I-Pace मध्ये 90kWh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे जी 100kW रॅपिड चार्जरद्वारे 80 टक्के चार्ज करण्यासाठी केवळ 45 मिनिटं लागतील. या गाडीमध्ये असलेली लिथियम आयन बॅटरी इलेक्ट्रिक मोटर्सद्वारे 400 पीएस पॉवर देते. कंपनीने आय-पेसच्या ग्राहकांना चार्जिंगची बेस्ट सुविधा देण्यासाठी टाटा पॉवरशी भागीदारी केली आहे.

बॅटरीवर 8 वर्षांची वॉरंटी

आय-पेस च्या 90 केडब्ल्यूएच लिथियम आयन बॅटरीवर 8 वर्षांची किंवा 1.6 लाख किलोमीटरची वॉरंटी दिली आहे. सोबतच आय-पेसचं पाच वर्षांसाठी सर्विस पॅकेज दिलं जाईल. ही कार तीन वेरिएंट्समध्ये सादर केली जाईल. त्यामध्ये एस, एसई आणि एचएसई अशी या तीन वेरिएंट्सची नावं आहेत. ही कार 4.8 सेकंदात शून्य ते 100 किमी प्रति तास इतका वेग पकडू शकते. जॅग्वारच्या आय-पेसच्या फ्रंट साईडला दोन सिंक्रोन्स मॅग्नेटिक इलेक्ट्रिक मोटर्ससह रियर एक्सलही मिळेल, जे 696 एनएम पीक टॉर्कसह 395 बीएचपी पॉवर आउटपुट जनरेट करेल. यामध्ये AWD (All-wheel drive) सिस्टिमही दिली जाईल. ही 480 हून अधिक किलोमीटपर्यंतची रेंज देईल.

Electric Jaguar I-Pace काय खास असणार?

  • >> कारमध्ये एक स्लोपिंग बोनट, एलईडी हेडलॅम्प्स, हनीकॉम्ब पॅटर्न ग्रिल आणि डिटेल्ड सेंटर एअर-डॅम आहे. या इलेक्ट्रिक वाहनात आकर्षक दिसणारे सेट्स आणि हलके ORVM (Outside Rear-view Mirror) देखील मिळतील.
  • >> या इलेक्ट्रिक एसयूव्हीची लांबी 4682 मिमी, रुंदी 2011 मिमी आणि उंची 1566 मिमी आहे. व्हीलबेस आणि ग्राउंड क्लीयरन्स 2990 मिमी आणि 174 मिमी आहे.
  • >> ही कार फूजी व्हाइट, कॅल्डेरा रेड, सॅन्टोरीनी ब्लॅक, युलाँग व्हाइट, इंडस सिल्व्हर, फिरेंज रेड, सेझियम ब्लू, बोर्स्को ग्रे, आयगर ग्रे, पोर्टोफिनो ब्लू, फर्लेन्डो पर्ल ब्लॅक आणि अरुबा कुलसह एकूण 12 रंगांमध्ये सादर केली जाणार आहे.
  • >> आय-पेस इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये मॅट्रिक्स एलईडी हेडलाइट्स (केवळ एचएसई), 8 वे सेमी पावर्ड लक्सटेक स्पोर्ट सीट, 380W मेरिडियन साऊंड सिस्टम, इंटरअॅक्टिव्ह ड्रायव्हर डिस्प्ले, 3 डी सराउंड कॅमेरा, ड्रायव्हर कंडिशन मॉनिटर, अ‍ॅनिमेटेड डायरेक्शन इंडिकेटर, लेदर स्पोर्ट सीट्स, 825W मेरीडियन 3 डी सराउंड साउंड सिस्टम, हेड-अप डिस्प्ले, अडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल असे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.

दरम्यान, जेएलआर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रोहित सूरी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “लॅन्ड रोव्हर डिफेंडरच्या डिजिटल व्हेरिएंट ऑफरला दिलेल्या शानदार प्रतिसादानंतर आम्ही Jaguar I-Pace भारतात सादर करण्यास खूप उत्सुक आहोत.”

इतर बातम्या

Audi ची दमदार कार भेटीला, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

सिंगल चार्जवर 100KM धावणार, Komaki ची इलेक्ट्रिक बाईक भारतात लाँच

Petrol ची टाकी फुल करण्याचं टेन्शन खल्लास, सिंगल चार्जमध्ये 60KM मायलेज देणारी इलेक्ट्रिक बाईक भेटीला

(Jaguar I-Pace Electric SUV Launching today, know price and specs)

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ